Tag: Videocon

सात हजारांहून कमी किंमत असलेल्या अँड्रॉइडफोनची झलक

दिवसेंदिवस मोबाइल फोनच्या बाजारात दाखल होणाऱ्या नवनवीन उत्पादनांमुळे किंमतीचा मुद्दा तसा बाजूलाच फेकला गेला आहे . सातत्याने घटणाऱ्या किमतींमुळे फीचरफोन आणि स्मार्ट फोन यांच्यातील सीमारेषा  जवळजवळ पुसून टाकली आहे . किमान किंमतीपेक्षा थोडा अधिक खिसा रिकामा करण्याची तयारी आणि ब्रँडचे दडपणझुगारले , की तुमच्या पसंतीचा आणि बजेटमधील मोबाइल तुमचा होऊ शकतो . सध्या बाजारात नोकिया (मायक्रोसॉफ्ट ), सॅमसंग , अॅपल , एलजी , सोनी ,ब्लॅकबेरी आणि एचटीसी या ब्रँडेड कंपन्यांशिवाय अन्य कंपन्यांचेही तुलनेने स्वस्त आणि हायब्रँडच्या जवळपास फीचर्स असणारे मोबाइल अत्यंत कमी किंमतीत उपलब्ध आहेत . सात हजारांहून कमी किंमत असलेल्या अँड्रॉइडफोनची ही झलक ... व्हिडिओकॉन ए २४  दिसायला देखणा .. ही व्हिडिओकॉन ए २४ची खासियतम्हणावी लागेल . स्लीम बॉडी आणि दोन रंगांतीलप्लास्टिक केस . याचा डिस्प्ले अधिक मोठा आहे . व्हॉइसकॉलचा दर्जा आणि ओव्हरऑल नेटवर्क कव्हरेज उत्तम आहे. फीचर्स : अँड्रॉइड ४ . २ . २ , ४ इंची टचस्क्रीन ( ८०० *४८० पिक्सेल ), १ . २ गिगाहर्ट्झ ड्युअल कोअर प्रोसेसर, २५६ एमबी रॅम , ५१२ एमबी इंटर्नल मेमरी (३२जीबीपर्यंत वाढविता येऊ शकते .) रीअर कॅमेरा ३ . २मेगापिक्सल , फ्रंट व्हीजीए कॅमेरा , ड्युअल सिम ,वायफाय , ब्लूटूथ , १४५० एमएएच ( मिली अॅम्पिअर परतास ) क्षमतेची लिथियम आयन बॅटरी ७२० पी क्षमतेचे व्हिडीओ अत्यंत सुरळीत आणि विनाअडथळा चालतात . हेडफोनवर ऑडिओ अत्यंत सुस्पष्ट आणि मोठ्या आवाजात ऐकू येतात . कमतरता : ३जी सपोर्ट नाही , फक्त २५६ एमबीची रॅम , कमी पिक्सेलच्या कॅमेऱ्यामुळे फोटोमध्ये शार्पनेस कमी आढळतो . कार्बन स्मार्ट ए २६  टचस्क्रीन , बॅक स्टेनलेस स्टील कव्हर आणि बॅकलाइट टच बटणामुळे कार्बन स्मार्ट ए २६चे सौंदर्य खुलते . फीचर्स : ...

स्टायलिश… ‘स्मार्ट टीव्ही’

आपल्याकडे सणासुदीचे विशेष महत्व आहे. याच सणासुदीच्या नि​मित्ताने हल्ली इलेक्ट्रॉनिक अप्लायन्सेस घरी आणण्याचा ' ट्रेंड ' वाढीस लागला आहे. इलेक्ट्रॉनिक अप्लायन्सेसच्या बाजारात वर्षभर कायम ...

टॅब्लेटच्या दुनियेतील स्वस्त ‘देसी तडका’

गुगल असो की अॅपल , सॅमसंग असो की एचटीसीसारख्या मल्टिनॅशनल कंपन्या किंवा मायक्रोमॅक्स , कार्बन आणि झिंकसारख्या भारतीय कंपन्याही असोत. आजघडीला स्मार्टफोन निर्मितीत असणाऱ्या ...

ADVERTISEMENT
error: Content is protected!