MarathiTech - मराठीटेक
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
  • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
  • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
MarathiTech - मराठीटेक
No Result
View All Result
Home News

टेकमय सुट्टी

Sooraj Bagal by Sooraj Bagal
May 9, 2013
in News
ADVERTISEMENT

twitt.jpgसुट्ट्यांमध्ये सर्वांचा टाइमपास म्हणजे फेसबुकवर वेळघालवणे . याच जोडीला आपण अशा काही गोष्टी करूशकतो , ज्यामुळे आपल्याला भविष्यात आपल्या करिअरलात्याचा फायदा होऊ शकतो . यासाठी तुम्हाला कुठल्याहीवर्कशॉपला किंवा घराच्या बाहेरही पडण्याची गरज नाही .अगदी घरी बसून तुम्ही तुमच्या या सर्व गोष्टी करू शकता .याबाबत सांगतायेत अनुपम भाटवडेकर आणि पराग मयेकर
ब्लॉगर . कॉम 
आपल्या मनातील भावना , वाचनात येणाऱ्या चांगल्या गोष्टीकिंवा अगदी आपल्या आवडीच्या गोष्टी लिहून ठेवाव्याशावाटतात . वही पेन ऐवजी आपण कम्प्युटरचा वापरकरायला लागलो . पण या गोष्टी आणखी काही जणांशी शेअर करायच्या असतील , तर तुम्ही blogger.com यावेबसाइटवर तुमचा ब्लॉग क्रिएट करू शकता . त्या ब्लॉगची डिझाइन आणि त्यातले आर्टिकलही सेट करू शकता .ही वेबसाइट फ्री आहे आणि जर तुम्हाला तुमचा ब्लॉग जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायला हवा असेल , तरगुगलने अॅडसेन्स असा प्रोग्राम काढला आहे . ज्यात तुम्ही प्रत्येक महिनाला काही ठराविक रक्कम गुगलला देऊन ,आपल्या ब्लॉगला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवू शकता . या वेबसाइटमध्ये गुगल टूल बार आणि सोशलसाइट्सचे इंटिग्रेशन आहे . त्यामुळे आपल्या ब्लॉगला इतर साइट्सद्वारेही बघता येतं आणि शेअर करता येतं . 
वर्डप्रेस . कॉम 
ही इंटरनॅशनल वेबसाइट आहे , अमेरिकेमध्ये याचा वापर जास्त होतो . या साइटवर विविध व्यवसायातील लोकआपले ब्लॉग्ज बनवत असतात . wordpress.com या साइटच्या माध्यमातून तयार केलेल्या ब्लॉगवर तुम्हीवेबसाइटमध्ये निरनिराळ्या थीम्स आणि टेमप्लेट्स दिले गेले आहेत . या वेबसाइटचे फीचर्स आहेत विड्जेट्सआणि प्लगिन्स इंटिग्रेशन , ज्याचा वापर आपल्या साइट्सच्या इंटरफेसमध्ये आणि इतर गोष्टींसाठी केला जातो .मल्टी – यूजर्स आणि मल्टी – ब्लॉगिंग करता येतं जेणेकरून आपली साइट्स आपल्या कंपनीमधली लोकं एकत्र पणचालवू शकतात . टॅगिंगमुळे साइट्स जास्तीत जास्त प्रदर्शित करू शकतो . 
टुम्बलर . कॉम 
तुम्हाला भारंभार लिहायला आवडत नसेल आणि ट्विटरपेक्षा जास्त स्पेस हवी असले तर तुम्ही मायक्रोब्लॉगिंगचा पर्याय स्वीकारू शकतात . यासाठी तुम्ही tumblr.com चा पर्याय निवडू शकतात . या वेबसाइटनेतुम्हाला डॅशबोर्ड , टॅगिंग , मोबाइल आणि एचटीएमएल कोडिंगचे फीचर्स उपलब्ध करून दिले आहेत . याफीचर्सचा खूप उपयोग होतो आणि खूप चांगल्या तऱ्हेने आपला ब्लॉग लोकांसमोर सादर करता येतो . यासाइटच्या मदतीला Thoughts.com and Xanga.com या वेबसाइट्सही उपलब्ध आहेत . 
विक्स . कॉम 
