MarathiTech - मराठीटेक
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
  • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
  • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
MarathiTech - मराठीटेक
No Result
View All Result
Home सॉफ्टवेअर्स

स्कायड्राइव्हचं ऑफिस : मायक्रोसॉफ्ट ऑफिस ३६५

Sooraj Bagal by Sooraj Bagal
February 3, 2013
in सॉफ्टवेअर्स
एमएस ऑफिस आणि कम्प्युटर यांचे एक अनोखे नाते . परंतु मध्यंतरीच्या काळात ओपन ऑफिस आणि गुगल डॉक यांनी मायक्रोसॉफ्टला शह देण्याचा प्रयत्न केला . तो प्रयत्नतितकासा यशस्वी झाला नसला तरी मायक्रोसॉफ्टला या दोन्ही उत्पादनांतील सुविधांचा विचार करून एमएस ऑफिसमध्ये बदल करणे क्रमप्राप्त झाले . ऑफिस २०१०मध्ये पूर्वीपेक्षा अनेक सुधारणा करण्यात आल्या होत्या .मात्र त्याही पलीकडे जाऊन काही सुधारणा आवश्यक होत्या म्हणून मायक्रोसॉफ्टने नुकतेच ऑफिस ३६५ लाँचकेले आहे . यामध्ये वर्ल्ड , एक्सेल , पॉवर पॉइंट , वन नोट , आऊटलूक , पब्लिशर अॅण्ड अॅक्सेस याचबरोबर २०जीबीपर्यंतचा स्कायड्राइव्ह स्टोअरेज मिळणार आहे . 


मायक्रोसॉफ्ट ऑफिसचं हे व्हर्जन आपल्याला मासिक किंवा वार्षिक सबस्क्रिप्शन भरून वापरू शकतो . याचावापर आपण एकावेळी पाच कम्प्युटर्स आणि पाच मोबाइल्समध्ये वापरू शकतो . आजपर्यंत ऑफिसची अशाप्रकारची कोणतीही सुविधा नव्हती . मायक्रोसॉफ्ट वेब अॅपच्या माध्यमातून आपण हे ऑफिस वापरू शकतो .याचा वापर करणाऱ्या प्रत्येकाला मायक्रोसॉफ्ट आऊटलूक ही नवी मेल सुविधाही वापरता येणार आहे . तसेच मायक्रोसॉफ्टच्या वन नोट या नवीन सुविधेचा वापरही या ऑफिसच्या माध्यमातून करता येईल . वन नोट म्हणजे आपण आपली कामे यामध्ये स्टोअर करून ठेऊ शकतो . तसेच काही वाक्य जी आपण नेहमी आपल्या लिखाणात वापरत असतो ती वाक्यही सेव्ह करून ठेवता येतील .

           ऑफिसच्या या व्हर्जनची आणखी एक खासियत म्हणजे यामध्ये आपल्याला स्कायड्राइव्ह वापरायला मिळणार आहे . या स्कायड्राइव्हमध्ये आपल्याला २० जीबीपर्यंतचा डेटा स्टोअर करता येणार आहे . यासाठी आपल्याला वेगळे पैसे मोजावे लागणार नाहीत . ते आपल्या ऑफिसच्या पॅकेजमध्येच मिळते . सध्या याचे ट्रायल व्हर्जन ३० दिवसांसाठी मोफत उपलब्ध आहेत . यापुढे येणाऱ्या विंडोज८ च्या सर्व कम्प्युटर्सवर ऑफिस ३६५ इंस्टॉल अॅप्लिकेशन म्हणून असेल . ऑफिसच्या या व्हर्जनमध्ये आपल्याला थर्ड पार्टी अॅप्स वापरता येणार आहे . यामध्ये पीडीएफ हे सर्वात उपयुक्त अॅप वापरता येईल . यामध्ये विंडोज७ प्रमाणेच आपण फाइल पीडीएफ फॉरमॅटमध्ये सेव्ह करू शकतो . याशिवाय लवकरच यामध्ये भारतीय युजर्सना उपयुक्त ठरतील असे रिड अॅण्ड राइटचे २०० अॅप्स येतील , असे मायक्रोसॉफ्टने स्पष्ट केले आहे . यामध्ये ऑफिसहोम , स्टुडंट आणि प्रिमियम असे तीन व्हर्जन्स उपलब्ध आहेत .

