MarathiTech - मराठीटेक
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
MarathiTech - मराठीटेक
No Result
View All Result
Home स्मार्टफोन्स

स्मार्ट स्वस्ताई स्मार्ट फोन

Sooraj Bagal by Sooraj Bagal
September 24, 2013
in स्मार्टफोन्स

नोकिया लुमिया ५१० 

स्मार्ट फोनचे मार्केट आल्यावर मोबाइल मार्केटवर अधिराज्य गाजवणाऱ्या नोकिया या कंपनीने मायक्रोसॉफ्टशी टायअप करून विंडोज ऑपरेटिंग सिस्टीम असलेले स्मार्ट फोन बाजारात आणले. यात स्वस्तपासून ते अगदी महागड्या फोनची रेंज आहे. यातील स्वस्त फोन म्हणजे नोकिया लुमिया ५१० , ६१० आणि ७१०. हे दोन्ही फोन्स स्वस्त स्मार्ट फोनच्या मार्केटमध्ये चांगली चलती असणारे आहेत. 

हार्डवेअर स्पेसिफिकेशन 

ऑपरेटिंग सिस्टिम : विंडोज फोन ७.५ प्रोसेसर- ८०० मेगाहर्ट्झ प्रोसेसर स्क्रीन – ४-इंच टीएफटी केपॅसिटीव टचस्क्रीन कॅमेरा – पाच मेगापिक्सल प्राइमरी कॅमरा रॅम – २५६ एमबी मेमरी – ४ जीबी किंमत – ९ , ९९९ नोकिया लुमिया ६१० हार्डवेअर स्पेसिफिकेशन… ऑपरेटिंग सिस्टिम : विंडोज फोन ७.५ प्रोसेसर – ८०० मेगाहर्ट्झ प्रोसेसर. एआरएम कॉरटेक्स-ए५ प्रोसेसर ग्राफिक्स – अड्रेनो २०० स्क्रीन – ३.७” टीएफटी केपॅसिटीव टचस्क्रीन कॅमेरा – पाच मेगापिक्सल प्राइमरी कॅमेरा बॅटरी – १३०० एमएएच रॅम – २५६ एमबी मेमरी – ८ जीबी किंमत – १२ , ५०० नोकिया लूमिया ७१० हार्डवेअर स्पेसिफिकेशन… स्क्रीन – ३.७ इंच टीएफटी कॅपॅसिटी, टचस्क्रीन, क्लिअरब्लॅक डिसप्ले, गॉरिला ग्लास डिस्प्ले प्रोसेसर – १.४ गिगाहर्ट्झ प्रोसेसर ऑपरेटिंग सिस्टिम : विंडोज फोन ७.५ (मँगो) कॅमेरा – पाच मेगापिक्सेल प्राइमरी कॅमेरा मायक्रो सिम फीचर ग्राफिक्स – अड्रेनो २०५ बॅटरी – १३०० एमएएच रॅम – ५१२ एमबी मेमरी – ८जीबी 

किंमत – १३,५०० 


सॅमसंग गॅलक्सी म्युझिक ड्यूओज 

संगीतप्रेमी मोबाइल युजर्सना आवडेल, असा हा स्वस्त आणि मस्त फोन सॅमसंगने बाजारात आणला आहे. यासाठी या फोनमध्ये पुढच्या बाजूस आणि मागच्या बाजूस असे दोन स्पीकर्स देण्यात आले आहेत. याला थेट म्युझिक गॅलरीमध्ये जाण्यासाठी एक वेगळे बटन देण्यात आले आहे. तसेच साऊंड अलाइव्ह आणि एसआरएस या ऑडिओच्या दोन विशेष सुविधाही देण्यात आल्या आहेत. याचबरोबर हा फोन ड्यूएल सिम आहे. यामुळे याला विशेष मागणी आहे. 

हार्डवेअर स्पेसिफिकेशन 

ऑपरेटिंग सिस्टीम – अँड्रॉइड ४.० स्क्रीन सइज – ३ इंच ३२० बाय २४० पिक्सेल बॅटरी – १३०० एमएएच रॅम – ५१२ एमबी मेमरी – ४ जीबी इंटर्नल व ३२ जीबीपर्यंत मायक्रो एसडी कार्डने वाढवता येते. कॅमरा – तीन मेगापिक्सल किंमत – ७, ९९० रुपये 

सोनी एक्स्पीरिया टीपो 

सोनी आणि स्वस्त ब्रॅण्डमध्ये थोडा धक्का बसतो. मात्र सोनीचाही स्वस्त आणि मस्त स्मार्टफोन बाजारात आला आहे. जर तुम्हाला १० हजार रुपयांपेक्षा कमी किमतीचा स्मार्टफोन हवा असेल , तर तुम्ही नक्कीच या फोनचा पर्याय स्वीकारावा. हा फोन सॅमसंग गॅलेक्सी वाय, एलजी ऑप्टिमम मी, एचटीसी अशा विविध फोन्सना चांगला पर्याय ठरू शकतो. हा फोनही ड्युएल सिम आहे. 

