Tag: Tags

हॅशटॅग वापरण्यासाठी खास टिप्स

फेसबुकमध्येही सुरू झालेल्या हॅशटॅगच्या सुविधेचा वापरअनेकांनी सुरू केला आहे . इतरही अनेक साइटवरही हीसुविधा उपलब्ध आहे . मात्र हॅशटॅग नेमका कशासाठीवापरायचा , हे अनेकांना माहिती नसते . हॅशटॅगच्यावापराबाबतच्या या काही खास टिप्स ... हॅशटॅगमध्ये काय ? हॅशटॅग म्हणजे हॅश (#) चिन्हापुढे सलग स्पेस न देतालिहिलेला शब्द किंवा शब्दसमूह . हा हॅशटॅग एकक्लिकेबल लिंक तयार करतो , ज्यामार्फत आपण तो शब्दहॅश चिन्हाने टॅग केलेल्या सर्व पोस्ट पाहू शकता . आपणजेव्हा हॅशटॅगवर क्लिक करतो , तेव्हा एक वेगळे पेज (लिंक ) ओपन होते . यामध्ये त्या विषयावर लोकांनी कायपोस्ट केल्या आहेत , हे आपल्याला पाहता येते . एखादा शब्द हॅशटॅगमध्ये जास्त वापरला गेल्यास तो त्यासाइटवरील ट्रेण्ड बनतो . हॅशटॅगमध्ये काय असावे ? हॅशटॅगमध्ये लोअर केस आणि अप्पर केस किंवा अंकांचा ( पहिले अक्षर वगळता ) समावेश असतो . स्पेशलकॅरेक्टर्सना हॅशटॅगमध्ये ग्राह्य धरले जात नाही . स्पेशल कॅरेक्टर वापरल्यास हॅशटॅग संपतो . उदा . जर #three$असा हॅशटॅग वापरला , तर फक्त #three एवढाच शब्द ग्राह्य धरला जातो . त्यामुळे #three$ ऐवजी#threedollar असा हॅशटॅग वापरावा . जास्त हॅशटॅग वापरू नका तुम्हाला कितीही महत्त्वाची माहिती सांगायची असली , तरी कमीत कमी हॅशटॅग वापरण्याचा प्रयत्न करा . काहीसाइट्सनी स्वत : च हॅशटॅगच्या वापरावर बंधने घातली आहेत . उदा . इन्स्टाग्रामवर जास्तीत जास्त ३० हॅशटॅगवापरता येतात . मात्र इन्स्टाग्रामवर जास्तीत जास्त ६ हॅशटॅग वापरलेले चांगले . तर फेसबुक , ट्विटर ,पिनट्रेस , टम्बलरसारख्या साइट्सवर जास्तीत जास्त दोन ते तीन हॅशटॅग वापरल्यास पोस्ट शॉर्ट अॅण्ड स्विटदिसते . हॅशटॅग कसा निवडावा ? या आधी कोणता हॅशटॅग वापरण्यात आला आहे , यावरही हॅशटॅगचा वापर अवलंबून असतो . आधीपासूनट्रेण्डमध्ये असणारा हॅशटॅग वापरल्यास त्या हॅशटॅगशी संबंधित इतर चर्चाही एका क्लिकवर पाहता येऊ शकतात. त्या विशिष्ट विषयाच्या संदर्भात माहितीशी तुमचा हॅशटॅग असेल , याची विशेष काळजी घेतल्यास तुमचे मतअनेकांपर्यंत पोहचते . जे हॅशटॅग ट्रेण्डमध्ये नाहीत किंवा ज्यांचा तुमच्या विषयाशी थेट संबंध नाही , असे हॅशटॅगशक्यतो वापरू नयेत . सर्चबॉक्समध्ये तुम्हाला हवा असणारा हॅशटॅग सर्च करून तो किती पॉप्युलर आहे , हेतपासून पाहता येते . हॅशटॅग जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचला पाहिजे , हे लक्षात घेऊन हॅशटॅगची निवडकरा . सर्व प्लॅटफॉर्मवर सातत्य राखा हॅशटॅग वापरण्याचा सर्वात चांगला मार्ग म्हणजे , सर्वच सोशल नेटवर्किंग साईट्सवर एकाच प्रकारचे हॅशटॅगवापरणे . तुम्हाला एखादे कॅम्पेन करायचे असेल , तर ट्विटर , फेसबुक , इन्स्टाग्रामवर एकच हॅशटॅग वापरणेअपेक्षित आहे . उदा . #thankyousachin हा हॅशटॅग सर्वच साइट्सवर वापरल्यास हा हॅशटॅग असणाऱ्या सर्वचपोस्ट एका क्लिकवर दिसतील . यामुळे तुम्हाला स्वत : ला माहिती शोधणे तसेच तुमच्या फॉलोअर्सना इतरसाइटवर केलेल्या पोस्टशी संदर्भ लावणे सोपे होते .

ADVERTISEMENT
error: Content is protected!