MarathiTech - मराठीटेक
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
MarathiTech - मराठीटेक
No Result
View All Result
Home Security

भारतातील हॅकिंग घटले

Sooraj Bagal by Sooraj Bagal
May 10, 2013
in Security
जगभरात सायबर हल्ल्यांची भीती व्यक्त होत असतानाभारतात मात्र हॅकिंगचे प्रमाण कमी झाल्याचे निदर्शनासआले आहे . जगभरात हॅकिंगचे प्रमाण चीनमध्ये सर्वाधिक असल्याचे निदर्शनास आले आहेत . हॅकिंगच्या बाबतीत ‘टॉप टेन ‘ देशांच्या यादीत भारत आठव्या स्थानावर आहे . 

‘ अकामयी टेक्नॉलॉजीस ‘ या कंपनीने हॅकिंगच्या प्रमाणाबाबत केलेल्या सर्वेक्षणात विविध देशांची धक्कादायकमाहिती समोर आली आहे . जगभरातील एकूण हॅकिंग पैकी ४१ टक्के हॅकिंग हे चीनमध्ये होत असल्याचे निदर्शनासआले आहे . सन २०१२च्या शेवटच्या तिमाहीत झालेल्या हॅकिंगवरून ही आकडेवारी काढण्यात आली असून ,याची कारणमीमांसाही करण्यात आली आहे . चीनमध्ये हॅकर्सचे सर्वात मोठे नेटवर्क असल्याचे सर्वेक्षणात आढळलेआहे . यात काम करणारे काही लोक चीनच्या सैन्यातील असल्याचेही समोर आले आहे . चीन खालोखालअमेरिकेचा नंबर येतो . अमेरिकेत हॅकिंगचे प्रमाण १० टक्के असून , हे प्रमाण आधीच्या तिमाहीपेक्षा तीनटक्क्यांनी कमी झाले आहे . अमेरिकेत सर्वाधिक अनॉनिमस आणि विध्वंसक कारवाया करणारे अॅण्टिसेक लोकअसून , तेथे सायबर हल्ले रोखण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा उभी करण्यात आली आहे . तिसऱ्या क्रमांकावर तुर्कस्तानहा देश आहे . या देशात हॅकिंगचे प्रमाण ४ . ७ टक्के इतके आहे . मागील तुलनेत या देशातील हॅकिंगचे प्रमाणमोठ्या प्रमाणावर वाढले आहे .
 रशियाचा क्रमांक चौथा असून , या देशातील हॅकिंगचे प्रमाण ४ . ३ टक्के इतके आहे . तैवान हा देश चीनी हॅकर्सचा नेहमीचाच टार्गेट राहीला आहे . मात्र , या देशाने उभी केलेली सायबर सुरक्षा यंत्रणा चीनी हल्लेखोरांना पुरून उरली आहे . देशातील हॅकिंगचे प्रमाण १२ . ७ टक्क्यांवरून ३ . ७ टक्क्यांवर आले आहे . त्याखालोखाल ब्राझील , रोमानिया या देशांचा नंबर येतो . या खालोखाल आठव्या स्थानी भारताचा क्रमांक येतो . भारतातील हॅकिंगचे प्रमाण हे २ . ३ टक्के इतके आहे . यापूर्वी हे प्रमाण २ . ५ टक्के इतके होते , तर मागील वर्षी ते तीन टक्के इतके होते . देशातील सायबर सुरक्षा यंत्रणा अधिक प्रभावी करण्यात आली असून ,एथिकल हॅकर्सचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढविण्यात आले आहे . या खालोखाल इटली नवव्या स्थानावर तर हंगेरी दहाव्या स्थानावर आहे . जगातील सर्वात मोठा धोका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सायबर क्राइमकडे जगातील सर्व देशांनी विशेष लक्ष पुरविले आहे . यामुळे हल्लेखोरांना हल्ले करणे कठीण होत असल्याचे सर्वेक्षणात नमूद करण्यात आले आहे . भारताच्या बाबतीत सायबर सुरक्षेच्या दृष्टीने सर्वात प्रगत देश म्हणून असे संबोधण्यात आले आहे .

