Sooraj Bagal

Sooraj Bagal

राज्य टॅबलेटचं : २०१३मधील टॉप टेन टॅबलेट्स

तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात येत्या वर्षात टॅबलेटचे राज्य असेल , हे सांगायला आता कोणा तज्ज्ञाचीही गरज पडणार नाही. व्यावसायिक उपयोगाबरोबरच खासगी उपयोगासाठीही सर्वत्र टॅबलेटचा वापर सुरू होणार हे आजूबाजूच्या परिस्थितीवरून दिसू लागले आहे . पण सर्वच टॅबलेट कंपन्यांना या ट्रेंडचा लाभ उठवता येणार नाही . सध्या तरी अॅपल , सॅमसंग , गुगल यांसारख्याच कंपन्या या मार्केटवर वर्चस्व गाजवणार हे स्पष्ट आहे . त्यामुळे ओळख करून घेऊया २०१३मधील टॉप टेन टॅबलेट्सची ...  गुगल नेक्सस १०  चालू वर्षात नेक्सस १० हा आयपॅडला टक्कर देणारा सर्वात आघाडीचा टॅब असणार आहे . चांगल्या तऱ्हेने डिझाइन केलेला हा गुगलचा एक उत्कृष्ट टॅब आहे . याची १० इंची स्क्रीन अनेक युजर्ससाठी खूपच फायद्याची ठरणार आहे . अँड्रॉइडच्या अत्यंत अद्ययावत व्हर्जनसह येणारा हा टॅब जुन्या किंवा कमी सुरक्षित ऑपरेटिंग सिस्टीमचा तिटकारा असणाऱ्यांसाठी आकर्षण ठरणार आहे .  सॅमसंग गॅलेक्सी टॅब २  सॅमसंग गॅलेक्सी टॅब २मध्ये अनेक पर्याय उपलब्ध असल्याने ग्राहकांमध्ये नेमका कोणता घ्यावा , याविषयी गोंधळ निर्माण होऊ शकतो . तरीही हा एक उत्तम टॅब आहे . ७ इंची किंवा १० . १ इंची स्क्रीनमधून निवडण्याचा पर्याययामध्ये उपलब्ध आहे . दोन्हींमध्ये केवळ वायफाय असणारा किंवा ४ जीवर चालणारा पर्याय उपलब्ध आहे .त्यामुळे हा एक अतिशय चांगला टॅब असून त्याच्या बलस्थानांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही .  अॅमेझॉन किंडल फायर एचडी ८ . ९  ७ इंची आणि ९ - १० इंची टॅबलेटच्या दरम्यानचा हा एक चांगला टॅब आहे . याची किंमत जरा जास्त असली ,तरी त्यातील फीचर्सही तितकेच आकर्षक आणि उपयुक्त आहेत . अँड्रॉइडवर चालणारा अतिशय उत्तमरित्या डिझाइन केलेला किंडल तसाच दर्जेदारही आहे . सोबतच त्याचे अॅप स्टोअर थेट गुगलच्या प्ले स्टोअरला टक्कर देते. त्यामुळे या वर्षात किंडलला यश मिळणारच .  गुगल नेक्सस ७  नुकताच प्ले स्टोअरवरून भारतात दाखल झालेला गुगलचा नेक्सस ७ हा ७ इंची श्रेणीतील सर्वोत्कृष्ट टॅब आहे .