तुम्हाला तुमचा फोटोग्राफिकल पोर्टफोलिओ किंवा पर्सनल वेबसाइट बनवायची असेल तर तुम्ही wix.com चापर्याय निवडू शकता . या साइटवर तुम्हाला ‘ ड्रॅग एण्ड ड्रॉप ‘ हा वेबसाइट बिल्डिंग प्लॅटफॉर्म एचटीएमएन ५ सहमिळतो . कॅपबिलिटीज , १००पेक्षा जास्त डिझायनर मॅड टेमप्लेट्स , टॉप ग्रेड होस्टिंग , इनोवेटिव्ह अॅप्स आणिविवध फीचर्स आहेत तेही फ्री . या वेबसाइटमध्ये खूप टेमप्लेट्स आहेत ज्यात बिझनस आणि पर्सनल असे विविधटेमप्लेट्स आहेत . या वेबसाइटध्ये बॅनर अॅड्स आहेत . 
वीबली . कॉम 
विविध एलिमेंट्स व्हिडीओज , फोटो गॅलरीज , मॅप्स , फॉरम्स , कॉंटॅक्ट फॉर्मस आणि इतर फीचर्स weebly.comया वेबसाइटमध्ये तुम्हाला वेग्रे थीम्स आणि टेमप्लेट्सचा वापर करून पर्सनल वेबसाइट्स आणि बिझनेसवेबसाइट्सही तयार करता येऊ शकते . ही सुद्धा ड्रॅग अँड ड्रॉप बेस्ड वेबसाइट आहे . ज्यात वेबसाइट बनवणं खूपसोपं आहे . या वेबसाइटला प्रोफेशनल लूकही देता यतो . ज्यांना वेबसाइट डिझाइन करण्याची आवड आहे , अशालोकांनी या वेबसाइटची मदत घेऊन काम करण्यास हरकत नाही . 
वेब्ज . कॉम 
‘ ड्रॅग अॅण्ड ड्रॉप ‘ बेस्ड असेलेली ही आणखी एक वेबसाइट . यामध्ये तुम्हाला फेसबुक आणि ट्विटर यांच्या लिंक्सही तयार करता येणार आहेत . या वेबसाइटमध्ये बॅनर अॅड्स देण्यात आल्या आहेत . त्या अॅड्स जर आपल्याला नको असतील , तर आपल्याला पैसे भरावे लागतात . याचप्रकारे काम करणारी moonfruit.com अशीही एक वेबसाइट आहे . 
फेसबुक पेज 
या सुट्टीत तुमच्या आवडीच्या विषयावर एखादं फेसबुक पेज तयार करून ते आपल्या फेसबुक कंटेंट शेअर करूनत्यावर अधिकाधिक लाइक्स आणि कमेंटस मिळवू शकता . यात फोटोग्राफी , टेक्नॉलॉजी , म्युझिक , व्हिडीओज ,जोक्स , फूड अॅण्ड हॉटेल्स हे विषय सध्या हिट आहेत . या पेजमुळे तुम्ही अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचून एखाद्याविषयावर अधिक संवाद घडवून आणला जाऊ शकतो . एकट्याने किंवा ग्रुपने फेसबुक पेज मॅनेज करण्याचापर्यायही उपलब्ध आहे . 
युट्यूब चॅनेल 
तुमच्यातील कला लोकांपर्यंत पोहचविण्याचे सर्वात प्रभावी माध्यम म्हणून सध्या याकडे पाहिले जाते . ‘कोलावेरी डी ‘ या गाण्याचे यशही या वेबसाइटमध्येच दडले आहेत . तुम्ही तुमची कला सादर करताना त्याचे व्हिडीओ बनवून ते फेसबुकवर शेअर करू शकता . यामुळे कदाचित तुम्हाला तुमच्या आवडीच्या क्षेत्रात चांगलीसंधीही मिळू शकते . मग मित्रांनो सुटीत मज्जा , मस्ती याबरोबर थोडावेळ यासाठी खर्ची केला तर तुमच्याकरिअरमध्ये याचा नक्कीच फायदा होऊ शकतो . 
टिवटिव 
आपले विचार थोडक्या शब्दांत लोकांपर्यंत पाहोचवण्यासाठी तुम्ही ट्विटरचा वापर करू शकता . व्यावसायिक व्यक्ती किंवा इतर कंपन्यांमधील उच्चपदस्थ मंडळीच ट्विटरचे अकाऊंट ओपन करू शकता , अशी अनेकांची समजूत आहे . मात्र प्रत्यक्षात तसे नसून , कुणीही ट्विटरचे अकाऊंट ओपन करून फॉलोअर्स मिळवू शकता . तुम्ही एखाद्या विषयाला वाहिलेले ट्विटर अकाऊंट तयार करू शकता , ज्यावर तुम्ही तुमच्या फॉलोअर्सशी ट्विटरद्वारे संवादही साधू शकता . फेसबुक पेज आणि ट्विटर हे दोन्ही लिंक करता येतात , यामुळे एका ठिकाणी पोस्टकेलेली माहिती दुसऱ्या ठिकाणी आपोआप पोस्ट होते .

