MarathiTech - मराठीटेक
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
MarathiTech - मराठीटेक
No Result
View All Result
Home Social Media

ट्विटर अकाऊंट करा स्मार्ट

Sooraj Bagal by Sooraj Bagal
October 15, 2012
in Social Media

फेसबुकचं कव्हर पेज सेट करण्यात सर्वचजण हुश्शार झालेत. पण , फेसबुक सारखेच ट्विटरचेही कव्हर आपल्याला सेट करता येऊ शकतं , याची माहिती फारशा मित्रांपर्यंत पोहोचलेली नाही. त्यामुळेच सर्वांच्या अकाऊंटवर केवळ चिमणीच दिसते आणि ट्विट कोणाचं हे शोधण्यासाठी नाव पहावं लागतं. पण आता फारशी माहिती नसलेल्या ट्विटरच्या या सुविधेची सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे. प्रत्येकाच्या अकाऊंटचं कव्हर असलेली ट्विटरची चिमणी आता नाहीशी होऊ लागली आहे. त्याच्या जागी त्यांचे किंवा इतर फोटो दिसू लागले आहेत. 
 
तुम्हालाही तुमच्या ट्विटरचं कव्हर सेट करायचं असेल तर तुमच्या प्रोफाइलच्या सेटिंग्जमध्ये जा. त्यानंतर एडीट प्रोफाइलमध्ये जा त्यात हेडर आणि फोटो असे दोन पर्याय आहेत. यात फोटो म्हणजे तुमचा फोटो आणि हेडर म्हणजे कव्हर. त्या हेडरमध्ये तुम्ही तुमच्या वेबकॅमच्या मदतीने फोटोही काढू शकतात किंवा तुमच्या कम्पुटरमध्ये सेव्ह असलेला फोटोही त्यात अपलोड करू शकता. फोटो अपलोड झाल्यावर तुम्हाला त्याची स्केल विचारली जाते. कारण त्या स्केलमधील फोटोचं तुमचा हेडर म्हणून दिसणार. एकदा का तुम्ही हेडर सेट केला की तुमचा फोटो ,ट्विटरचा अड्रेस त्या हेडरवर दिसू लागतो. यामुळे तुमच्या प्रोफाइलला एक चांगला लूक येतो. प्रामुख्याने प्रोफेशनल युजर्सनी हा पर्याय वापरण्यास सुरुवात केली आहे. 

 

तुमच्या ट्विटर अकाऊंटचं डिझाइनही तुम्ही बदलू शकता अगदी जीमेल सारखं. यासाठी तुम्हाला सेटिंग्जमध्ये जाऊन डिझाइनमध्ये जावं लागेल. तिथे तुम्ही तुमच्या आवडीची डिझाईन निवडली की चेंज background मध्ये जायचं. तिथे तुम्ही निवडलेली डिझाइन सेट झाली की तुमचं काम झालं. या डिझाइनसाठी पण तुम्ही तुमच्या कम्प्युटरमध्ये सेव्ह केलेला एखादा फोटो किंवा डिझाइनही वापरू शकता. ट्विटरच्या या नव्या लूक बद्दल लोकांना अनेक चांगल्या कमेंट्स मिळू लागल्या आहते. यामुळे सर्वांचे सारखेच दिसणाऱ्या ट्विटर अकाऊंटपासून आपल्याला थोडीशी सुटका मिळणार आहे. तसेच फेसबुक , जीमेलबरोबरच ट्विटर अकाऊंटही स्मार्ट होऊ लागणार आहेत. 

ट्विटरमध्ये तुम्हाला तुमच्याविषयी थोडक्यात माहिती देता येते. त्यासाठी केवळ १४० शब्दात तुम्हाला स्वतःला व्यक्त करावे लागते. ही जागा तुम्हाला कमी पडत असेल तर त्यांना अधिक कल्पना लढविण्यासाठी वाव देऊ नका. त्यांना तुमच्या फेसबुक पेजची किंवा पर्सनल वेबसाइटची लिंक द्या आणि तुमच्याविषयी अधिकाधिक लोकांना जाणून घेऊ द्या. ट्विटरवर विविध ठिकाणांनुसार काही विशिष्ट फिचर्स , ट्रेण्ड येतात. त्यासाठी तुम्हीही तुमचे शहर अॅड करा आणि ट्रेण्डमध्ये सहभागी व्हा. 

