MarathiTech - मराठीटेक
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
MarathiTech - मराठीटेक
No Result
View All Result
Home स्मार्टफोन्स

ऑक्‍टोबरमध्‍ये लॉंच झाले हे स्‍मार्टफोन

Sooraj Bagal by Sooraj Bagal
November 12, 2012
in स्मार्टफोन्स
PHOTOS: ऑक्‍टोबरमध्‍ये लॉंच झाले हे स्‍मार्टफोन
सर्व भारतीयांचा आवडता दिवाळी सण काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. या उत्‍सव काळात प्रत्‍येकाकडून मोठया प्रमाणात खरेदी केली जाते. मोठमोठया कंपन्‍यांही आपले नवे उत्‍पादन याच कालावधीत सादर करण्‍याचा प्रयत्‍न करीत असतात. असाच काहीसा उत्‍साह गॅझेट बाजारात मोबाईल कंपन्‍यांमध्‍ये आहे. अव्‍वल मोबाईल कंपन्‍यांनी नवे मोबाईल लॉंचही केले आहेत. आणि काहींनी लॉंच करण्‍याची तयारीही केली आहे.
PHOTOS: ऑक्‍टोबरमध्‍ये लॉंच झाले हे स्‍मार्टफोन
सोनी एक्‍सपारिया जे
भारतीय बाजारपेठेत सोनी कंपनीने एक्‍सपारिया जे हा नवा स्‍मार्टफोन लॉंच केला आहे. यावर्षी झालेल्‍या मोबाईल वर्ल्‍ड कॉंग्रेसमध्‍ये हा फोन दाखवण्‍यात आला होता. एक्‍सपारिया जे चे डिझाईन हे स्लिकी आहे. याचे हार्डवेअर दमदार आहे. या फोनमध्‍ये प्री-लोडेड आईस्‍क्रीम सँडविच ऑपरेटिंग सिस्‍टीम लावण्‍यात आली आहे. काही दिवसांपूर्वीच सोनीने आपल्‍या काही स्‍मार्टफोनला जेलीबीनने अपग्रेड करणार असल्‍याचे म्‍हटले होते. त्‍यामध्‍ये या मॉडेलचाही समावेश आहे. एक्‍सपारिया जे ला 4 इंचाचा डिस्‍प्‍ले लावण्‍यात आला आहे. 854×480 इतके रिझोल्‍यूशन आहे. या फोनमध्‍ये 4 जीबीची इंटर्नल मेमरी असून ती 32 जीबीपर्यंत वाढवता येऊ शकते. फोनचे प्रोसेसर 1 GHz (सिंगलकॉम स्‍नॅपड्रॅगन M7227A) इतका आहे. LED फ्लॅशसहित 5 मेगापिक्‍सल इतका कॅमेरा चॅटसाठी व्‍हीजीए कॅमेराही देण्‍यात आला आहे. 1,750 mAh ची बॅटरीही लावण्‍यात आली आहे. एक्‍सपारिया जेबरोबर xLoud ऑडिओ, ऑडिओ इक्‍वलायजरची सुविधाही देण्‍यात आली आहे. याची किंमत 18,399 रूपये इतकी आहे. मात्र ऑनलाईन स्‍टोअर्सवर हा कमी किंमतीत मिळू शकतो.

