MarathiTech - मराठीटेक
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
MarathiTech - मराठीटेक
No Result
View All Result
Home टॅब्लेट्स

अ‍ॅपल आयपॅड मिनी लॉंच ! किंमती सुमारे १७ हजार रुपये

Sooraj Bagal by Sooraj Bagal
October 27, 2012
in टॅब्लेट्स
ADVERTISEMENT

PIX: अ‍ॅपल आयपॅड मिनी लॉंच !
iPad.jpg

सप्टेंबर महिन्यात आय फोन फाइव्ह लॉन्च करताना , आपण लवकरच मिनी ऑयपॅड घेऊन येणार असल्याची खुशखबर अॅपलनं टेक – सॅव्ही तरुणांना दिली होती . आपला हा शब्द त्यांनी पाळला असून , मिनी आयपॅडचं दर्शन जगाला घडवले. 

नव्या मिनी आयपॅडची स्क्रीन फक्त ७ . ९ इंचांची आहे . याआधीच्या आयपॅडची स्क्रीन दहा इंचांची होती . ए – ५प्रोसेसर , पाच मेगापिक्सल कॅमेरा , एचडी व्हिडिओ चॅट ही नव्या मिनी आयपॅडची वैशिष्ट्ये आहेत . 

नव्या मिनी आयपॅडचे वाय – फाय मॉडेल ३२९ डॉलर (सुमारे १७ हजार ६७८ रुपये ) किंमतीचे आहे , तर थ्री जी मॉडेलची किमान किंमत ४५९ डॉलर सुमारे २५हजार २०० रुपये  आहे . अॅपलच्या नव्या आयपॅडसाठी २६ ऑक्टोबरपासून बुकिंग सुरू होत आहे . 

नवा मिनी आयपॅड टॅबलेट गूगलच्या नेक्सस – ७ टॅबलेटपेक्षा जास्त उत्तम आहे ; असे अॅपल कंपनीने सांगितले .कंपनीने मिनी आयपॅड टॅबलेट व्यतिरिक्त १३ इंची स्क्रीन आणि ० . ७५ इंची जाडीचे मॅकबुक प्रो देखिल लाँच केले. हे आतापर्यंतचे वजनाने सर्वात हलके मॅकबुक प्रो आहे . 
PIX: अ‍ॅपल आयपॅड मिनी लॉंच !
 अ‍ॅपलने मंगळवारी रात्री उशिरा सॅन जोन्‍स येथे बहुप्रतिक्षित आयपॅड मिनी लॉंच केले. यावेळी अ‍ॅपलचे वरिष्‍ठ उपाध्‍यक्ष फिलिप शिलर यांनी नव्‍या आयपॅड मिनीच्‍या खास फिचर्सची माहिती दिली. येत्‍या 2 नोव्‍हेंबरपासून आयपॅड मिनी बाजारात विक्रीसाठी उपलब्‍ध होईल. मात्र, तो भारतात कधी मिळेल याचा उलगडा अद्याप करण्‍यात आलेला नाही.

PIX: अ‍ॅपल आयपॅड मिनी लॉंच !
स्‍क्रीन/डिस्‍प्‍ले- काळ्या आणि पांढ-या रंगाचे मॉडेल (ब्‍लॅक अँड व्‍हाईट), 7.9 इंचाची स्‍क्रीन, 1024×768 पिक्‍सल डिस्‍प्‍ले, 4जी कन्‍वर्टिबल.

आकार- 7.2 मिमी जाडी, आयपॅडपेक्षा 23% कमी जाडीचा, 308 ग्रॅम वजन, आयपॅडपेक्षा 53% हलका.

अ‍ॅप्‍स- 2.75 लाख अ‍ॅप्लिकेशन, फोटोंना एडिटिंग आणि शेअरिंग करणे सोपे, 1080 पिक्‍सल एचडी रेकॉर्डिंग करण्‍याची क्षमता.

डुएल कोअर ए5 चिपमुळे एकाचवेळी अनेक कामे करण्‍याची सुविधा, 10 तासांचा बॅटरी बॅकअप.

PIX: अ‍ॅपल आयपॅड मिनी लॉंच !

फेसटाईम आणि आयसाईट कॅमेरा
समोरच्‍या बाजूस फेसटाईम 720 पीएचडी कॅमेरामुळे व्हिडिओ कॉलिंगदरम्‍यान उत्‍कृष्‍ट दर्जाचे चित्रिकरण. त्‍याच्‍या मदतीने रेकॉर्डिंग आणि स्टिल फोटो चांगल्‍या पद्धतीने काढता येऊ शकतो. मागच्‍या बाजूस 1080 पिक्‍सल एचडी आयसाईट कॅमेरा आहे. ऑटोमॅटिक व्हिडिओ स्‍टेबलायजेशनमुळे आयपॅड हलल्‍यानंतरही व्हिडिओमध्‍ये शेक होणार नाही.  5 मेगापिक्‍सलचा स्टिल कॅमेराचीही सुविधा आहे.

