सॉफ्टवेअर्स

मायक्रोसॉफ्टचा धमाका : विंडोज १०, सर्फेस हब, होलोलेन्स, स्पार्टन ब्राऊजर, कोर्टाना

मायक्रोसॉफ्टचा धमाका : विंडोज १०, सर्फेस हब, होलोलेन्स, स्पार्टन ब्राऊजर, कोर्टाना

गेल्या काही वर्षांमध्ये मायक्रोसॉफ्टच्या इवेंटमध्ये काय होणार याची जवळपास सर्वच माध्यमांना आधीच खबर असायची. मात्र यावेळच्या इवेंटमधील काही गोष्टी अतिशय...

मोबाइल, टॅबसाठी फोटोशॉप देणे कठीणच! : PhotoShop Founder

मोबाइल, टॅबसाठी फोटोशॉप देणे कठीणच! : PhotoShop Founder

सध्याच्या काळात मोबाइल आणि टॅब वापरणाऱ्यांची संख्या वाढत असली तरी त्यासाठी पूर्ण क्षमतेने फोटोशॉप देणे सध्यातरी शक्य नसल्याची कबुली अॅडोब...

ऑनलाइन तांत्रिक मदतनीस टीम व्ह्यूअर विकी रेफरन्स डेस्क

अनेकदा एखादी तांत्रिक समस्या आली, तर लगेच सोडवायला कुणीही धावून येत नाही. जवळपासच्या कम्प्युटर रिपेअर करणाऱ्याला ते कळत नाही किंवा...

५ उत्कृष्ट व्हिडीओ कन्व्हर्टर

अगदी साध्या हँडसेटवरही व्हिडीओ प्लेयर आल्याने मोबाइलवर संपूर्ण चित्रपट पाहणाऱ्यांचीही संख्याही  भरपूर. एकीकडे घरातल्या टीव्हीची स्क्रीन साइज वाढत असताना मोबाइलवर चित्रपट पाहणारेही वाढत  आहेत .  प्रामुख्याने नोकरीसाठी खूप मोठा प्रवास करावे लागणारे , काहीकामानिमित्त एकटे राहणाऱ्यांची संख्या  यामध्ये जास्त आहे. मात्र सध्याच्या काळात व्हिडीओचे विविध प्रकार उपलब्ध झाल्याने प्रत्येक फॉरमॅट  तुमच्या व्हिडीओ प्लेयरमध्ये प्ले होईलच असे नाही . त्यासाठी ही काही व्हिडीओ कन्व्हर्टर ... एमपीईजी स्ट्रीमक्लिप  विंडोज आणि मॅकसाठी उपलब्ध असलेला एक चांगलाव्हिडीओ प्लेयर , एडिटर आणि कन्व्हर्टर आहे . यामध्ये सर्व फॉरमॅट मधल्या फाइल प्ले तर होतातच पण मोफत उपलब्ध असलेल्या या सॉफ्टवेअरमधील कन्व्हर्ट  करण्याचा स्पीडही चांगला आहे . व्हिडीओ कन्व्हर्जनसाठी उपलब्ध असलेले हे अॅप नवे नसले तरी यात अगदी सहज ,सोप्या पद्धतीने , कुठल्याही तक्रारी शिवाय व्हिडीओ कन्व्हर्ट करता येतो .  फॉरमॅट फॅक्टरी  भरपूर फीचर्स उपलब्ध असलेला व्हिडीओ फॉरमॅटिंगचा मोफत उपलब्ध असलेला हा आणखी एक पर्याय आहे .याचा इंटरफेस थोडा गोंधळात टाकणारा असला तरी यामध्ये कन्व्हर्जनचे शेकडो पर्याय मिळतात आणि कन्व्हर्टझालेले सर्व व्हिडीओ एकसारखेच वाटतात . यामध्ये खराब झालेला ऑडिओ - व्हिडीओ दुरूस्त करण्याचीही सोयआहे . स्वतंत्रपणे मोबाइलसाठी किंवा डीव्हीडीसाठीही व्हिडीओ कन्व्हर्ट करण्याचा पर्याय यात आधीपासूनचउपलब्ध आहे .  हँडब्रेक  हँडब्रेकचे मूळ कामच व्हिडीओ कन्व्हर्जन आणि ट्रान्सकोडिंग आहे . याव्यतिरिक्तही अनेक ऑप्शन्स यामध्येउपलब्ध आहेत . पण यावर कन्व्हर्ट केलेला व्हिडीओ कुठलीही स्क्रीन , कुठल्याही डिव्हाइसवर सहज प्ले होतो .विंडोज , ओएस आणि लिनक्स अशा तिन्ही प्लॅटफॉर्मवर उपलब्ध असलेले हे एक मोफत सॉफ्टवेअर आहे .  फ्रीमेक व्हिडीओ कन्व्हर्टर  नावाप्रमाणे मोफत असलेल्या या कन्व्हर्टरमध्ये अनेक आकर्षक ऑप्शन अंतर्भूत आहेत . २००हून अधिक व्हिडीओफॉरमॅटला सपोर्ट करणारा हा कन्व्हर्टर तुम्हाला माहिती असलेल्या जवळपास सर्व फॉरमॅटचे व्हिडीओ कन्व्हर्टकरतो . अगदी ऑनलाइन व्हिडीओ एमपी३मध्येही . यामध्ये आयओएस , अँड्रॉइड डिव्हाइस , टॅबलेट्स , गेमकन्सोल आणि इतर अनेक डिव्हाइससाठी सुरुवातीपासूनच सेटिंग्ज देण्यात आल्या आहेत . त्या नको असतील तरस्वतःही सेटिंग्ज तुम्ही निर्माण करू शकतात .  सुपर  सुपर हा एक चांगला व्हिडीओ कन्व्हर्टर असला तरी त्याला असलेल्या रेटिंग तितक्याशा चांगल्या नाहीत . पणएकदा का वापरण्याची सवय झाली की मग दुसरा कुठला कन्व्हर्टर वापरण्याची इच्छा होणार नाही . यामध्येउपलब्ध असलेल्या फिचर्सची यादी पानभर असली तरी यात इतक्या प्रकारचे व्हिडीओ कन्व्हर्ट होऊ शकतात कीअतिरिक्त फिचर्सची गरज पडणार नाही . तुम्हाला तुमचा व्हिडीओ पूर्ण नियंत्रणात हवा असेल तर यासारखामोफत कन्व्हर्टर नाही . 

‘सॅमसंग’, ‘मोझिला’चे नवे ब्राउजर : लवकरच ‘सर्वो’ ब्राउजर लाँच करणार

इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या उत्पादनातील अग्रणी 'सॅमसंग' आणि ब्राउजरच्या दुनियेतील 'मोझिला' यांच्यातर्फे संयुक्तपणे नवे वेब ब्राउजर सादर करण्यात येणार आहे. 'सर्वो' या नावाने...

Page 5 of 7 1 4 5 6 7
ADVERTISEMENT
error: Content is protected!