ADVERTISEMENT
Tags: DocumentsMicrosoftOfficeSkyDrive
ShareTweetSend
Previous Post

पाच हजारांहून कमी किंमतीत शानदार ड्युअल सिम मोबाईल!

Next Post

मराठी विश्वकोश ई-बुक स्वरूपात

Sooraj Bagal

Sooraj Bagal

Related Posts

Internet Explorer Retiring

इंटरनेट एक्सप्लोरर ब्राऊजर आजपासून बंद होणार!

June 15, 2022
Microsoft Xbox Activision Blizzard

मायक्रोसॉफ्टने Activision Blizzard गेमिंग कंपनी ५ लाख कोटींना विकत घेतली!

January 18, 2022
Microsoft Surface

मायक्रोसॉफ्ट इव्हेंट : Surface Laptop Studio, Surface Duo 2 फोन सादर!

September 23, 2021
World Emoji Day

जागतिक इमोजी दिन : मायक्रोसॉफ्ट व गूगलच्या नव्या इमोजी!

July 17, 2021
Next Post
मराठी विश्वकोश ई-बुक स्वरूपात

मराठी विश्वकोश ई-बुक स्वरूपात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ADVERTISEMENT
VLC मीडिया प्लेयरवर भारतात बंदी : वेबसाइट, डाउनलोड ब्लॉक!

VLC मीडिया प्लेयरवर भारतात बंदी : वेबसाइट, डाउनलोड ब्लॉक!

August 14, 2022
WhatsApp Privacy Update

व्हॉट्सॲपचं नवं प्रायव्हसी अपडेट : इतरांच्या नकळत ग्रुप सोडता येणार!

August 9, 2022
Gmail Redesign 2022

जीमेल आता नव्या रूपात : नव्या डिझाईनसोबत वर्कस्पेस एका क्लिकवर!

July 29, 2022
Google Street View India

गूगलची स्ट्रीट व्ह्यू भारतात पुन्हा सुरू : १० शहरांचा 360° पॅनोरामा पहा!

July 27, 2022
एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

September 25, 2012
मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

September 10, 2012
यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

November 4, 2016
ADVERTISEMENT
MarathiTech – मराठीटेक

तंत्रज्ञानाविषयी मराठी भाषेतली प्रसिद्ध वेबसाइट! नवं तंत्रज्ञान, नवनवे फोन्स, ॲप्स यांच्याबद्दल रंजक माहिती...

मराठीटेकला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा

VLC मीडिया प्लेयरवर भारतात बंदी : वेबसाइट, डाउनलोड ब्लॉक!

VLC मीडिया प्लेयरवर भारतात बंदी : वेबसाइट, डाउनलोड ब्लॉक!

August 14, 2022
WhatsApp Privacy Update

व्हॉट्सॲपचं नवं प्रायव्हसी अपडेट : इतरांच्या नकळत ग्रुप सोडता येणार!

August 9, 2022

VLC मीडिया प्लेयरवर भारतात बंदी : वेबसाइट, डाउनलोड ब्लॉक!

व्हॉट्सॲपचं नवं प्रायव्हसी अपडेट : इतरांच्या नकळत ग्रुप सोडता येणार!

जीमेल आता नव्या रूपात : नव्या डिझाईनसोबत वर्कस्पेस एका क्लिकवर!

गूगलची स्ट्रीट व्ह्यू भारतात पुन्हा सुरू : १० शहरांचा 360° पॅनोरामा पहा!

ॲमेझॉन प्राइम डे सेल २३ व २४ जुलै : प्राइम ग्राहकांसाठी खास ऑफर्स!

  • About
  • Advertise
  • Privacy Policy
  • Contact

© MarathiTech 2022 A Product by BagalTech

No Result
View All Result
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • खास लेख
  • गेमिंग
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • शॉपिंग ऑफर्स
  • आमच्याबद्दल About Us
  • संपर्क – प्रतिक्रिया

© MarathiTech 2022 A Product by BagalTech

error: Content is protected!