MarathiTech - मराठीटेक
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
  • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
  • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
MarathiTech - मराठीटेक
No Result
View All Result
Home स्मार्टफोन्स

सॅमसंग गॅलक्सी एस फोर : चार सेकंदांत १०० फोटो काढा!

Sooraj Bagal by Sooraj Bagal
March 23, 2013
in स्मार्टफोन्स
अॅपलच्या ‘आयफोन ५’ला टक्कर देण्यासाठी आणि जागतिक स्मार्टफोनची बाजारपेठ काबीज करण्यासाठी आघाडीच्या स्मार्टफोनमेकर ‘सॅमसंग’ने गुरुवारी ‘सॅमसंग गॅलक्सी एस फोर’हा नवा अँड्रॉइड फोन न्यूयॉर्कमध्ये लाँच केला. अँड्रॉइडची सुधारीत आवृत्ती असलेल्या या मोबाइलने अवघ्या चार सेकंदात ४०० फोटो काढता येणार आहेत.


हा स्मार्टफोन बाजारात सध्या उपलब्ध असणाऱ्या अॅपल आयफोन, एचटीसी वन, नोकिया ल्युमिया ९२०, सोनी एक्स्पेरिया झेड आणि अन्य हाय एंड स्मार्टफोनशी स्पर्धा करेल, असा विश्वास कंपनीला आहे. मात्र, या नेक्स्ट जेन स्मार्टफोनची किंमत किती असेल, या विषयी कंपनीने मौन बाळगले आहे. ‘बाजारातील नवीनतम तंत्रज्ञान आणि संकल्पना यांचे अनोखे मिश्रण असलेला हा स्मार्टफोन आहे. भविष्यात विकसित होणारे नवे तंत्रज्ञान पाहता या फोनमध्ये अत्याधुनिक फीचर्सचा समावेश करण्यात आला आहे,’ अशी माहिती ‘सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्स’चे जे. के. शिन यांनी दिली.


साधारणतः एप्रिल महिन्याच्या अखेरीस हा फोन भारतीय बाजारपेठेत दर्शन देईल, असा जाणकारांचा होरा आहे. या मोबाइलची किंमत सांगण्यास कंपनीतर्फे नकार देण्यात आला असला, तरी भारतात या फोनची किंमत ४० हजार रुपये असेल अशी शक्यता आहे. १६, ३२ आणि ६४ जीबी या तीन प्रकारांमध्ये ‘सॅमसंग गॅलक्सी एस फोर’ उपलब्ध होणार आहे. केवळ १३० ग्रॅम वजन असलेल्या या स्मार्टफोनची बॅटरी २६०० मिलीअॅम्पिअर तास (mAh) असणार आहे.अतिशय खास फिचर्सनी हा स्‍मार्टफोन सज्‍ज आहे. यामध्‍ये 13 मेगापिक्‍सेल कॅमेरा असून अवघ्‍या 4 सेकंदात 100 छायाचित्रे घेण्‍याची जबरदस्‍त क्षमता आहे. याशिवाय रिअल टाईम ट्रांसलेटर एस-4 मध्‍ये आहे. त्‍याद्वारे भाषांतर सहज शक्‍य आहे.एस-4मध्‍ये 2600 एमएएच क्षमतेची बॅटरी दिलेली आहे. तसेच त्‍यात इन्‍फ्रारेड जेस्‍चर आणि तापमापक सेंसरही आहे. यामुळे वेगवेगळ्या तापमानात फोन ऍडजस्‍ट होईल.एस-4ला फाईल्‍स स्‍टोर करण्‍यासाठी एका पर्सनल सर्व्‍हरप्रमाणे वापरता येऊ शकते. या फिचरमुळे 8 जण एकाचवेळी वापर करु शकतात.



वैशिष्टे 


> १३ मेगापिक्सलचा बॅक कॅमेरा आणि २ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा


> अवघ्या ४ सेकंदात या हॅण्डसेटमधून तब्बल १०० छायाचित्रे काढली जाऊ शकतात.


> एस४ रियल टाइम ट्रान्सलेटरच्या माध्यमातून हॅण्डसेटमध्ये भाषांतराची सोय.


> आंतरराष्ट्रीय भाषांचे भाषांतर करणे शक्य.


> आय ट्रॅकिंग फिचरमुळे कॅमऱ्यावरून आपले लक्ष हटल्यास आपोआप हा कॅमेरा बंद होईल. पुन्हा 

कॅमेऱ्याकडे लक्ष गेल्यास कॅमेरा सुरू होईल. व्हिडिओ बघतानाही आपले लक्ष दुसरीकडे गेल्यास आपोआप व्हिडिओ पॉझ होईल.


