स्मार्टफोन्स

‘कनेक्टिंग’ मायक्रोसॉफ्ट!

मायक्रोसॉफ्टकडून ' नोकिया ' ची खरेदी सॉफ्टवेअर आणि ऑपरेटिंग सिस्टीममध्ये अग्रणी असलेल्या ' मायक्रोसॉफ्ट कॉर्पोरेशन ' ने मंगळवारी मोबाइलहँडसेट निर्मितीतील एकेकाळच्या अव्वल ' नोकिया ' ला सुमारे ४७ हजार कोटी रुपयांना ( ७ . ७ अब्ज डॉलरकिंवा ५ . ४४ अब्ज युरो ) खरेदी करीत असल्याची घोषणा केली . या व्यवहारामुळे ' मायक्रोसॉफ्ट ' ला ' नोकिया ' च्या जवळपास सर्वच पेटंटवर दावा सांगता येणार असून ,जगभरातील ३२ हजार कर्मचाऱ्यांची फौज दिमतीला मिळणार आहे . शिवाय ' मायक्रोसॉफ्ट ' ला आगामी  दहावर्षांपर्यंत ' नोकिया ' हे ब्रँडनेम वापरण्याचा परवानाही मिळाला आहे . नव्या व्यवस्थापनामुळे ' नोकिया ' चाबाजारहिस्सा वाढल्यास ते कायम ठेवण्याचा अथवा भविष्यात ' मायक्रोसॉफ्ट स्मार्टफोन्स ' या नावाने  हँडसेटबाजारात उतरविण्याचा हक्क मात्र बिल गेट्स यांच्या मालकीच्या कंपनीने राखून ठेवला आहे . या व्यवहारामुळे स्मार्टफोन उद्योगात प्रचंड खळबळ माजली नसली तरी बाजारातील आघाडीच्या ' अॅपल '  च्या 'आयओएस ' आणि ' गुगल ' च्या ' अँड्रॉइड ' या ' ऑपरेटिंग सिस्टीम ' ना टक्कर देण्यासाठी ' मायक्रोसॉफ्ट ' ने ही खेळी खेळल्याची चर्चा आहे . स्वतःचे स्थान निर्माण करण्यासाठी ' नोकिया ' ने ' विंडोज ' या  ऑपरेटिंग सिस्टीमचा आधार घेतला खरा ; पण हे प्रयत्न तोकडे पडले .

मायक्रोमॅक्‍सचा कॅनव्‍हास डुडल2 स्‍मार्टफोन लॉंच, सॅमसंगला देणार टक्‍कर

मायक्रोमॅक्‍सचा कॅनव्‍हास डुडल2 स्‍मार्टफोन लॉंच, सॅमसंगला देणार टक्‍कर

स्‍मार्टफोन्‍सच्‍या स्‍पर्धेत मायक्रोमॅक्‍सने एक ऍडव्‍हान्‍स स्‍पेसिफिकेशन असलेला फॅबलेट लॉंच केला आहे. कोणताही गाजावाजा न करता कंपनीने हा स्‍मार्टफोन लॉंच केला....

गुगलने लॉंच केला जबरदस्‍त फिचर्सने सज्‍ज ‘मोटो एक्‍स’ स्‍मार्टफोन

गुगलने लॉंच केला जबरदस्‍त फिचर्सने सज्‍ज ‘मोटो एक्‍स’ स्‍मार्टफोन

स्‍मार्टफोनच्‍या बाजारपेठेत मुसंडी मारण्‍याच्‍या तयारीत असलेल्‍या मोटोरोलाने एक जबरदस्‍त हॅण्‍डसेट सादर केला आहे. गुगल आणि मोटोरोला यांच्‍या संयुक्त उपक्रमातून उत्‍पादन...

Page 68 of 82 1 67 68 69 82
ADVERTISEMENT
error: Content is protected!