ADVERTISEMENT
Tags: ServeryTop
ShareTweetSend
Previous Post

टेकमय सुट्टी

Next Post

‘गुगल ट्रान्स्लेटर’ अखेर मराठीतही!

Sooraj Bagal

Sooraj Bagal

Related Posts

अॅपल अॅप स्टोअरवरील २०१८ मधील सर्वोत्तम अॅप्स व गेम्सची यादी जाहीर!

अॅपल अॅप स्टोअरवरील २०१८ मधील सर्वोत्तम अॅप्स व गेम्सची यादी जाहीर!

December 6, 2018
गूगल इयर इन सर्च : २०१७ मध्ये भारतीयांनी ‘हे’ केलं सर्च!

गूगल इयर इन सर्च : २०१७ मध्ये भारतीयांनी ‘हे’ केलं सर्च!

December 14, 2017
मोबाइल शॉपिंग जोरात

मोबाइल शॉपिंग जोरात

May 6, 2013

मोबाइल खिलाडी मोबाइल गेम्स

February 11, 2013
Next Post

'गुगल ट्रान्स्लेटर' अखेर मराठीतही!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ADVERTISEMENT
ॲपलने मॅकबुक, आयपॅडच्या आणि इतर प्रॉडक्टच्या किंमती वाढवल्या

ॲपलने मॅकबुक, आयपॅडच्या आणि इतर प्रॉडक्टच्या किंमती वाढवल्या

June 25, 2026
WhatsApp CEO Kunal Shah

CRED चे संस्थापक कुणाल शहा आता WhatsApp चे सीईओ!

June 25, 2026
Google Workspace New App Icons

गूगलच्या वर्कस्पेस अ‍ॅप्समध्ये नवीन आयकॉन्स

May 29, 2026
Freepik Is Now Magnific

Freepik कंपनीचं नवं नाव आता Magnific : स्टॉक फोटोज् व AI टूल्ससाठी प्रसिद्ध

April 29, 2026
MSRTC Timing Check Marathi

एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

September 25, 2012
यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

November 4, 2016
मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

September 10, 2012
ADVERTISEMENT
MarathiTech - मराठीटेक

तंत्रज्ञानाविषयी मराठी भाषेतली प्रसिद्ध वेबसाइट! नवं तंत्रज्ञान, नवनवे फोन्स, ॲप्स यांच्याबद्दल रंजक माहिती...

मराठीटेकला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा

ॲपलने मॅकबुक, आयपॅडच्या आणि इतर प्रॉडक्टच्या किंमती वाढवल्या

ॲपलने मॅकबुक, आयपॅडच्या आणि इतर प्रॉडक्टच्या किंमती वाढवल्या

June 25, 2026
WhatsApp CEO Kunal Shah

CRED चे संस्थापक कुणाल शहा आता WhatsApp चे सीईओ!

June 25, 2026

ॲपलने मॅकबुक, आयपॅडच्या आणि इतर प्रॉडक्टच्या किंमती वाढवल्या

CRED चे संस्थापक कुणाल शहा आता WhatsApp चे सीईओ!

गूगलच्या वर्कस्पेस अ‍ॅप्समध्ये नवीन आयकॉन्स

Freepik कंपनीचं नवं नाव आता Magnific : स्टॉक फोटोज् व AI टूल्ससाठी प्रसिद्ध

ॲपलचे नवे सीईओ जॉन टर्नस : टिम कुक यांच्यानंतर घेणार जबाबदारी!

  • About
  • Advertise
  • Privacy Policy
  • Contact

© MarathiTech 2024 A Product by BagalTech

error: Content is protected!
No Result
View All Result
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • खास लेख
  • गेमिंग
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • शॉपिंग ऑफर्स
  • आमच्याबद्दल About Us
  • संपर्क – प्रतिक्रिया

© MarathiTech 2024 A Product by BagalTech