अॅमेझॉनचा नवा किंडल पेपरव्हाईट सादर! : आता वॉटरप्रूफ!

अॅमेझॉनकडून नवीन किंडल पेपरव्हाईट सादर करण्यात आले आहे. याची खासियत म्हणजे नवीन किंडल पेपरव्हाईट IPX8 रेटेड असून आता वॉटरप्रूफ बनले आहे. नवीन किंडल पेपरव्हाईट जर पाण्यामध्ये पडले तरी ते वापरता येणार असून जवळपास २ मीटर पाण्यामध्ये ६० मिनिटांपर्यंत हे राहू शकते.

नवीन किंडल पेपरव्हाईट सर्वांत कमी वजनाचे असून जाडीने सुद्धा आधीच्या तुलनेत कमी आहे. यासोबत ६ इंच ग्लेअर  फ्री स्क्रीन देण्यात आली आहे. त्यासोबतच बिल्ट इन लाइटचा समावेश सुद्धा आहे. नवीन किंडल पेपरव्हाईट 300ppi रिझोल्युशन सोबत येत असून वायफाय सोबत येणारे 8GB स्टोरेजमध्ये  तर वायफाय + फ्री 4G मॉडेल 32GB स्टोरेजमध्ये  हे उपलब्ध असेल. यासाठी विविध कव्हर सुद्धा उपलब्ध आहेत. नवीन किंडल पेपरव्हाईटचा बॅटरी बॅकअप सुद्धा चांगला असून तो जवळपास आठवडाभर चालेल असे कंपनीकडून सांगण्यात आले आहे.
किंडलच्या मदतीने आपण टॅब्लेट एवढ्या आकाराच्या डिव्हाईसद्वारे अनेक पुस्तके वाचू शकतो. साधारण मोबाइल/टॅब्लेट स्क्रीन पेक्षा किंडलची स्क्रीन वेगळ्या पद्धतीची असून इलेक्ट्रॉनिक पद्धतीने पुस्तके वाचतानाही प्रिंटेड बुक वाचल्याचा अनुभव यातून मिळतो. त्याबरोबरच मोबाइल स्क्रीनपासून डोळ्यांना जो त्रास होतो तो याद्वारे होत नाही. किंडलमध्ये आपण हजारो पुस्तके साठवून ठेवू शकतो. आजकाल तर अनेक मराठी पुस्तकेसुद्धा ई-बुक्सच्या रूपात उपलब्ध आहेत. शिवाय अॅमेझॉन प्राईम रिडींग सेवा आता भारतात उपलब्ध झाली असून या सेवेद्वारे अॅमेझॉन प्राईम ग्राहक निवडक पुस्तके आणि कादंबऱ्या फुकटात वाचू शकतील!

नवीन किंडल पेपरव्हाईट प्री-ऑर्डर साठी अॅमॅझॉनवर उपलब्ध असून १६ ऑक्टोबर ते १३ नोव्हेंबर दरम्यान खरेदी करणाऱ्या ग्राहकांना ३ महिन्यांसाठी किंडल अनलिमिटेड सबस्क्रिप्शन व २ वर्ष अधिकची वॉरंटी मिळणार आहे. याची किंमत १२९९९ पासून आहे.

अॅमेझॉनचा नवा किंडल पेपरव्हाईट सादर! : आता वॉटरप्रूफ! अॅमेझॉनचा नवा किंडल पेपरव्हाईट सादर! : आता वॉटरप्रूफ! Reviewed by Swapnil Bhoite on October 17, 2018 Rating: 5

No comments:

Powered by Blogger.