MarathiTech - मराठीटेक
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
MarathiTech - मराठीटेक
No Result
View All Result
Home ॲप्स

अ‍ॅप्सच्या दुनियेत आकाशवाणी

Sooraj Bagal by Sooraj Bagal
April 3, 2013
in ॲप्स
ADVERTISEMENT
गेल्या काही दिवसात प्रसार भारतीचे स्वरूप चांगलेच बदलले आहे. आम्ही कशा निष्पक्ष बातम्या देतो हे सांगणारे दूरदर्शनच्या जाहिरातीचे चक्क होर्डीग्ज लागलेले दिसतात आणि आता तर आकाशवाणीचा अ‍ॅप्सच्या दुनियेतदेखील प्रवेश झाला आहे.  आकाशवाणीवरील बातम्यांनी एकेकाळी बहुतांश लोकांचा दिवस सुरू व्हायचा. इतकेच नाही तर दिवसभरात ठराविक वेळी प्रसारित होणाऱ्या आकाशवाणीवरील बातम्या न चुकता ऐकणारा मोठा वर्गच होता. 

आज शेकडो वाहिन्यांवर ताज्या बातम्या ऐकणाऱ्या, पाहणाऱ्या नव्या पिढीला कदाचित याची भुरळ पडणार नाही की त्याचे फारसे अप्रूप वाटणार नाही. पण बातम्या म्हणजे आकाशवाणी आणि आकाशवाणी म्हणजे खात्रीशीर व निष्पक्ष बातम्या असे समीकरणच तेव्हा तयार झाले होते. पुढे दूरदर्शन आले तरी आकाशवाणीचे महत्त्व कमी झाले नाही की दूरदर्शनला आकाशवाणीची जागा घेता आली नाही. आज अनेक मोठ मोठे उद्योगसमूह रेडिओ माध्यमात उतरले आहेत, एफएमचा तर सुकाळच झाला. तरी आजदेखील एक मोठा घटक आकाशवाणीचा चाहता आहे. याच चाहत्या वर्गासाठी आणि मोबाइलवर जगणाऱ्या नव्या पिढीसाठी आकाशवाणीने ‘एआयर न्यूज अ‍ॅप’ च्या माध्यमातून अ‍ॅप्सच्या दुनियेत प्रवेश केला आहे. त्यामुळे  केवळ रेडिओवरून ठराविक वेळी ऐकल्या जाणाऱ्या बातम्या आता तुमच्या सोयीनुसार केव्हाही आणि कोठेही मोबाइलवरून ऐकण्याची सोय त्यामुळे झाली आहे.  

मागच्याच आठवडय़ात आकाशवाणीने हे अनोखे एआयआर न्यूज अ‍ॅप सुरू केले आहे. वापरण्यासाठी अतिशय साधे सोपे आणि तांत्रिकदृष्टय़ा उत्तम असे हे अ‍ॅप आहे. या अ‍ॅपच्या आधारे आपण आकाशवाणीवरील इंग्लिश व िहदीबरोबरच तब्बल ३० भारतीय भाषांमधील बातम्या ऐकू आणि वाचू शकता. स्थानिक, राज्य, देशपातळीवरील आणि आंतरराष्ट्रीय असे बातम्यांचे व्यवस्थित वर्गीकरण या अ‍ॅपवर केले असल्यामुळे आपणास हवा तो पर्याय निवडणे सोपे जाते. या अ‍ॅपवर भाषेची तसेच बातम्यांची निवड करण्याची पद्धत देखील अतिशय सोपी आहे. आकाशवाणी हे जरी श्राव्य माध्यम असले तरी, तुम्हाला बातम्या फक्त वाचायच्या असतील तर ती सुविधा देखील या अ‍ॅपवर उपलब्ध आहे. कामाच्या घाई गडबडीत तुमचा एखादा आवडता कार्यक्रम चुकला तर आता काळजी करायचे कारण नाही. कारण या अ‍ॅपवर जुने कार्यक्रम ऐकायची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. चेंज ब्रॉडकास्ट या मेनूवर दैनंदिन, साप्ताहिक आणि विशेष कार्यक्रम आपणास कधीही निवडता येतात. त्यामुळे आपल्या सोयीनुसार बातम्या, कार्यक्रम  ऐकणे सहज शक्य झाले आहे. हे अ‍ॅप नुकतेच सुरू झाले असल्यामुळे सध्या तरी मागील दोन आठवडय़ांचे कार्यक्रम यावर उपलब्ध आहेत. ध्वनी स्पष्टता हे या अ‍ॅपचे आणखी एक महत्त्वाचे वैशिष्टय़ म्हणावे लागेल. तसेच हे अ‍ॅप कार्यरत असताना तुम्ही मोबाईलवर दुसरे कामदेखील आरामात करू शकता. पण या अ‍ॅपवरून बातमी अथवा कार्यक्रम ऐकताना तो पॉज करायची, फॉरवर्ड अथवा रीवाईंड करायची सुविधा यात  दिलेली नाही. त्यामुळे एकदा बातम्या चालू केल्या की त्या पूर्ण ऐकूनच थांबावे लागते. असे असले तरी आजच्या मोबाइल युगात अ‍ॅप्सच्या माध्यमातून आकाशवाणीने केलेला हा प्रवेश निश्चितच उल्लेखनीय आणि स्वागतार्ह असा आहे. नव्या तंत्रामुळे नव्या पिढीला आकाशवाणीची ओळख तर होईलच पण जुन्या पिढीतील (जे आज सहजपणे स्मार्ट फोन वापरतात) मंडळींना त्यांच्या लाडक्या आकाशवाणीचा नव्या स्वरूपात आनंद घेता येईल.