PHOTOS: ऑक्‍टोबरमध्‍ये लॉंच झाले हे स्‍मार्टफोन
आयबॉल अँडी 4.3 जे
आयबॉलने खास सणासुदीचा फायदा घेण्‍यासाठी अँडी 4.3 जे हा नवा स्‍मार्टफोन सादर केला आहे. ड्युएल सिमबरोबर ड्युएल बॅटरीचा असलेला भारतीय बाजारपेठेत सादर झालेला हा पहिलाच फोन आहे. कंपनीने याची किंमत 9,499 रूपये इतकी ठेवली आहे. 4.3 इंचाची कॅपेसिटिव्‍ह टच स्‍क्रीनच्‍या या फोनचा लुक जबरदस्‍त आहे. 1 GHz ARM Cortex A9 प्रोसेसरवर चालणारा हा फोन अँड्राईड 2.3v वर काम करतो.
या फोनचे महत्‍वाचे वैशिष्‍ट्य म्‍हणजे ड्युएल बॅटरी. फोनची पहिली बॅटरी 1,630 mAh आणि दुसरी बॅटरी 900 mAh ची आहे. दोन्‍ही बॅटरी मिळून 2,530 mAh इतकी ताकत आहे. यामुळे प्रवासात या फोनपासून काही अडचण येणार नाही. गेमिंगसाठी हा फोन चांगला आहे.
PHOTOS: ऑक्‍टोबरमध्‍ये लॉंच झाले हे स्‍मार्टफोनLG ऑप्टिमस वू
LG ने गेल्‍यावर्षी मोबाईल वर्ल्‍ड कॉंग्रेसमध्‍ये ऑप्टिमस वू सादर केला होता. कंपनीला फोनच्‍या डिझाईनवर संमिश्र प्रतिक्रिया मिळाली आहे. आता हा फोन कंपनीने हा फोन भारतात सादर केला आहे. ऑप्टिमस वू कंपनीचा टॉपएंड स्‍मार्टफोन आहे. आतापर्यंत आलेल्‍या इतर फोनपेक्षा या फोनच्‍या स्‍क्रीनचा एस्‍पेक्‍ट रे‍शो 4:3 आणि स्‍क्रीन पाच इंचाची आहे. भारतात या फोनची किंमत 34,500 इतकी ठेवण्‍यात आली आहे. 5 इंचाची स्‍क्रीन असलेल्‍या ऑप्टिमस वूमध्‍ये प्‍लेन स्विचिंग टेक्निकचा वापर करण्‍यात आला आहे. या फोनचे रिझोल्‍यूशन 1024×768 इतके आहे. यामध्‍ये उत्‍कृष्‍ट फोटो काढण्‍यासाठी 8 मेगापिक्‍सलाचा कॅमेरा लावण्‍यात आला असून 1.3 मेगापिक्‍सलचा फ्रंट कॅमेरा देण्‍यात आला आहे.
कनेक्टिविटीसाठी 3जी, Wi-Fi, ब्‍ल्‍यूटूथ, A-GPS, NFC सारखे फीचर आहेत. फोन ची इंटरनल मेमोरी 32 जीबी इतकी आहे. ऑप्टिमस वू ची ऑपरेटिंग सिस्टम अँड्राईड  4.0 (ICS) आहे. याच्‍याबरोबर आपल्‍याला अनेक प्री- लोडेड अ‍ॅप्‍स आणि लिहिण्‍यासाठी एक स्टाइलस ही मिळेल.
PHOTOS: ऑक्‍टोबरमध्‍ये लॉंच झाले हे स्‍मार्टफोनLG ऑप्टिमस L5 ड्युएल
आंतरराष्‍ट्रीय बाजारपेठेत LG ऑप्टिमस L5 ड्युएलच्‍या प्रदर्शनानंतर कंपनीने आता हा मोबाईल भारतात उतरविला आहे. हा नवा फोन ड्युएल सिम फिचरचा आहे. ऑनलाईन रिटेल स्‍टोअर फ्लिपकार्टवर LG ऑप्टिमस L5 ड्युएल खरेदीसाठी उपलब्‍ध आहे. या फोनची किंमत 13,499 इतकी ठेवण्‍यात आली आहे. LG च्‍या या स्‍मार्टफोनमध्‍ये 1.5 GHz चा Nvidia Tegra3,4 प्‍लस 1 प्रोसेसर आहे. फोनची रॅम ही 1 जीबी इतकी आणि इंटर्नल स्‍टोरेज 32 जीबी इतकी आहे.
 
ADVERTISEMENT
PHOTOS: ऑक्‍टोबरमध्‍ये लॉंच झाले हे स्‍मार्टफोन
कार्बन
भारतीय कंपनी कार्बनने दोन नवे स्‍मार्टफोन लॉंच केले आहेत. कंपनीच्‍या डुपल मालिकेतील हा दोन ड्युएल सि‍म फोन आहे. कार्बन स्‍मार्ट A9+ आणि कार्बन स्‍मार्ट A21 ची किंमत 9,990 आणि 11,990 रूपये इतकी आहे.
हे दोन्‍ही डिव्‍हाईस एकमेकांपेक्षा थोडेसेच वेगळे आहेत. कार्बन A21 मध्‍ये 4.5 इंचाची HD स्‍क्रीन तर कार्बन A+9 मध्‍ये 4 इंचाची HD स्‍क्रीन आहे. मात्र दोघांचा रिझोल्‍यूशन सारखाच आहे. कार्बन A21 आणि कार्बनA+ दोघांमध्‍येही 1.2 GHz चा डुय्एल कोअर स्‍नॅपड्रॅगन प्रोसेसर काम करतो. A21  मध्‍ये 4 जीबी स्‍टोरेज क्षमता असून ती 32 जीबीपर्यंत वाढवता येते. दोन्‍ही फोनमध्‍ये अँड्राईड 4.0 ऑपरेटिंग सिस्टिम लावण्‍यात आली आहे. पाच मेगापिक्‍सलचा रिअर कॅमेरा ऑटो फोकस फिचर आणि LED फ्लॅशबरोबर 1.3 मेगापिक्‍सलचा फ्रंट कॅमेरा लावण्‍यात आला आहे. कनेक्टिव्हिटीसाठी फोनमध्‍ये 3 जी, वाय-फाय डायरेक्‍ट आणि वाय-फाय हॉटस्‍पॉट, USB, ब्‍ल्‍यूटूथ आणि जीपीएसची सुविधा आहे. दोन्‍ही फोन हे ड्युएल सिम फिचर्सची आहेत.