> ग्रुप प्लेमुळे सॅमसंगच्या इतर हॅण्डसेटमध्ये एकच गाणे एकाचवेळी वाजवले जाऊ शकते.


> ग्लोव्हज घालूनही या हॅण्डसेटमधील टचस्क्रिन वापरता येईल.


> १६, ३२ आणि ६४ जीबीच्या इंटर्नल मेमरीचे पर्याय यामध्ये देण्यात आले आहेत.


> १०८० पिक्सलची हाय डेफिनेशनची स्क्रिन


> ८ कोअर प्रोसेसर

4 सेकंदात 100 फोटो, सॅमसंगचा बहुप्रतिक्षित गॅलक्‍सी एस-4 लॉंच

ADVERTISEMENT

Tags: GalaxySamsungSmartphones
ShareTweetSend
Previous Post

गुगलला ७० लाख डॉलरचा दंड

Next Post

‘यू ट्यूब’ला आव्हान व्हेवो

Sooraj Bagal

Sooraj Bagal

Related Posts

Pixel 6a India

गूगलचा Pixel 6a भारतात उपलब्ध : सोबत Pixel Buds Pro सुद्धा!

July 21, 2022
Nothing Phone 1

Nothing कंपनीचा पहिला Nothing Phone (1) सादर : नवं पारदर्शक डिझाईन!

July 12, 2022
Moto G42 भारतात सादर : AMOLED डिस्प्ले, 50MP कॅमेरा!

Moto G42 भारतात सादर : AMOLED डिस्प्ले, 50MP कॅमेरा!

July 4, 2022
Poco F4 5G

Poco F4 5G भारतात सादर : SD870, AMOLED डिस्प्ले आणि किंमतही कमी!

June 24, 2022
Next Post

'यू ट्यूब'ला आव्हान व्हेवो

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ADVERTISEMENT
WhatsApp Privacy Update

व्हॉट्सॲपचं नवं प्रायव्हसी अपडेट : इतरांच्या नकळत ग्रुप सोडता येणार!

August 9, 2022
Gmail Redesign 2022

जीमेल आता नव्या रूपात : नव्या डिझाईनसोबत वर्कस्पेस एका क्लिकवर!

July 29, 2022
Google Street View India

गूगलची स्ट्रीट व्ह्यू भारतात पुन्हा सुरू : १० शहरांचा 360° पॅनोरामा पहा!

July 27, 2022
Amazon Prime Day India

ॲमेझॉन प्राइम डे सेल २३ व २४ जुलै : प्राइम ग्राहकांसाठी खास ऑफर्स!

July 22, 2022
एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

September 25, 2012
मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

September 10, 2012
यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

November 4, 2016
ADVERTISEMENT
MarathiTech – मराठीटेक

तंत्रज्ञानाविषयी मराठी भाषेतली प्रसिद्ध वेबसाइट! नवं तंत्रज्ञान, नवनवे फोन्स, ॲप्स यांच्याबद्दल रंजक माहिती...

मराठीटेकला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा

WhatsApp Privacy Update

व्हॉट्सॲपचं नवं प्रायव्हसी अपडेट : इतरांच्या नकळत ग्रुप सोडता येणार!

August 9, 2022
Gmail Redesign 2022

जीमेल आता नव्या रूपात : नव्या डिझाईनसोबत वर्कस्पेस एका क्लिकवर!

July 29, 2022

व्हॉट्सॲपचं नवं प्रायव्हसी अपडेट : इतरांच्या नकळत ग्रुप सोडता येणार!

जीमेल आता नव्या रूपात : नव्या डिझाईनसोबत वर्कस्पेस एका क्लिकवर!

गूगलची स्ट्रीट व्ह्यू भारतात पुन्हा सुरू : १० शहरांचा 360° पॅनोरामा पहा!

ॲमेझॉन प्राइम डे सेल २३ व २४ जुलै : प्राइम ग्राहकांसाठी खास ऑफर्स!

गूगलचा Pixel 6a भारतात उपलब्ध : सोबत Pixel Buds Pro सुद्धा!

  • About
  • Advertise
  • Privacy Policy
  • Contact

© MarathiTech 2022 A Product by BagalTech

No Result
View All Result
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • खास लेख
  • गेमिंग
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • शॉपिंग ऑफर्स
  • आमच्याबद्दल About Us
  • संपर्क – प्रतिक्रिया

© MarathiTech 2022 A Product by BagalTech

error: Content is protected!