करोना व्हायरसमुळे सर्व ठिकाणे लॉकडाऊन स्थितीत आहेत. यामुळे विद्यार्थ्याना बाहेर जाऊन शिक्षण, खेळ अशा प्रकारच्या गोष्टी आणखी काही दिवस तरी करणे शक्य होणार नाहीये. अशा वेळी अॅमेझॉन, यूट्यूब या कंपन्यानी पुढाकार घेत खास लहान मुलांसाठी ऑनलाइन पर्याय उपलब्ध करून दिले आहेत. अॅमेझॉनने त्यांची प्राइम व्हिडिओ सेवा लहान मुलांना पूर्णपणे मोफत देण्यास सुरुवात केली आहे. यामध्ये किड्स अँड फॅमिली विभागातले चित्रपट, मालिका पाहता येतील. तर दुसरीकडे यूट्यूबने लहान मुलांच्या शैक्षणिक गोष्टींसाठी विविध पर्याय दिले आहेत. यामध्ये [email protected] म्हणजेच घरबसल्या शिका हा नवा ऑनलाइन शैक्षणिक हब आणला आहे. अशा पर्यायांद्वारे या लॉकडाऊन/संचारबंदीच्या काळात लहानग्यांचं नक्कीच मनोरंजनासोबत विविध विषयांचा अभ्यास देखील होईल! हा लेख आपल्या घरी, नातेवाईक किंवा शेजाऱ्यांकडे असलेल्या लहान मुलांसाठी उपयोगी ठरू शकतो. कृपया हा लेख त्यांच्यासोबत नक्की शेयर करा.
यूट्यूबचं लर्न अॅट होम शैक्षणिक हब : https://learnathome.withyoutube.com
यूट्यूबने सादर केलेल्या [email protected] द्वारे लहान मुले विविध विषयांची माहिती देणारे शैक्षणिक चॅनल्स, प्लेलिस्ट आणि सोबत आणखी माहिती एका जागी पाहू शकतील! या प्लॅटफॉर्मवर त्यांनी अनेक एज्युट्यूबर्स (शैक्षणिक माहिती देणारे यूट्यूब क्रिएटर्स) आणि संस्था जसे की खान अकॅडमी यांच्यासोबत भागीदारी केली आहे. खान अकॅडमी ही अशी संस्था आहे जी विद्यार्थ्यांसाठी सोप्या भाषेत गणित, विज्ञान, इतिहास, कला व इतर विषयांचे शैक्षणिक व्हिडिओ बनवते आणि ते जगभर सर्वांना मोफत उपलब्ध आहेत! अनेक शाळांनी तर शाळेतसुद्धा यांचे व्हिडिओ दाखवण्यास सुरुवात केली आहे.
या लर्न फ्रॉम होमसाठी त्यांनी तीन वयोगट तयार केले आहेत. प्रिस्कूलमध्ये जाणाऱ्यासाठी चॅनल, पाच वर्षाहून अधिक वय असणाऱ्यांसाठी चॅनल आणि १३ वर्षाहून अधिक वय असणाऱ्यांसाठी चॅनल. या वयोगटानुसार वेगवेगळे चॅनल्स दाखवले जातील आणि यामध्ये सुचवले जाणारे चॅनल्स/व्हिडिओ यांची निवड यूट्यूबने स्वतः केलेली आहे. John and Hank Green’s CrashCourse and SciShow, Discovery Education, mathman1024, Physics Girl, Mother Goose Club व Sesame Street हे यापैकी काही प्रमुख चॅनल्स… हा सर्व कंटेंट सध्यातरी फक्त इंग्लिशमध्येच उपलब्ध होणार आहे.
शिक्षकांनाही ऑनलाइन शिकवण्यासाठी काही पर्याय यूट्यूबमार्फत Teach From Home द्वारे उपलब्ध करून देण्यात आले आहेत!
http://g.co/teachfromhome या लिंकवर गेल्यास शिक्षकांना उपलब्ध करून देण्यात आलेल्या सोयी एका ठिकाणी पाहायला मिळतील. येथून तुम्ही विद्यार्थ्यांसोबत व्हिडिओ कॉल करू शकता, ऑनलाइवर्ग भरवू शकता, लाईव प्रश्नोत्तरे घेऊ शकता! याबद्दल अधिक माहीतीसाठी लिंक : https://bit.ly/39tb28J
दुसरीकडे अॅमेझॉनने मुलांसाठी मोफत मनोरंजन उपलब्ध करून दिलं आहे. मुलांसाठी योग्य अशी वर्गवारी केलेले चित्रपट, मालिका, अॅनिमेटेड व्हिडिओ अॅमेझॉन प्राइम व्हिडिओच्या सबस्क्रिप्शनशिवाय पाहता येतील! याबद्दल अॅमेझॉन इंडियाचे प्रमुख अमित अगरवाल यांनी माहिती दिली आहे. यामधील काही व्हिडिओ मराठीतसुद्धा उपलब्ध आहेत. उदा (Madagascar Escape 2 Africa). अॅमेझॉन प्राइम व्हिडिओ लिंक : https://www.primevideo.com/storefront/kids/
Search Terms : Browse Kids & Family content on Amazon Prime Video for FREE, YouTube starts [email protected] educational hub for kids to learn different things while staying at home