जेलीबिनवर चालणार हा टॅब अतिशय सुरेख डिझाइनमध्ये उपलब्ध आहे . नेक्सस हा या श्रेणीतील एक अतिशय परवडणारा टॅब आहे .  बार्नेस अँड नोब नूक एचडी प्लस  भारतीयांना तुलनेने कमी माहिती असलेला हा टॅब त्याच्या श्रेणीतील किमतींना अगदी योग्य न्याय देणार आहे .२६ जीबी मेमरीसह मिळणाऱ्या या टॅबमध्ये १९२० बाय १२८० इतके फुल एचडी रिझोल्यूशन मिळते .वाचनाची आवड असणारे तर बार्नेस अँड नोबलच्या इ - बुक लायब्ररीला धन्यवादच देतील . किंडलला हा एक उत्तम पर्याय आहे .  आयपॅड मिनी  काहीजण आयपॅड मिनीला टॅबलेटच्या क्षेत्रातील चमत्कार मानतात . ७ . ९ इंची स्क्रीन असलेला मिनी मूळ आयपॅडपेक्षा खूप लहान आहे . पण तरीही त्यात आयओएसचा पूर्ण अनुभव मिळतो , जो अॅपलच्या अनेक चाहत्यांचा वीक पॉइंट आहे . सोबतच हा भल्यामोठ्या स्क्रीनच्या टॅबलेटपेक्षा पुष्कळसा मोबाइलच वाटतो .  सॅमसंग गॅलेक्सी नोट १० . १  गॅलेक्सी नोट १० . १ हा व्यावसायिक आणि वैयक्तिक अशा दोन्ही प्रकारच्या युजर्सचा आवडता टॅबलेट ठरला आहे. १० . १ इंची भलीमोठी स्क्रीन , दमदार प्रोसेसर आणि यातील इतर काही फीचर्स ग्राहकांना खूप आवडतात .यात असलेल्या अनेक गोष्टी इतर कुठल्याही टॅबलेटमध्ये मिळत नसल्याने गॅलेक्सीला यंदाही चांगला प्रतिसादमिळेल .  मायक्रोसॉफ्ट सरफेस प्रो  लोकांच्या नजरा वळलेल्या अनेक टॅबलेट्सपैकी हा एक . विंडोज ८ चालेल का ? युजर फ्रेंडली आहे का ? असे एक ना अनेक सवाल उठविले जातात . त्यामुळे लोकांच्या वळलेल्या नजरांचा अजून तरी कंपनीला फायदा झालेलानाही . पण हा एक अतिशय उत्तमरित्या तयार करण्यात आलेला टॅब असून येत्या वर्षात मायक्रोसॉफ्टचे चाहते त्याकडे अवश्य वळतील .  आयपॅड  आयपॅड या नावातच सर्व काही आले . टॅबलेटच्या जगाला दिशा देण्याचे कामच अॅपलने केले . त्यामुळे टॉप१०मध्ये आयपॅड असणे स्वाभाविकच आहे . हा आतापर्यंतचा सर्वाधिक खपलेला टॅबलेट आहे . आता ,आयपॅडला सध्या उपलब्ध असलेला बेस्ट टॅबलेट म्हणायचे किंवा नाही , हा वादाचा विषय असू शकतो , पण तरीही तो टॉपमध्ये राहणारच .  असूस ट्रान्सफॉर्मर पॅड इन्फिनिटी ...

