MarathiTech - मराठीटेक
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
MarathiTech - मराठीटेक
No Result
View All Result
Home News

मराठी विश्वकोश ई-बुक स्वरूपात

Sooraj Bagal by Sooraj Bagal
February 4, 2013
in News

माहिती आणि ज्ञानाचे भांडार असलेल्या मराठी विश्वकोशाचे सर्व १ ते १६ खंड आता ई – बुक स्वरूपात उपलब्धझाले आहेत . नियोजन आयोगाचे सदस्य डॉ . नरेंद्र जाधव यांच्या हस्ते नुकतेच सोळाव्या खंडाचे लोकार्पणकरण्यात आले . तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी संपादित केलेले पहिले पंधरा खंड आणि प्रा . मे . पुं . रेगेयांनी संपादित केलेला सोळावा खंड असा हा लाखो पानांचा ऐतिहासिक दस्तावेज आता इंटरनेटच्या माध्यमातूनजगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचला आहे . 

चेंबूर येथील आचार्य मराठे कॉलेजमध्ये आयोजित या समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना डॉ . जाधव यांनी आज घराघरात कम्प्युटर तसेच मोबाइलद्वारे प्रत्येकाच्या हातात इंटरनेट पोहोचले असताना युनिकोडमधून विश्वकोश जसा आहे , तसा वेबसाइटवर उपलब्ध करून देण्याची मराठी विश्वकोश मंडळाची संकल्पना अफाट असल्याचे सांगून विश्वकोश मंडळाची ही संकल्पना प्रत्यक्षात उतरविणारे ‘ सी – डॅक ‘ चे महेश कुलकर्णी आणि त्यांच्या टीमचीही स्तुती केली . 
विश्वकोश मुलांनी वाचावा आणि इतरांनाही इंटरनेटवर तो वाचण्यास प्रवृत्त करावे , असा सल्ला त्यांनी विद्यार्थ्यांना दिला . प्रयत्नवाद , आशावाद , उच्च ध्येय , नम्रता , आत्मविश्वास ,अपयशावर मात करण्याची जिद्द , प्रागतिक दृष्टिकोन , वेळेचे नियोजन आणि देशप्रेम ही यशाची नऊ सूत्रे असून त्यांची कास विद्यार्थ्यांनी कधी सोडू नये , असेही ते म्हणाले . तर ‘ विश्वकोश कोशात न राहता तो विश्वात यावा ,यासाठी ही सारी धडपड आहे ‘ असे विश्वकोश मंडळाच्या अध्यक्ष डॉ . विजया वाड यांनी सांगितले . ई – बुक आवृत्तीनंतर विश्वकोश आता टॅबलेटवरही उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असल्याचे सी – डॅकचेसंचालक महेश कुलकर्णी यांनी सांगितले . विश्वकोशाचे सर्व खंड 
marathivishwakosh.in या वेबसाइटवर उपलब्ध आहेत . 

ADVERTISEMENT
Tags: eBooksEncyclopediaMarathi
ShareTweetSend
Previous Post

स्कायड्राइव्हचं ऑफिस : मायक्रोसॉफ्ट ऑफिस ३६५

Next Post

ब्लॅकबेरीचा पहिला स्मार्टफोन BB Z10 लॉन्च, अ‍ॅपलला देणार जबरदस्त टक्कर

Sooraj Bagal

Sooraj Bagal

Related Posts

Google Bard Marathi

गूगलचा Bard AI आता मराठीतसुद्धा उपलब्ध!

July 16, 2023
नवा व्हिडिओ : ॲपल मॅकवर मराठीत टायपिंग!

नवा व्हिडिओ : ॲपल मॅकवर मराठीत टायपिंग!

March 20, 2023
iPhone Marathi Typing

आयफोनवर मराठी टायपिंग करणं आता सोपं झालंय!

November 10, 2022
Amazon Marathi

ॲमेझॉन आता मराठी भाषेत उपलब्ध : ऑनलाईन वस्तू खरेदी आता आणखी सोपी!

September 24, 2021
Next Post
ब्लॅकबेरीचा पहिला स्मार्टफोन BB Z10 लॉन्च, अ‍ॅपलला देणार जबरदस्त टक्कर

ब्लॅकबेरीचा पहिला स्मार्टफोन BB Z10 लॉन्च, अ‍ॅपलला देणार जबरदस्त टक्कर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ADVERTISEMENT
ॲपलने मॅकबुक, आयपॅडच्या आणि इतर प्रॉडक्टच्या किंमती वाढवल्या

ॲपलने मॅकबुक, आयपॅडच्या आणि इतर प्रॉडक्टच्या किंमती वाढवल्या

June 25, 2026
WhatsApp CEO Kunal Shah

CRED चे संस्थापक कुणाल शहा आता WhatsApp चे सीईओ!

June 25, 2026
Google Workspace New App Icons

गूगलच्या वर्कस्पेस अ‍ॅप्समध्ये नवीन आयकॉन्स

May 29, 2026
Freepik Is Now Magnific

Freepik कंपनीचं नवं नाव आता Magnific : स्टॉक फोटोज् व AI टूल्ससाठी प्रसिद्ध

April 29, 2026
MSRTC Timing Check Marathi

एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

September 25, 2012
यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

November 4, 2016
मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

September 10, 2012
ADVERTISEMENT
MarathiTech - मराठीटेक

तंत्रज्ञानाविषयी मराठी भाषेतली प्रसिद्ध वेबसाइट! नवं तंत्रज्ञान, नवनवे फोन्स, ॲप्स यांच्याबद्दल रंजक माहिती...

मराठीटेकला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा

ॲपलने मॅकबुक, आयपॅडच्या आणि इतर प्रॉडक्टच्या किंमती वाढवल्या

ॲपलने मॅकबुक, आयपॅडच्या आणि इतर प्रॉडक्टच्या किंमती वाढवल्या

June 25, 2026
WhatsApp CEO Kunal Shah

CRED चे संस्थापक कुणाल शहा आता WhatsApp चे सीईओ!

June 25, 2026

ॲपलने मॅकबुक, आयपॅडच्या आणि इतर प्रॉडक्टच्या किंमती वाढवल्या

CRED चे संस्थापक कुणाल शहा आता WhatsApp चे सीईओ!

गूगलच्या वर्कस्पेस अ‍ॅप्समध्ये नवीन आयकॉन्स

Freepik कंपनीचं नवं नाव आता Magnific : स्टॉक फोटोज् व AI टूल्ससाठी प्रसिद्ध

ॲपलचे नवे सीईओ जॉन टर्नस : टिम कुक यांच्यानंतर घेणार जबाबदारी!

  • About
  • Advertise
  • Privacy Policy
  • Contact

© MarathiTech 2024 A Product by BagalTech

error: Content is protected!
No Result
View All Result
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • खास लेख
  • गेमिंग
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • शॉपिंग ऑफर्स
  • आमच्याबद्दल About Us
  • संपर्क – प्रतिक्रिया

© MarathiTech 2024 A Product by BagalTech