MarathiTech - मराठीटेक
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
MarathiTech - मराठीटेक
No Result
View All Result
Home News

प्रादेशिक भाषांतील ई-बुक

Sooraj Bagal by Sooraj Bagal
February 12, 2013
in News
टेक्नोलॉजीच्या जमान्यात वाचन – लेखन आणि इतर अनेक बाबींमधील तंत्रेच बदलली . टेक्नोक्रांती झाल्यामुळे काम करण्याच्या पद्धतीतही अनेक बदल झाले . प्रत्यक्षात आता कुणीही कागदावर हाताने फारसे लिहित नाही . त्याची गरजच उरलेली नाही . पुस्तकांच्या बाबतीत ही छापील पुस्तकाची जागा ‘ ई – बुक ‘ घेऊ लागले आहे 

दिल्लीमध्ये सुरू असलेल्या जागतिक पुस्तक मेळाव्यातही ‘ ई – बुक ‘ ची दखल घेतली गेली . एक वेगळा विभाग ‘ई – बुक ‘ च्या प्रकाशकांसाठी , निर्मात्यांसाठी ठेवण्यात आला होता . कम्प्युटर , इंटरनेटबरोबरच स्मार्टफोनवर एका क्लिकवर माहिती उपलब्ध झाली . सुरुवातीला इंग्रजी भाषेपुरतेच मर्यादित असणारे हे क्षेत्र आता जवळपास सर्व भाषांमध्ये विस्तारले आहे . स्मार्टफोन , आयफोन , अन्ड्रॉइड यांसारख्या फोनवर अनेक अॅप्लिकेशन्स आहेत .त्यात आता प्रादेशिक भाषांमधील पुस्तके डाउनलोड करण्याच्या अॅप्लिकेशनची भर पडणार आहे . 

टॅबलेट आणि मोबाइलसाठी ई – बुक आणि ई – मॅगझिन्स पुरवणाऱ्या ‘ रॉकस्टँड ‘ या कंपनीने दिल्लीतील जागतिक पुस्तक मेळाव्यात प्रादेशिक भाषांमधील पुस्तकांच्या पहिल्या संचाचे अनावरण केले आहे . यामुळे प्रादेशिक भाषांमधील ई – पुस्तकेही फोनवर वाचता येणार आहेत . विविध प्रकाशनांची इंग्रजी पुस्तके ‘ ई – बुक ‘वर उपलब्ध आहेत . आता प्रादेशिक भाषांमधील पुस्तकांची मागणी यामुळे वाढणार आहे . केवळ ‘ प्रिंट कॉपीं ‘च्या विक्रीवर होणाऱ्या नफ्याची गणिते आता केव्हाच मागे पडली आहेत . ‘ अॅन्ड्रॉइड ‘ वर एका अॅप्लिकेशनद्वारेही पुस्तके डाउनलोड करता येतील . 

‘ रॉक असाप रिटेल प्रायव्हेट लिमिटेड ‘ चे संस्थापक संचालक प्रवीण राजपाल यांनी या अॅप्लिकेशनची माहिती दिली . ते म्हणाले , ‘ हिंदी , गुजराती , मराठी यांसारख्या प्रादेशिक भाषांमधील पुस्तके यामुळे सर्वांना मिळणारआहेत . एकूण १८ भाषांमध्ये आम्ही पुस्तके प्रसिद्ध करत आहोत .’ यासाठी अॅन्ड्रॉइड फोनवर एक अॅप्लिकेशन डाउनलोड करावे लागेल . हे अॅप्लिकेशन मोफत डाउनलोड करता येईल . डाउनलोड केलेले पुस्तक कायमस्वरूपी वापरता येईल . इंटरनेट अॅक्सेस नसला , तरी डाउनलोड केलेले पुस्तक वाचता येणार आहे . नाइट रीडिंग मोड ,फॉण्ट साइजमध्ये बदल करणे , पुस्तक वाचताना नोट्स काढण्याची सोय यांसारखी वैशिष्ट्ये या अॅप्लिकेशनमध्ये आहेत . एवढेच नव्हे , तर वाचायचा आपल्याला कंटाळा आला , तर वाचून दाखवण्याची सोय या अॅपमध्ये आहे .पुस्तक डाउनलोड करण्याची किंमत ही छापील पुस्तकाच्या किमतीपेक्षा फार कमी आहे . सर्वांत स्वस्त पुस्तक हे ‘चाचा चौधरी कॉमिक बुक ‘ असून पुस्तकाची किंमत केवळ एक रुपया आहे . 