… हा असा स्‍मार्टफोन जो बनेल तुमच्या टिव्हीचा रिमोट कंट्रोल!

… हा असा स्‍मार्टफोन जो बनेल तुमच्या टिव्हीचा रिमोट कंट्रोल!

दक्षिण कोरियाची मोबाईल कंपनी सॅमसंगने गॅलेक्सी मेगा सीरीजचा स्मार्टफोन सादर केला आहे. यावेळी कंपनीने एंड्रॉईड आधारित दोन नवे स्मार्टफोन गॅलेक्सी...

आता आला नोकियाचा सगळ्यात स्वस्त कलर मोबाइल

आता आला नोकियाचा सगळ्यात स्वस्त कलर मोबाइल

आघाडीची मोबाइल निर्माता कंपनी 'नोकिया'ने आपला सगळ्यात स्वस्त हँडसेट ‘नोकिया 105’ मंगळवारी भारतीय बाजारात लॉन्च केला आहे. नोकियाचा हा कलर...

अँड्रॉइड अॅपची चलती

अॅपल , विंडोज , ब्लॅकबेरी आणि अँड्रॉइड अशा चार ऑपरेटिंग सिस्टिमची सध्या मार्केटमध्ये चांगलीच चलती आहे . विंडोज मार्केटमध्ये नवीनच असल्याने अजून त्याची म्हणावी , तशी स्पर्धा सुरू झालेली नाही . पण अॅपल आणि अँड्रॉइड या दोन ऑपरेटिंग सिस्टिममध्ये चांगलीच स्पर्धा रंगली आहे . या दोन्ही ओएसमध्ये नेमकी कोण बाजी मारतो , याकडे मार्केटचं नेहमीच लक्ष असतं . नवीन वर्षाच्या पहिल्या तीन महिन्यात अँड्रॉइड अॅप्स सर्वाधिक डाऊनलोड झाले आहेत , अशी माहिती कॅनलिस या आयटी सर्वेक्षण संस्थेने केलेल्या सर्वेक्षणात समोर आली आहे .  जानेवारी २०१३ ते मार्च २०१३ या कालावधीत डाऊनलोड झालेल्या अॅप्लिकेशन्सपैकी ५१ टक्के अॅप्लिकेशन्सही अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टिमवर चालणारी होती . गुगल प्लेवरून ही सर्व अॅप्लिकेशन्स डाऊनलोड करण्यात आली होती . उर्वरित ४९ टक्क्यांमध्ये ब्लॅकबेरी , अॅपल आणि विंडोज या ओएसचा क्रमांक येतो .डाऊनलोडिंगमध्ये अँड्रॉइड आघाडीवर असलं तरी उत्पन्न कमविण्यामध्ये अॅपलने बाजी मारली आहे .                     या तीन महिन्यांच्या कालावधीत डाऊनलोड झालेल्या अॅप्लिकेशनच्या उत्पन्नाचा विचार केल्यास त्या उत्पन्नातील ७४टक्के उत्पन्न हे अॅपलला मिळाले आहे . उर्वरित २६ टक्क्यांमध्ये ' गुगल प्ले ' चा वाटा सर्वाधिक आहे . ब्लॅकबेरीवर्ल्ड आणि विंडोज फोन स्टोअरमध्ये सर्वात कमी उत्पन्न मिळाल्याचे या सर्वेक्षणात निदर्शनास आले आहे .पहिल्या तीन महिन्यांमध्ये एकूण १३ . ४ अब्ज अॅप्लिकेशन्स डाऊनलोड झाली आहेत . यातून सुमारे २ . २ अब्ज अमेरिकन डॉलर्सचे उत्पन्न मिळाले आहे . अॅपल अॅप स्टोअर आणि गुगल प्ले यांच्यात चांगलीच स्पर्धा आहे . पण ब्लॅकबेरी वर्ल्ड आणि विंडोज फोन स्टोअर हे या दोन्ही ब्रॅण्डसच्या स्पर्धेत कुठेही तोडीस तोड येत नाहीत , असे मत कॅनलिसचे ज्येष्ठ अभ्यासक टीम शेफर्ड यांनी सांगितले . या तीन महिन्यांमध्ये सर्वाधिक अॅप्लिकेशन्स डाऊनलोड करण्यात आल्याचेही या सर्वेक्षणात म्हटले आहे . यावरून असे स्पष्ट होते की , जगभरात स्मार्टफोन वापरणा -यांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे .  इंडोनेशिया , दक्षिण आफ्रिका आणि ब्राझील या देशांमध्ये सर्वाधिक अॅप्लिकेशन्स डाऊनलोड झाली आहेत . पण तेथून उत्पन्न फार कमी आले आहे . याचाच अर्थ असा आहे की येथे या भागात फ्री अॅप्लिकेशन्स सर्वाधिक डाऊनलोड करण्यात आले आहेत . भारतात स्मार्टफोन युजर्सच्या संख्येत ४२ टक्क्यांनी वाढ झाली असल्याचे या सर्वेक्षणात समोर आले आहे .

