Tag: Windows

आठवी खिडकी विंडोज ८ ‘ मोबाइल नोकिया ल्युमिया

डेस्कटॉप , लॅपटॉपमध्ये लोकप्रिय ठरत असलेल्या ' विंडोज ८ ' ची मोबाइल आवृत्ती नोकियाने बाजारात आणली आहे. नोकिया ल्युमिया ९२० , नोकिया ल्युमिया ८२० आणि नोकिया ल्युमिया ६२० ...

नोकियाच्या टॅबलेटला दोन बॅटरी?

सरते वर्ष कोणत्या गोष्टीचे ठरले , तर स्मार्टफोन आणि टॅबलेटचे , असे म्हणायला हरकत नाही. स्मार्टफोनच्या विक्रीने नवे आकडे दाखविले. नोटबुक आणि नेटबुकला असणारा ...

आयफोन की अँड्रॉइड

नवीन मोबाइल घेताना नेहमी प्रश्न पडतो कोणता घ्यावा ? अँड्रॉइड की आयफोन ? त्यातही महागडा फोन घ्यायचा तर गोंधळ आणखीनच वाढतो . सॅमसंग गॅलक्सी एस ३ आणि आयफोन पैकी कशाची निवड करावी ते कळतच नाही .दोन्ही त्यांच्या ठिकाणी ग्रेट आहेत , पण मग निवड कशी करायची ? तेव्हा निवड करताना सर्वात आधी पहा ते तुमचा मोबाइल ऑपरेटर . तसेच तुमच्या गरजेच्या अॅप्स आणि इतर गोष्टी कुठे आहेत तेही पहा . कारण एकदा का खरेदी झाली की स्विच करणे आर्थिक आणि मानसिक दोन्ही दृष्टीने त्रासदायक असते  आयफोन  मोठ्या प्रमाणात चांगल्या अॅप्सची उपलब्धता हे आयफोनचं सर्वात मोठं वैशिष्ट्य आहे . अॅपलच्या अॅप स्टोअरवर ७ लाखाहून अधिक अॅप्स उपलब्ध आहेत . ब - याचशा प्रस्थापित कंपन्या सुरुवातीला आयफोनसाठी अॅप बनवतात नंतर अँड्रॉइडसाठी . कितीतरी काळ इन्स्टाग्राम फक्त आयफोनसाठीच उपलब्ध होतं . फेसबुकनेही त्यांचं नवीन अॅप सुरुवातीला फक्त आयफोनसाठी उपलब्ध करून दिलं नंतर अँड्रॉइडसाठी . ट्विटर आणि फेसबुकचे आयफोन अॅप अतिशय उत्तम आहेत . त्यामुळे पोस्ट टाकणं अगदीचसहज होतं . पासबुकसारखी काही आयफोनसाठीच बनविलेली अॅपही याठिकाणी आहेत . मोबाइल पेमेंट क्षेत्रात कार्यरत असलेल्या स्क्वेअर कंपनीने त्यासाठी ही सुविधा देऊ केली आहे . याच्या सेटअपसाठी खूप वेळ लागत असला तरी फायदेही आहेतच . सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुम्ही अॅपलच्या सिस्टीममध्ये उदा . की - बोर्ड बदलण्यासारखे फारसे बदल करू शकत नाहीत . त्यामुळे टेक सॅव्ही नसलेल्या किंवा ज्यांना फारसे बदल करायचे नसतील त्यांना याचा फायदा होतो .  अँड्रॉइड  अँड्रॉइडचा सर्वात मोठा प्लसपॉइंट म्हणजे विपुल प्रमाणात उपलब्ध असलेले मोबाइल्स . सँमसंग , एलजी ,मायक्रोमॅक्सपासून कितीतरी कंपन्यांचे अँड्रॉइड फोन बाजारात उपलब्ध आहेत . अगदी गुगलचा नेक्ससही तुमच्यासाठी हजर आहे . अँड्रॉइडचा दुसरा महत्त्वाचा फायदा म्हणजे , तुम्हाला गरजेप्रमाणे यात बदल करता येतात . उदा . स्विफ्ट की हे प्ले स्टोअरवर उपलब्ध असलेले एक आघाडीचे अॅप आहे . यात तुम्ही गरजेप्रमाणे की- बोर्ड बदलू शकता किंवा तुम्ही कोणता शब्द टाइप करणार याचा अंदाज हे सॉफ्टवेअर व्यक्त करते . त्यातून टायपिंग जलद होऊ शकते . आणखी एक गोष्ट म्हणजे याठिकाणी उपलब्ध असलेल्या विविध प्रकारच्या अॅप्स .अॅपल अॅप्स ही डेव्हलपरची पहिली पसंत असली तरी कित्येक अॅप्सला अॅपल मंजुरीच देत नाही . गुगलचं तसं नाही . त्यामुळे गुगलवरही जवळपास ७ लाख अॅप्स आहेत . विंडोज फोन आणि ब्लॅकबेरी हे देखील काही पर्याय आहेत . पण त्यांना अँड्रॉइड किंवा आयफोन इतक्या अॅप्सपर्यंत पोहोचायला खूप वेळ लागेल .

पीसीचे टॅब्लेटमध्ये रूपांतर करणारे सोनीचे अल्ट्राबुक

सोनी इंडिया या आघाडीच्या कंपनीने नव्या पिढीचा हायब्रीड अल्ट्राबुक पीसी ‘व्हायो ड्युओ 11’ बाजारात आणल्याची घोषणा केली आहे. हा पीसी ...

Page 9 of 10 1 8 9 10
ADVERTISEMENT
error: Content is protected!