कंपनीने नुकतेच देशातील पन्नास प्रकाशकांशी ‘ टाय – अप ‘ केलेले आहे . विविध भाषांमधील आणखी एक हजार पुस्तके त्यामुळे कंपनीच्या संग्रहात दाखल झाली आहेत . सध्या ‘ रॉकस्टँड ‘ कडे वीस लाख पुस्तके आहेत . आर्थिक फायद्यांबरोबरच वाचनसंस्कृती वाढीला लागावी हा या बदलत्या आणि प्रगतीशील तंत्रज्ञानाचा उद्देश आहे . हेसर्वांनी लक्षात घेऊन टेक्नॉलॉजीचा वापर वाचून समृद्ध होण्यासाठी करावा . 

ADVERTISEMENT
Tags: Book FaireBooksStudy
ShareTweetSend
Previous Post

मोबाइल खिलाडी मोबाइल गेम्स

Next Post

आता घ्या एसएमएसची प्रिंट..

Sooraj Bagal

Sooraj Bagal

Related Posts

लहान मुलांसाठी अॅमेझॉन प्राइम व्हिडिओ आणि यूट्यूब मोफत!

लहान मुलांसाठी अॅमेझॉन प्राइम व्हिडिओ आणि यूट्यूब मोफत!

March 29, 2020
Juggernaut Books FREE

एयरटेल देत आहे हजारो इ बुक्स मोफत! : Juggernaut Books अॅप

March 28, 2020
अॅमेझॉनचा नवा किंडल पेपरव्हाईट सादर! : आता वॉटरप्रूफ!

अॅमेझॉनचा नवा किंडल पेपरव्हाईट सादर! : आता वॉटरप्रूफ!

October 17, 2018
अॅप लय भारी शिक्षणाशी संबंधित एकापेक्षा एक भन्नाट अॅप्स

अॅप लय भारी शिक्षणाशी संबंधित एकापेक्षा एक भन्नाट अॅप्स

November 27, 2013
Next Post
आता घ्या एसएमएसची प्रिंट..

आता घ्या एसएमएसची प्रिंट..

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ADVERTISEMENT
Anthropic AI Plugins IT Selloff

Anthropic च्या नव्या AI प्लगइन्समुळे जगभरात आयटी शेयर्स घसरले!

February 4, 2026
Adobe Express Premium FREE Airtel Offer

एयरटेलच्या सर्व ग्राहकांना ‘अडोबी एक्सप्रेस प्रीमियम’ मोफत!

January 29, 2026
अडोबी फोटोशॉप आता ChatGPT मध्ये उपलब्ध!

अडोबी फोटोशॉप आता ChatGPT मध्ये उपलब्ध!

December 11, 2025
Google Year In Search 2025

गूगल इयर इन सर्च : भारतीयांनी २०२५ मध्ये गूगलवर ‘काय’ शोधलं?

December 6, 2025
MSRTC Timing Check Marathi

एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

September 25, 2012
Adobe Express Premium FREE Airtel Offer

एयरटेलच्या सर्व ग्राहकांना ‘अडोबी एक्सप्रेस प्रीमियम’ मोफत!

January 29, 2026
अडोबी फोटोशॉप आता ChatGPT मध्ये उपलब्ध!

अडोबी फोटोशॉप आता ChatGPT मध्ये उपलब्ध!

December 11, 2025
ADVERTISEMENT
MarathiTech - मराठीटेक

तंत्रज्ञानाविषयी मराठी भाषेतली प्रसिद्ध वेबसाइट! नवं तंत्रज्ञान, नवनवे फोन्स, ॲप्स यांच्याबद्दल रंजक माहिती...

मराठीटेकला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा

Anthropic AI Plugins IT Selloff

Anthropic च्या नव्या AI प्लगइन्समुळे जगभरात आयटी शेयर्स घसरले!

February 4, 2026
Adobe Express Premium FREE Airtel Offer

एयरटेलच्या सर्व ग्राहकांना ‘अडोबी एक्सप्रेस प्रीमियम’ मोफत!

January 29, 2026

Anthropic च्या नव्या AI प्लगइन्समुळे जगभरात आयटी शेयर्स घसरले!

एयरटेलच्या सर्व ग्राहकांना ‘अडोबी एक्सप्रेस प्रीमियम’ मोफत!

अडोबी फोटोशॉप आता ChatGPT मध्ये उपलब्ध!

गूगल इयर इन सर्च : भारतीयांनी २०२५ मध्ये गूगलवर ‘काय’ शोधलं?

सॅमसंगचा Galaxy Z Trifold फोन सादर : १० इंची डिस्प्ले!

  • About
  • Advertise
  • Privacy Policy
  • Contact

© MarathiTech 2024 A Product by BagalTech

error: Content is protected!
No Result
View All Result
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • खास लेख
  • गेमिंग
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • शॉपिंग ऑफर्स
  • आमच्याबद्दल About Us
  • संपर्क – प्रतिक्रिया

© MarathiTech 2024 A Product by BagalTech