Tags: iBallLGSmartphonesSony
ShareTweetSend
Previous Post

HTC नवा स्‍मार्टफोन डिझायर SV

Next Post

दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा

Sooraj Bagal

Sooraj Bagal

Related Posts

ॲपलची आयफोन १५ मालिका सादर : आता चक्क USB C पोर्टसह!

ॲपलची आयफोन १५ मालिका सादर : आता चक्क USB C पोर्टसह!

September 13, 2023
वनप्लसच्या डिस्प्लेवर ग्रीन-लाइन येणाऱ्या फोन्सना लाईफटाइम वॉरंटी!

वनप्लसच्या डिस्प्लेवर ग्रीन-लाइन येणाऱ्या फोन्सना लाईफटाइम वॉरंटी!

August 11, 2023
सॅमसंग Galaxy Z Fold5, Z Flip5 सादर : सोबत Watch6, Tab S9 सुद्धा!

सॅमसंग Galaxy Z Fold5, Z Flip5 सादर : सोबत Watch6, Tab S9 सुद्धा!

July 26, 2023
Nothing Phone 2

Nothing कंपनीचा Phone (2) सादर : नव्या Glyph इंटरफेससह!

July 12, 2023
Next Post
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा

दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ADVERTISEMENT
WhatsApp Channels

व्हॉट्सॲप चॅनल्स आता सर्वांना उपलब्ध : बिझनेस ॲपसाठीही नवे फीचर्स!

September 21, 2023
ॲपलची आयफोन १५ मालिका सादर : आता चक्क USB C पोर्टसह!

ॲपलची आयफोन १५ मालिका सादर : आता चक्क USB C पोर्टसह!

September 13, 2023
Jio AGM : AirFiber, Cloud PC, स्मार्ट होम, AI मॉडेल्स बद्दल माहिती जाहीर!

Jio AGM : AirFiber, Cloud PC, स्मार्ट होम, AI मॉडेल्स बद्दल माहिती जाहीर!

August 28, 2023
चंद्रयान ३ यशस्वीरित्या चंद्रावर उतरलं : दक्षिण ध्रुवावर उतरणारा पहिलाच देश!

चंद्रयान ३ यशस्वीरित्या चंद्रावर उतरलं : दक्षिण ध्रुवावर उतरणारा पहिलाच देश!

August 24, 2023
एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

September 25, 2012
यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

November 4, 2016
मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

September 10, 2012
ADVERTISEMENT
MarathiTech - मराठीटेक

तंत्रज्ञानाविषयी मराठी भाषेतली प्रसिद्ध वेबसाइट! नवं तंत्रज्ञान, नवनवे फोन्स, ॲप्स यांच्याबद्दल रंजक माहिती...

मराठीटेकला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा

WhatsApp Channels

व्हॉट्सॲप चॅनल्स आता सर्वांना उपलब्ध : बिझनेस ॲपसाठीही नवे फीचर्स!

September 21, 2023
ॲपलची आयफोन १५ मालिका सादर : आता चक्क USB C पोर्टसह!

ॲपलची आयफोन १५ मालिका सादर : आता चक्क USB C पोर्टसह!

September 13, 2023

व्हॉट्सॲप चॅनल्स आता सर्वांना उपलब्ध : बिझनेस ॲपसाठीही नवे फीचर्स!

ॲपलची आयफोन १५ मालिका सादर : आता चक्क USB C पोर्टसह!

Jio AGM : AirFiber, Cloud PC, स्मार्ट होम, AI मॉडेल्स बद्दल माहिती जाहीर!

चंद्रयान ३ यशस्वीरित्या चंद्रावर उतरलं : दक्षिण ध्रुवावर उतरणारा पहिलाच देश!

व्हॉट्सॲपवर फोटोज आता HD क्वालिटीमध्ये पाठवता येणार!

  • About
  • Advertise
  • Privacy Policy
  • Contact

© MarathiTech 2022 A Product by BagalTech

No Result
View All Result
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • खास लेख
  • गेमिंग
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • शॉपिंग ऑफर्स
  • आमच्याबद्दल About Us
  • संपर्क – प्रतिक्रिया

© MarathiTech 2022 A Product by BagalTech

error: Content is protected!