नेक्‍स्‍ट जनरेशन मोबाईल कनेक्टिव्हिटी
तुमच्‍याकडे वायफाय नसेल तरीसुद्धा मोबाईल नेटवर्कशी कनेक्‍ट करता येऊ शकते. यासाठी फक्‍त वायफाय/सेल्‍यूलर मॉडेल असण्‍याची गरज आहे. मोबाईल नेटवर्कनेही चांगल्‍या स्‍पीडचे इंटरनेट चालू शकेल.
अ‍ॅडव्‍हान्‍स वायफाय टेक्‍नॉलॉजी
आयपॅड मिनीमध्‍ये वायफायचा वेग जुन्‍या मॉडेलपेक्षा दुप्‍पट आहे. 150 एमबीपीएसच्‍या गतीने डाऊनलोडिंग करता येईल.आयक्‍लाऊड
हे आयपॅड मिनीमध्‍ये सुरूवातीपासून इन्‍स्‍टॉल करण्‍यात आलेले आहे.

PIX: अ‍ॅपल आयपॅड मिनी लॉंच !
स्‍टोरेज क्षमतेनुसार इतर मॉडेलच्‍या किंमती

16 जीबी (वायफाय)- 329 डॉलर (सुमारे 17437/-रूपये)

16 जीबी (वायफाय/सेल्‍यूलर)- 429 डॉलर (सुमारे 24327/-रूपये)

64 जीबी (वायफाय)- 529 डॉलर (सुमारे 28037/-रूपये)

64 जीबी (वायफाय/सेल्‍यूलर)- 659 डॉलर (सुमारे 34927/- रूपये)
Tags: AppleiPadTablets
ShareTweetSend
Previous Post

स्मार्टफोनधारकांची संख्या पोहोचली एक अब्जावर

Next Post

वेबसाइट खेळ होणार मल्टिडायमेन्शनल

Sooraj Bagal

Sooraj Bagal

Related Posts

iPhone Duo

iPhone Duo : ॲपलचा पहिला Foldable आयफोन 18 Pro सोबत सादर!

September 10, 2026
ॲपलने मॅकबुक, आयपॅडच्या आणि इतर प्रॉडक्टच्या किंमती वाढवल्या

ॲपलने मॅकबुक, आयपॅडच्या आणि इतर प्रॉडक्टच्या किंमती वाढवल्या

June 25, 2026
Apple New CEO John Ternus

ॲपलचे नवे सीईओ जॉन टर्नस : टिम कुक यांच्यानंतर घेणार जबाबदारी!

April 25, 2026
Apple MacBook Neo

ॲपलचा सर्वात स्वस्त लॅपटॉप MacBook Neo सादर!

March 4, 2026
Next Post
वेबसाइट खेळ होणार मल्टिडायमेन्शनल

वेबसाइट खेळ होणार मल्टिडायमेन्शनल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ADVERTISEMENT
iPhone Duo

iPhone Duo : ॲपलचा पहिला Foldable आयफोन 18 Pro सोबत सादर!

September 10, 2026
GTA VI चा Extended Look २६ मिनिटांचा गेमप्ले व्हिडिओ आता उपलब्ध!

GTA VI चा Extended Look २६ मिनिटांचा गेमप्ले व्हिडिओ आता उपलब्ध!

August 28, 2026
सॅमसंग Galaxy Z Fold8 Ultra, Fold8, Flip8, Watch Ultra2, Watch9 सादर

सॅमसंग Galaxy Z Fold8 Ultra, Fold8, Flip8, Watch Ultra2, Watch9 सादर

July 24, 2026
Skyroot Vikram 1

Skyroot च्या Vikram-1 या भारताच्या पहिल्या खासगी ऑर्बिटल रॉकेटचे यशस्वी प्रक्षेपण!

July 24, 2026
MSRTC Timing Check Marathi

एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

September 25, 2012
यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

November 4, 2016
GTA VI चा Extended Look २६ मिनिटांचा गेमप्ले व्हिडिओ आता उपलब्ध!

GTA VI चा Extended Look २६ मिनिटांचा गेमप्ले व्हिडिओ आता उपलब्ध!

August 28, 2026
ADVERTISEMENT
MarathiTech - मराठीटेक

तंत्रज्ञानाविषयी मराठी भाषेतली प्रसिद्ध वेबसाइट! नवं तंत्रज्ञान, नवनवे फोन्स, ॲप्स यांच्याबद्दल रंजक माहिती...

मराठीटेकला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा

iPhone Duo

iPhone Duo : ॲपलचा पहिला Foldable आयफोन 18 Pro सोबत सादर!

September 10, 2026
GTA VI चा Extended Look २६ मिनिटांचा गेमप्ले व्हिडिओ आता उपलब्ध!

GTA VI चा Extended Look २६ मिनिटांचा गेमप्ले व्हिडिओ आता उपलब्ध!

August 28, 2026

iPhone Duo : ॲपलचा पहिला Foldable आयफोन 18 Pro सोबत सादर!

GTA VI चा Extended Look २६ मिनिटांचा गेमप्ले व्हिडिओ आता उपलब्ध!

सॅमसंग Galaxy Z Fold8 Ultra, Fold8, Flip8, Watch Ultra2, Watch9 सादर

Skyroot च्या Vikram-1 या भारताच्या पहिल्या खासगी ऑर्बिटल रॉकेटचे यशस्वी प्रक्षेपण!

ॲपलने मॅकबुक, आयपॅडच्या आणि इतर प्रॉडक्टच्या किंमती वाढवल्या

  • About
  • Advertise
  • Privacy Policy
  • Contact

© MarathiTech 2024 A Product by BagalTech

error: Content is protected!
No Result
View All Result
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • खास लेख
  • गेमिंग
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • शॉपिंग ऑफर्स
  • आमच्याबद्दल About Us
  • संपर्क – प्रतिक्रिया

© MarathiTech 2024 A Product by BagalTech