‘सोशल नेटवर्किंग’ची दुनिया आभासीच

सोशल नेटवर्किंग साइट्स . रोज एकदा तरी व्हिजिटकेल्याशिवाय कुणाचे पानही हलत नसेल , इतके त्याचे महत्त्व . फ्रेंडलिस्ट वाढवण्याची इच्छा आणि चॅटिंगकेल्याशिवाय चैन न पडणे , हे या साइट वापरणाऱ्यांचे वैशिष्ट्य . आताच्या काळात कुणीही या साइट्सचे महत्त्वनाकारणार नाही . अमेरिकेत मात्र नुकत्याच केलेल्या एका संशोधनात ही दुनिया आभासीच असल्याच्या मुद्द्यावरशिक्कामोर्तब करण्यात आले . अण्णा हजारे यांची चळवळ , इजिप्तमधील नागरी चळवळ बऱ्यापैकी यशस्वीहोण्यामागे सोशल नेटवर्किंग साइट्सही कारणीभूत होत्या , असा दावा अनेकांनी केला . या दाव्याला धक्कापोहोचविणारे संशोधन तिथे झाले आहे . कुठलीही संकटकालीन परिस्थिती ( भूकंप , पूर इत्यादी ), मोठ्याप्रमाणावरील नागरी चळवळी यांमध्ये सोशल नेटवर्किंग साइट्स परिणामकारक ठरत नाहीत , असे हे संशोधनसांगते . उलट अशा प्रकारच्या साइट्सचा वापर अपेक्षित मदतकार्याला किंवा चळवळीला मारकच ठरतो , असाही दावा करण्यात आला आहे .  अमेरिकेतील ' डिफेन्स अॅडव्हान्स्ड् रिसर्च प्रोजेक्ट एजन्सी ' ने २००९मध्ये हा प्रयोग केला . या प्रयोगातीलनिष्कर्षावरून संशोधकांनी सोशल नेटवर्किंग साइट्सच्या परिणामकारकतेवर भाष्य केले आहे . नेटवर्किंगसाइट्सचा वापर आणि त्याची प्रत्यक्षातील परिणामकारकता या प्रयोगात तपासण्यात आली . साइटच्यावापरामुळे एखाद्या संकटकालीन परिस्थितीत प्रत्यक्ष किती जण मदतीला आले एखादी चळवळ प्रत्यक्षात कितीमोठ्या प्रमाणात फोफावली , हे तपासण्यात आले . त्यासाठी एक अनोखा प्रयोग करण्यात आला . चाळीस हजारडॉलरचे पारितोषिक त्यासाठी ठेवण्यात आले . अमेरिकेमध्ये वेगवेगळ्या अशा दहा ठिकाणी ' वेदर बलून्स 'ठेवण्यात आले . कमीत कमी वेळात ते शोधून काढायचे होते . या प्रयोगामध्ये ' मॅसॅच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफटेक्नॉलॉजी ' ( एमआयटी ) विजेती ठरली . त्यांना त्यासाठी नऊ तास लागले .  विजेत्यांना वृत्तपत्रे , रेडिओ , टीव्ही या पारंपरिक संवादाच्या साधनांशिवाय , केवळ सोशल नेटवर्किंगसाइट्सच्या वापराने हे बलून लवकर शोधता आले असते ; पण तसे झाले नाही . विजेत्या स्पर्धकांकडे केवळसोशल नेटवर्क होते म्हणून ते जिंकले नाहीत , तर त्यांनी ते नेटवर्क परिणामकारकरित्या उपयोगात आणले .त्यांच्या नेटवर्कच्या परिणामकारक उपयोगामध्ये साइट्स फारशा कामी आल्या नाहीत . कामी आले , ते त्यांनीप्रत्यक्ष जोडलेले नेटवर्क आणि ते वापरण्याचे त्यांच्याकडे असलेले कसब . त्यामुळे काही ठराविक परिस्थितीमध्येचसोशल नेटवर्किंग साइट्सचा वापर परिणामकारक ठरतो , असा निष्कर्ष अंतिमतः काढण्यात आला .  सोशल नेटवर्किंग साइट्समुळे नागरी उठावांना चालना मिळते , असा दावा करणाऱ्यांना या संशोधनाने चोखउत्तर दिले आहे . वेगळ्या शब्दात सांगायचे झाल्यास साइट्सचा वापर प्रचारासाठी होऊ शकतो ; पण याप्रचाराचा परिणाम प्रत्यक्षात शंभर टक्के दिसेलच , असे मात्र नाही . 

Page 279 of 319 1 278 279 280 319
ADVERTISEMENT
error: Content is protected!