MarathiTech - मराठीटेक
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
MarathiTech - मराठीटेक
No Result
View All Result
Home इंटरनेट

गुगलवरच गुगली

Sooraj Bagal by Sooraj Bagal
April 5, 2013
in इंटरनेट
तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात बदल ही नवीन गोष्ट नसली तरी तेसर्वांनाच पसंत पडतील याची खात्री मात्र कुणीच देऊ शकतनाही . अगदी बड्या कंपन्यांनाही त्यामुळे टीकेचा सामना करावा लागतो . सध्या गुगलवर ही वेळ आली असूनजीमेल , डूडल आणि प्रायव्हसी पॉलिसीवरुन गुगलला टीकेचा सामना करावा लागतो आहे . 

जीमेल मध्ये नवीन ईमेल टाइप करण्यासाठी पूर्वी नवीन पेज दिसत होते . पण त्याऐवजी आता नवीन पॉप – अपविंडो ओपन होऊ लागली आहे . ऑक्टोबरपासून गुगल त्याची चाचपणी करत होते आणि पूर्वीच्या पेक्षा ही पद्धतअधिक वेगवान असल्याचे कंपनीचे म्हणणे आहे . जीमेल युझर मात्र यावर खूश नाहीत . त्यांनी ट्विटरवरयाविषयी नापसंती व्यक्त केली असून इतर ईमेल सर्विसचा वापर करण्याचा विचार करत असल्याचे त्यांचे म्हणणेआहे . मात्र ज्या युझर्सला हा बदल आवडलेला नाही त्यांना जुन्या पद्धतीनेच ईमेल टाइप करण्याची सोय उपलब्धआहे . त्यासाठी कंपोझ बटनावर क्लिक केल्यावर नवीन ईमेल टाइप करण्यासाठी पॉप अप विंडो ओपन होईल .त्या विंडोमध्ये उजव्या हाताच्या खालील भागात more options असा पर्याय उपलब्ध आहे . त्यावर क्लिककेल्यावर temporily switch back to old compose असा ऑप्शन उपलब्ध आहे . त्यावर क्लिक केल्यावरपूर्वीप्रमाणे नवीन मेल टाइप करण्यासाठी स्वतंत्र पेज ओपन होईल . 

इस्टरच्या डुडलवरून टीका 

सीझार चावेझ यांच्या जयंतीनिमित्त इस्टरच्या दिवशी गुगलने तयार केलेले डूडल अनेक अमेरिकन नागरिकांनापसंत पडले नाही . अमेरिकेतील नॅशनल फार्म वर्कर्स असोसिएशनचे सहसंस्थापक असलेल्या चावेझ यांचे १९९३मध्ये निधन झाले होते . गेल्यावर्षी ३१ मार्च हा दिवस ओबामा यांनी सीझार चावेझ डे म्हणून जाहीर केला होता. त्यामुळे गुगलने रविवारी तयार केलेल्या डूडलमध्ये गुगल लोगोच्या मध्यभागी चावेझ यांचा चेहरा बसविण्यातआला होता . मात्र नेमका त्याच दिवशी इस्टर असल्याने इस्टरऐवजी चावेझ यांच्यावर डूडल तयार केल्याने अनेकनागरिक नाराज झाले . गुगलचे मुख्य कार्यकारी अधिकारी इरिक स्मिड आणि ओबामा यांच्यातील घनिष्टसंबंधांमुळे हे डूडल तयार करण्यात आल्याचा आरोप करण्यापर्यंत अनेकांची मजल गेली . 

प्रायव्हसीवरुन युरोपियन देशांचा रोष 

ब्रिटन , फ्रान्स , नेदरलँड , जर्मनी , स्पेन आणि इटली या सहा देशांनी मिळून गुगलच्या प्रायव्हसीपॉलिसीविरोधात संयुक्त कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे . गेल्यावर्षी कंपनीने ६० स्वतंत्र प्रायव्हसीपॉलिसी एकत्र करून एक युनिव्हर्सल पॉलिसी तयार केली होती . मात्र त्यामुळे गुगलकडे ग्राहकांची काय माहितीआहे आणि ती कंपनीकडे किती काळ राहील हे त्यांना कळत नसल्याचा आरोप या देशांनी केला आहे . माहितीतंत्रज्ञान क्षेत्रातील तज्ञांना मात्र कंपनीच्या सर्च इंजिनच्या यशस्वितेसाठी ही पॉलिसी गरजेची असल्याचे वाटते .