हार्डवेअर स्पेसिफिकेशन 

ऑपरेटिंग सिस्टीम – अँड्रॉइड ४.० प्रोसेसर – ८०० मेगाहार्ट्झ क्वालकॉम स्नॅपड्रॅगन रॅम – ५१२ एमबी मेमरी – इनबिल्ट २.९ जीबी , एक्सटर्नल मेमरी कार्ड ३२ जीबीपर्यंत वाढवता येऊ शकते. स्क्रीन – ३.२” टीएफटी टचस्क्रीन 

किंमत – ८ , ९९० रुपये. 

ADVERTISEMENT

आयफोन ५ एस 

हा पहिला स्मार्ट फोन आहे ज्यात ६४ बीटची चीप असली तरी ३२ बीटवर चालणारी सर्व अॅप्स यात चालतील. या फोनमध्ये ए ७ प्रोसेसर बसवण्यात आला आहे. हा प्रोसेसर पहिल्या आयफोनच्या प्रोसेसरपेक्षा ५६ पट जास्त वेगाने काम करतो, असे अॅपल कंपनीने सांगितले. हा फोन स्पेस ग्रे, पांढऱ्या आणि बबली शॅम्पेन रंगात सादर करण्यात आला आहे. हाय ग्रे अॅल्युमिनियमपासून तयार करण्यात आलेले या फोनचे मॉडेल आयओएस ७ या ऑपरेटिंग सिस्टिमवर (ओएस) काम करते. गेमिंगसाठी आयफोन ५ एसमध्ये ओपन जीपीईएस ३.० सिस्टिम आहे. या सिस्टिममुळे स्मार्टफोनवर खेळता येणारे अनेक प्रकारचे गेम या आयफोनवर खेळता येतील. या आयफोनमध्ये अॅपल कंपनीचीच ५ एलिमेंट लेन्स आहे. फोनच्या सेन्सरचा आकार आधीच्या फोनमधील सेन्सरपेक्षा १५ टक्के जास्त मोठा आहे. शिवाय आयफोन ५ एसमध्ये एफ/२.२ अॅपार्चर आहे. आयफोन ५ एस ची बॅटरी थ्री जी सेवा वापरल्यास सलग दहा तास काम करते. फोर जी एलटीई सेवा वापरल्यास दहा तास मोबाइलव्दारे इंटरनेट ब्राउझिंग करता येते किंवा सलग दहा तास व्हिडीओ बघता येतो. या फोनचा स्टँडबाय टाइम २५० तासांचा आहे. या फोनचे १६ जीबी क्षमतेचे मॉडेल भारतात सुमारे १३ हजार रुपयांना उपलब्ध आहे. तसेच आयफोन ५ एसचे ३२ जीबी क्षमतेचे मॉडेल भारतात सुमारे २० हजार रुपयांना तर आयफोन ५ एसचे ६४ जीबी क्षमतेचे मॉडेल भारतात सुमारे २५ हजार रुपयांना उपलब्ध आहे. 

आयफोन ५ सी 

भारत आणि चीनमधील मध्यमवर्गासाठी म्हणून अॅपल कंपनीने हा कमी किंमतीचा आणि पाच रंगात उपलब्ध असलेला फोन तयार केला आहे. याचे मागच्या बाजूचे कव्हर पॉलिकार्बोनेटव्दारे तयार करण्यात आले आहे. यात ८०२.११ a/b/g/n ड्युएल बँड वाय-फाय आणि जगात कुठेही इंटरनेट सेवा वापरणे सोपे व्हावे यासाठी एलटीई (४ जी) बँड्स आहेत. याच्या १६ जीबी क्षमतेच्या मॉडेलची किंमत ९९ डॉलर (सुमारे ६३०० रुपये) आणि ३२ जीबी क्षमतेच्या मॉडेलची किंमत सुमारे १५ हजार रुपये आहे. आयफोन ५ सी मध्ये आयफोन ५ प्रमाणेच चार इंचाचा डिस्प्ले, ए ६ प्रोसेसर, आठ मेगापिक्सल्सचा कॅमेरा, फोनच्या पुढच्या बाजूस व्हिडिओ चॅट किंवा व्हिडिओ कॉन्फरन्स करण्यासाठी एक एचडी कॅमेरा आहे. हा कॅमेरा अंधुक प्रकाशातही दर्जेदार काम करतो, अशी माहिती अॅपल कंपनीने दिली. कंपनीने आयफोन ५ सी साठी २९.९९ डॉलरचे (सुमारे दोन हजार रुपये) सहा रंगाचे कव्हर सादर केले आहेत. या फोनची मागची बाजू अतिशय गुळगुळीत आणि सॉफ्ट मॅट फिनिशिंग केलेली अशी आहे. हा फोन आयओएस ७ या ऑपरेटिंग चालतो.