ADVERTISEMENT

Tags: SecurityTwitter
ShareTweetSend
Previous Post

गुगल झाले १४ वर्षाचे!

Next Post

बखर ई-मेलची

Sooraj Bagal

Sooraj Bagal

Related Posts

Community Notes India

X (ट्विटर) वरील Community Notes आता भारतात उपलब्ध!

April 4, 2024
ट्विटरचा आजपासून निळ्या चिमणीऐवजी नवा 𝕏 लोगो!

ट्विटरचा आजपासून निळ्या चिमणीऐवजी नवा 𝕏 लोगो!

July 24, 2023
ट्विटर ब्ल्यु भारतात उपलब्ध होण्यास सुरुवात!

ट्विटर ब्ल्यु भारतात उपलब्ध होण्यास सुरुवात!

February 9, 2023
ट्विटर हॅक : बराक ओबामा, बिल गेट्ससारख्या प्रसिद्ध व्यक्तींची अकाऊंट्स हॅक!

२० कोटी ट्विटर यूजर्सचा डेटा हॅक : डेटा हॅकर्सकडून प्रकाशित!

January 6, 2023
Next Post

बखर ई-मेलची

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ADVERTISEMENT
ॲपलने मॅकबुक, आयपॅडच्या आणि इतर प्रॉडक्टच्या किंमती वाढवल्या

ॲपलने मॅकबुक, आयपॅडच्या आणि इतर प्रॉडक्टच्या किंमती वाढवल्या

June 25, 2026
WhatsApp CEO Kunal Shah

CRED चे संस्थापक कुणाल शहा आता WhatsApp चे सीईओ!

June 25, 2026
Google Workspace New App Icons

गूगलच्या वर्कस्पेस अ‍ॅप्समध्ये नवीन आयकॉन्स

May 29, 2026
Freepik Is Now Magnific

Freepik कंपनीचं नवं नाव आता Magnific : स्टॉक फोटोज् व AI टूल्ससाठी प्रसिद्ध

April 29, 2026
MSRTC Timing Check Marathi

एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

September 25, 2012
मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

September 10, 2012
यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

November 4, 2016
ADVERTISEMENT
MarathiTech - मराठीटेक

तंत्रज्ञानाविषयी मराठी भाषेतली प्रसिद्ध वेबसाइट! नवं तंत्रज्ञान, नवनवे फोन्स, ॲप्स यांच्याबद्दल रंजक माहिती...

मराठीटेकला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा

ॲपलने मॅकबुक, आयपॅडच्या आणि इतर प्रॉडक्टच्या किंमती वाढवल्या

ॲपलने मॅकबुक, आयपॅडच्या आणि इतर प्रॉडक्टच्या किंमती वाढवल्या

June 25, 2026
WhatsApp CEO Kunal Shah

CRED चे संस्थापक कुणाल शहा आता WhatsApp चे सीईओ!

June 25, 2026

ॲपलने मॅकबुक, आयपॅडच्या आणि इतर प्रॉडक्टच्या किंमती वाढवल्या

CRED चे संस्थापक कुणाल शहा आता WhatsApp चे सीईओ!

गूगलच्या वर्कस्पेस अ‍ॅप्समध्ये नवीन आयकॉन्स

Freepik कंपनीचं नवं नाव आता Magnific : स्टॉक फोटोज् व AI टूल्ससाठी प्रसिद्ध

ॲपलचे नवे सीईओ जॉन टर्नस : टिम कुक यांच्यानंतर घेणार जबाबदारी!

  • About
  • Advertise
  • Privacy Policy
  • Contact

© MarathiTech 2024 A Product by BagalTech

error: Content is protected!
No Result
View All Result
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • खास लेख
  • गेमिंग
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • शॉपिंग ऑफर्स
  • आमच्याबद्दल About Us
  • संपर्क – प्रतिक्रिया

© MarathiTech 2024 A Product by BagalTech