ADVERTISEMENT
Tags: GooglePrivacy
ShareTweetSend
Previous Post

अ‍ॅप्सच्या दुनियेत आकाशवाणी

Next Post

मोबाइल चाळिशीत

Sooraj Bagal

Sooraj Bagal

Related Posts

गूगलचं ChatGPT ला उत्तर : Bard नावाचा AI चॅटबॉट!

गूगलचं ChatGPT ला उत्तर : Bard नावाचा AI चॅटबॉट!

February 7, 2023
Google India Trends

भारतीयांनी २०२२ मध्ये गूगलवर ‘काय’ शोधलं? : गूगल इयर इन सर्च

December 13, 2022
गूगलचे Pixel 7 & 7 Pro सादर : भारतातही मिळणार!

गूगलचे Pixel 7 & 7 Pro सादर : भारतातही मिळणार!

October 6, 2022
Pixel 6a India

गूगलचा Pixel 6a भारतात उपलब्ध : सोबत Pixel Buds Pro सुद्धा!

July 21, 2022
Next Post

मोबाइल चाळिशीत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ADVERTISEMENT
आता UPI पेमेंट केल्यावर अतिरिक्त चार्जेस द्यावे लागणार का?

आता UPI पेमेंट केल्यावर अतिरिक्त चार्जेस द्यावे लागणार का?

March 29, 2023
Global UA Day : आयटी मंत्रालयातर्फे कार्यक्रम : मराठीटेकचाही सहभाग!

Global UA Day : आयटी मंत्रालयातर्फे कार्यक्रम : मराठीटेकचाही सहभाग!

March 29, 2023
भारताचं सर्वात मोठं रॉकेट LVM3 प्रक्षेपण : इस्रोची यशस्वी कामगिरी!

भारताचं सर्वात मोठं रॉकेट LVM3 प्रक्षेपण : इस्रोची यशस्वी कामगिरी!

March 27, 2023
इंटेलचे सहसंस्थापक गॉर्डन मूर यांचं निधन : Moore’s Law चे निर्माते

इंटेलचे सहसंस्थापक गॉर्डन मूर यांचं निधन : Moore’s Law चे निर्माते

March 25, 2023
एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

September 25, 2012
यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

November 4, 2016
मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

September 10, 2012
ADVERTISEMENT
MarathiTech – मराठीटेक

तंत्रज्ञानाविषयी मराठी भाषेतली प्रसिद्ध वेबसाइट! नवं तंत्रज्ञान, नवनवे फोन्स, ॲप्स यांच्याबद्दल रंजक माहिती...

मराठीटेकला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा

आता UPI पेमेंट केल्यावर अतिरिक्त चार्जेस द्यावे लागणार का?

आता UPI पेमेंट केल्यावर अतिरिक्त चार्जेस द्यावे लागणार का?

March 29, 2023
Global UA Day : आयटी मंत्रालयातर्फे कार्यक्रम : मराठीटेकचाही सहभाग!

Global UA Day : आयटी मंत्रालयातर्फे कार्यक्रम : मराठीटेकचाही सहभाग!

March 29, 2023

आता UPI पेमेंट केल्यावर अतिरिक्त चार्जेस द्यावे लागणार का?

Global UA Day : आयटी मंत्रालयातर्फे कार्यक्रम : मराठीटेकचाही सहभाग!

भारताचं सर्वात मोठं रॉकेट LVM3 प्रक्षेपण : इस्रोची यशस्वी कामगिरी!

इंटेलचे सहसंस्थापक गॉर्डन मूर यांचं निधन : Moore’s Law चे निर्माते

नवा व्हिडिओ : ॲपल मॅकवर मराठीत टायपिंग!

  • About
  • Advertise
  • Privacy Policy
  • Contact

© MarathiTech 2022 A Product by BagalTech

No Result
View All Result
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • खास लेख
  • गेमिंग
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • शॉपिंग ऑफर्स
  • आमच्याबद्दल About Us
  • संपर्क – प्रतिक्रिया

© MarathiTech 2022 A Product by BagalTech

error: Content is protected!