MarathiTech - मराठीटेक
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
  • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
  • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
MarathiTech - मराठीटेक
No Result
View All Result
Home गेमिंग

वेबसाइट खेळ होणार मल्टिडायमेन्शनल

Sooraj Bagal by Sooraj Bagal
October 29, 2012
in गेमिंग, ॲप्स

इंटरनेटच्या महाजालातील वेबसाइट मल्टिडायमेन्शनल व्हाव्यात , यासाठी मोठ्या प्रमाणावर चाललेल्या प्रयत्नांना लवकरच मूर्त रूप मिळणार असून ‘ मल्टिडायमेन्शनल वेबसाइट्स ‘ ही संकल्पना लवकरच प्रत्यक्षात येणार आहे .२६ ऑक्टोबरला सादर होणारे इंटरनेट एक्स्प्लोअरर १० आणि विंडोज ८ यांच्या वेगवेगळ्या फीचर्सची झलक ‘कॉन्टर जूर ‘ या गेमने नुकतीच दाखवली . केवळ स्मार्टफोन आणि टॅब्लेटमध्येच असणाऱ्या या गेमने आता वेबवर एन्ट्री केली आहे . त्यामुळे अॅप्सना वेबचे दरवाजे खुले झाले आहेत . टचस्क्रीनचा समावेश असल्याने वेबवर हा गेमखेळताना नक्कीच वेगळ्याच विश्वात गेल्यासारखे वाटेल . 

‘ कॉन्टर जूर ‘ हा खेळ म्हणजे वेबची मजल कुठपर्यंत जाईल याची झलक आहे , अशी प्रतिक्रिया इंटरनेट एक्स्प्लोअररचे जनरल मॅनेजर रायान गाविन यांनी दिली . अॅप्सप्रमाणेच वेबसाइट या अधिक ‘ यूजफूल ‘ असतात, हे दाखवण्यासाठी ‘ मायक्रोसॉफ्ट ‘ ने ‘ आयफोन ‘ आणि ‘ आयपॅड ‘ वरील ‘ कॉन्टर जूर ‘ हा गेम ‘ ऑनलाइन ‘स्वरुपात आणला आहे . इंटरनेट एक्स्प्लोअरर १० चे वेब ब्राउझिंग कसे असेल , याचाही अंदाज त्यांनी त्यामधूनदिला आहे . 

हा गेम भौतिकशास्त्रावर आणि ‘ द लिटल प्रिन्स ‘ या कादंबरीवर आधारित आहे . व्हिडिओ गेमच्या धर्तीवर असलेल्या बटनांद्वारे त्यांनी खेळ खेळून दाखवला . जमिनीचा काही भाग वर किंवा खाली करून त्यांनी यागेममधील ‘ पेटिट ‘ या कॅरॅक्टरला त्या अडथळ्यांवरून जायला सांगितले . विंडोज ८ वर आयई १०च्या सहाय्यानेया गेमचे अतिशय उत्कृष्ट असे सादरीकरण झाले . जवळपास दोन्ही हातांच्या सर्व म्हणजे दहा बोटांनी एकाच वेळी कमांड दिली , तरी त्याची अमलबजावणी करण्याची क्षमता या प्रोग्रॅममध्ये आहे . गेमच्या तिसऱ्या लेव्हलला खेळताना प्लेयरला टच स्क्रीनवर किमान तीन बोटांचा वापर करावा लागतो . हा खेळ ऑनलाइन होणे म्हणजे स्मार्टफोन आणि टॅब्लेटमधील ‘ अॅप्स ‘ ना वेबचे दरवाजे खुले होण्यासारखेच आहे . यासंदर्भात गाविन म्हणाले ,आजचे वेब हे उद्याचे नसेल . अधिकाधिक सुंदर , आकर्षक वेबसाइट्स लोक पाहत जातील . यामध्ये टच स्क्रीनचाही समावेश असेल . वेब हे आजच्यासारखे ‘ वन डायमेन्शनल ‘ नसेल , हे लोकांना दाखवून देण्याचेच आमचे काम आहे. मात्र टच स्क्रीनचा वापर आला , तरी ब्राउझिंगसाठी माऊसवर अवलंबून राहावे लागणार आहे , अशी खंत त्यांनी व्यक्त केली .