Tags: AppleiPhoneLumiaNokiaSamsungShoppingSmartphones
ShareTweetSend
Previous Post

इंटरनेटवरुन रेल्‍वे रिझर्व्‍हेशन करणा-यांसाठी मायक्रोसॉफ्टने आणले एक खास अॅप…

Next Post

जगातील सर्वांत महागडा व्हिडिओ गेम ग्रँड थेफ्ट ऑटो -5 बाजारात सादर

Sooraj Bagal

Sooraj Bagal

Related Posts

सॅमसंगचे Galaxy Fold7, Flip7 आणि Flip7 FE सादर!

सॅमसंगचे Galaxy Fold7, Flip7 आणि Flip7 FE सादर!

July 10, 2025
Moto g96

मोटोचा Moto g96 भारतात सादर!

July 10, 2025
OnePlus Nord 5 Nord CE 5

वनप्लसचे Nord 5 आणि Nord CE 5 भारतात सादर!

July 8, 2025
Nothing कंपनीचा Phone (3) सादर : विचित्र डिझाईनचा फ्लॅगशिप फोन!

Nothing कंपनीचा Phone (3) सादर : विचित्र डिझाईनचा फ्लॅगशिप फोन!

July 1, 2025
Next Post

जगातील सर्वांत महागडा व्हिडिओ गेम ग्रँड थेफ्ट ऑटो -5 बाजारात सादर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ADVERTISEMENT
Perplexity Pro Airtel Offer

एयरटेलच्या सर्व ग्राहकांना Perplexity Pro AI वर्षभर मोफत!

July 18, 2025
Google Gemini AI Pro Free Offer

गूगलची विद्यार्थ्यांसाठी ऑफर : Gemini AI Pro + 2TB स्टोरेज एक वर्ष मोफत!

July 17, 2025
सॅमसंगचे Galaxy Fold7, Flip7 आणि Flip7 FE सादर!

सॅमसंगचे Galaxy Fold7, Flip7 आणि Flip7 FE सादर!

July 10, 2025
Moto g96

मोटोचा Moto g96 भारतात सादर!

July 10, 2025
MSRTC Timing Check Marathi

एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

September 25, 2012
Windows 10 Marathi Typing

विंडोज १० वर आता मराठी टायपिंगसाठी स्मार्ट फोनेटिक कीबोर्ड!

June 18, 2019
मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

September 10, 2012
ADVERTISEMENT
MarathiTech - मराठीटेक

तंत्रज्ञानाविषयी मराठी भाषेतली प्रसिद्ध वेबसाइट! नवं तंत्रज्ञान, नवनवे फोन्स, ॲप्स यांच्याबद्दल रंजक माहिती...

मराठीटेकला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा

Perplexity Pro Airtel Offer

एयरटेलच्या सर्व ग्राहकांना Perplexity Pro AI वर्षभर मोफत!

July 18, 2025
Google Gemini AI Pro Free Offer

गूगलची विद्यार्थ्यांसाठी ऑफर : Gemini AI Pro + 2TB स्टोरेज एक वर्ष मोफत!

July 17, 2025

एयरटेलच्या सर्व ग्राहकांना Perplexity Pro AI वर्षभर मोफत!

गूगलची विद्यार्थ्यांसाठी ऑफर : Gemini AI Pro + 2TB स्टोरेज एक वर्ष मोफत!

सॅमसंगचे Galaxy Fold7, Flip7 आणि Flip7 FE सादर!

मोटोचा Moto g96 भारतात सादर!

वनप्लसचे Nord 5 आणि Nord CE 5 भारतात सादर!

  • About
  • Advertise
  • Privacy Policy
  • Contact

© MarathiTech 2024 A Product by BagalTech

error: Content is protected!
No Result
View All Result
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • खास लेख
  • गेमिंग
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • शॉपिंग ऑफर्स
  • आमच्याबद्दल About Us
  • संपर्क – प्रतिक्रिया

© MarathiTech 2024 A Product by BagalTech