Related Keywords : Enjoy, Technology holiday, social networking, Facebook  youtube  twitter, weebly, wordpress, tumblr

Tags: BloggerHolidaytumblrTwitterWebsWordpressYouTube
ShareTweetSend
Previous Post

सुरक्षितता तुमच्या अकाऊंटची Secure email or facebook accounts

Next Post

भारतातील हॅकिंग घटले

Sooraj Bagal

Sooraj Bagal

Related Posts

twitter elon musk

इलॉन मस्कने ट्विटर कंपनी विकत घेतली : ३,३७,००० कोटींचा व्यवहार!

April 26, 2022
YouTube Vanced APK

YouTube Vanced बंद होणार : गूगलकडून कारवाई!

March 14, 2022
YouTube India Economy

यूट्यूबर्समुळे भारताच्या GDP मध्ये ६८०० कोटींची भर : २०२० मधील आकडेवारी!

March 4, 2022
Twitter Tips Paytm

ट्विटरवर टीपद्वारे पैसे स्वीकारण्यासाठी पेटीएमचाही पर्याय उपलब्ध!

February 17, 2022
Next Post

भारतातील हॅकिंग घटले

Comments 2

  1. Anonymous says:
    5 years ago

    tx white pages reverse address phone number usa free phone number
    cell phone reverse phone lookup get information about a phone number where is the
    number from white pages mobile directory

    Stop by my site reverse phone number lookup canada

    Reply
  2. Anonymous says:
    5 years ago

    Hi my loved one! I want to say that this article is amazing, nice written and come with almost
    all vital infos. I would like to look more posts like this .

    Reply

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ADVERTISEMENT
VLC मीडिया प्लेयरवर भारतात बंदी : वेबसाइट, डाउनलोड ब्लॉक!

VLC मीडिया प्लेयरवर भारतात बंदी : वेबसाइट, डाउनलोड ब्लॉक!

August 14, 2022
WhatsApp Privacy Update

व्हॉट्सॲपचं नवं प्रायव्हसी अपडेट : इतरांच्या नकळत ग्रुप सोडता येणार!

August 9, 2022
Gmail Redesign 2022

जीमेल आता नव्या रूपात : नव्या डिझाईनसोबत वर्कस्पेस एका क्लिकवर!

July 29, 2022
Google Street View India

गूगलची स्ट्रीट व्ह्यू भारतात पुन्हा सुरू : १० शहरांचा 360° पॅनोरामा पहा!

July 27, 2022
एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

September 25, 2012
मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

September 10, 2012
यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

November 4, 2016
ADVERTISEMENT
MarathiTech – मराठीटेक

तंत्रज्ञानाविषयी मराठी भाषेतली प्रसिद्ध वेबसाइट! नवं तंत्रज्ञान, नवनवे फोन्स, ॲप्स यांच्याबद्दल रंजक माहिती...

मराठीटेकला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा

VLC मीडिया प्लेयरवर भारतात बंदी : वेबसाइट, डाउनलोड ब्लॉक!

VLC मीडिया प्लेयरवर भारतात बंदी : वेबसाइट, डाउनलोड ब्लॉक!

August 14, 2022
WhatsApp Privacy Update

व्हॉट्सॲपचं नवं प्रायव्हसी अपडेट : इतरांच्या नकळत ग्रुप सोडता येणार!

August 9, 2022

VLC मीडिया प्लेयरवर भारतात बंदी : वेबसाइट, डाउनलोड ब्लॉक!

व्हॉट्सॲपचं नवं प्रायव्हसी अपडेट : इतरांच्या नकळत ग्रुप सोडता येणार!

जीमेल आता नव्या रूपात : नव्या डिझाईनसोबत वर्कस्पेस एका क्लिकवर!

गूगलची स्ट्रीट व्ह्यू भारतात पुन्हा सुरू : १० शहरांचा 360° पॅनोरामा पहा!

ॲमेझॉन प्राइम डे सेल २३ व २४ जुलै : प्राइम ग्राहकांसाठी खास ऑफर्स!

  • About
  • Advertise
  • Privacy Policy
  • Contact

© MarathiTech 2022 A Product by BagalTech

No Result
View All Result
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • खास लेख
  • गेमिंग
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • शॉपिंग ऑफर्स
  • आमच्याबद्दल About Us
  • संपर्क – प्रतिक्रिया

© MarathiTech 2022 A Product by BagalTech

error: Content is protected!