 >>>>>>>>>>>>>>> www.allindiaradio.gov.in <<<<<<<<<<<<<<<<<<<<

या वेबसाईटवरून हे अ‍ॅप मोफत डाऊनलोड करता येते. सध्या तरी हे अ‍ॅप अँड्रॉइड प्रणालीवर आधारित मोबाइलवर व टॅबलेटवर वापरता येते. हे अ‍ॅप वापरताना मोबाइलवर इंटरनेट सुविधा असणे अनिवार्य आहे.

Loksatta Tech इट

Tags: AkashvaniAndroidApps
ShareTweetSend
Previous Post

आता फेसबुकचाही स्मार्टफोन येतोय!

Next Post

गुगलवरच गुगली

Sooraj Bagal

Sooraj Bagal

Related Posts

Google Play Best Apps & Games of 2025

गूगल प्ले स्टोअरवरील २०२५ चे सर्वोत्तम ॲप्स, गेम्स जाहीर!

November 23, 2025
OpenAI Sora 2

OpenAI ने आणलं Sora 2 आणि AI व्हिडिओसाठी इंस्टाग्रामसारखं अ‍ॅप!

October 1, 2025
गूगल I/O 2025: एआय आणि गूगलच्या सेवांमधील स्मार्ट तंत्रज्ञान

गूगल I/O 2025: एआय आणि गूगलच्या सेवांमधील स्मार्ट तंत्रज्ञान

May 29, 2025
WhatsApp for iPad

व्हॉट्सॲप आता ॲपल आयपॅडवरसुद्धा उपलब्ध!

May 28, 2025
Next Post

गुगलवरच गुगली

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ADVERTISEMENT
सॅमसंग Galaxy Z Fold8 Ultra, Fold8, Flip8, Watch Ultra2, Watch9 सादर

सॅमसंग Galaxy Z Fold8 Ultra, Fold8, Flip8, Watch Ultra2, Watch9 सादर

July 24, 2026
Skyroot Vikram 1

Skyroot च्या Vikram-1 या भारताच्या पहिल्या खासगी ऑर्बिटल रॉकेटचे यशस्वी प्रक्षेपण!

July 24, 2026
ॲपलने मॅकबुक, आयपॅडच्या आणि इतर प्रॉडक्टच्या किंमती वाढवल्या

ॲपलने मॅकबुक, आयपॅडच्या आणि इतर प्रॉडक्टच्या किंमती वाढवल्या

June 25, 2026
WhatsApp CEO Kunal Shah

CRED चे संस्थापक कुणाल शहा आता WhatsApp चे सीईओ!

June 25, 2026
MSRTC Timing Check Marathi

एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

September 25, 2012
मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

September 10, 2012
यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

November 4, 2016
ADVERTISEMENT
MarathiTech - मराठीटेक

तंत्रज्ञानाविषयी मराठी भाषेतली प्रसिद्ध वेबसाइट! नवं तंत्रज्ञान, नवनवे फोन्स, ॲप्स यांच्याबद्दल रंजक माहिती...

मराठीटेकला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा

सॅमसंग Galaxy Z Fold8 Ultra, Fold8, Flip8, Watch Ultra2, Watch9 सादर

सॅमसंग Galaxy Z Fold8 Ultra, Fold8, Flip8, Watch Ultra2, Watch9 सादर

July 24, 2026
Skyroot Vikram 1

Skyroot च्या Vikram-1 या भारताच्या पहिल्या खासगी ऑर्बिटल रॉकेटचे यशस्वी प्रक्षेपण!

July 24, 2026

सॅमसंग Galaxy Z Fold8 Ultra, Fold8, Flip8, Watch Ultra2, Watch9 सादर

Skyroot च्या Vikram-1 या भारताच्या पहिल्या खासगी ऑर्बिटल रॉकेटचे यशस्वी प्रक्षेपण!

ॲपलने मॅकबुक, आयपॅडच्या आणि इतर प्रॉडक्टच्या किंमती वाढवल्या

CRED चे संस्थापक कुणाल शहा आता WhatsApp चे सीईओ!

गूगलच्या वर्कस्पेस अ‍ॅप्समध्ये नवीन आयकॉन्स

  • About
  • Advertise
  • Privacy Policy
  • Contact

© MarathiTech 2024 A Product by BagalTech

error: Content is protected!
No Result
View All Result
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • खास लेख
  • गेमिंग
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • शॉपिंग ऑफर्स
  • आमच्याबद्दल About Us
  • संपर्क – प्रतिक्रिया

© MarathiTech 2024 A Product by BagalTech