ADVERTISEMENT
Tags: AppsGamingInternetMicrosoftSoftwares
ShareTweetSend
Previous Post

अ‍ॅपल आयपॅड मिनी लॉंच ! किंमती सुमारे १७ हजार रुपये

Next Post

इंटरनेटची साथ प्रगतीला

Sooraj Bagal

Sooraj Bagal

Related Posts

Telegram Premium

टेलिग्राम प्रीमियम उपलब्ध : दुप्पट लिमिट्स, जाहिराती नाही, खास स्टीकर्स, खास सोयी!

June 20, 2022
Internet Explorer Retiring

इंटरनेट एक्सप्लोरर ब्राऊजर आजपासून बंद होणार!

June 15, 2022
Xbox Games Showcase

एक्सबॉक्सवर येत्या वर्षात उपलब्ध होणाऱ्या गेम्स जाहीर : स्टारफील्ड, Diablo 4, इ.

June 13, 2022
Instagram 90 Second Reel Stickers

इंस्टाग्रामवर आता ९० सेकंदांच्या रील्स बनवता येणार : सोबत अनेक नव्या सोयी!

June 3, 2022
Next Post

इंटरनेटची साथ प्रगतीला

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ADVERTISEMENT
Moto G42 भारतात सादर : AMOLED डिस्प्ले, 50MP कॅमेरा!

Moto G42 भारतात सादर : AMOLED डिस्प्ले, 50MP कॅमेरा!

July 4, 2022
Poco F4 5G

Poco F4 5G भारतात सादर : SD870, AMOLED डिस्प्ले आणि किंमतही कमी!

June 24, 2022
Telegram Premium

टेलिग्राम प्रीमियम उपलब्ध : दुप्पट लिमिट्स, जाहिराती नाही, खास स्टीकर्स, खास सोयी!

June 20, 2022
Internet Explorer Retiring

इंटरनेट एक्सप्लोरर ब्राऊजर आजपासून बंद होणार!

June 15, 2022
एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

September 25, 2012
यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

November 4, 2016
मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

September 10, 2012
ADVERTISEMENT
MarathiTech – मराठीटेक

तंत्रज्ञानाविषयी मराठी भाषेतली प्रसिद्ध वेबसाइट! नवं तंत्रज्ञान, नवनवे फोन्स, ॲप्स यांच्याबद्दल रंजक माहिती...

मराठीटेकला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा

Moto G42 भारतात सादर : AMOLED डिस्प्ले, 50MP कॅमेरा!

Moto G42 भारतात सादर : AMOLED डिस्प्ले, 50MP कॅमेरा!

July 4, 2022
Poco F4 5G

Poco F4 5G भारतात सादर : SD870, AMOLED डिस्प्ले आणि किंमतही कमी!

June 24, 2022

Moto G42 भारतात सादर : AMOLED डिस्प्ले, 50MP कॅमेरा!

Poco F4 5G भारतात सादर : SD870, AMOLED डिस्प्ले आणि किंमतही कमी!

टेलिग्राम प्रीमियम उपलब्ध : दुप्पट लिमिट्स, जाहिराती नाही, खास स्टीकर्स, खास सोयी!

इंटरनेट एक्सप्लोरर ब्राऊजर आजपासून बंद होणार!

एक्सबॉक्सवर येत्या वर्षात उपलब्ध होणाऱ्या गेम्स जाहीर : स्टारफील्ड, Diablo 4, इ.

  • About
  • Advertise
  • Privacy Policy
  • Contact

© MarathiTech 2022 A Product by BagalTech

No Result
View All Result
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • खास लेख
  • गेमिंग
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • शॉपिंग ऑफर्स
  • आमच्याबद्दल About Us
  • संपर्क – प्रतिक्रिया

© MarathiTech 2022 A Product by BagalTech

error: Content is protected!