MarathiTech - मराठीटेक
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
MarathiTech - मराठीटेक
No Result
View All Result
Home स्मार्टफोन्स

नोकियाचा नवीन आशा ५०१? 48 दिवस चालणार बॅटरी New Nokia Asha 501 WiFi BT

Sooraj Bagal by Sooraj Bagal
May 12, 2013
in स्मार्टफोन्स

मोबाइलच्या दुनियेत एकेकाळी सत्ता गाजवणा-या नोकियाने स्वस्त सॅमसंग मोबाइलला टक्कर देण्यासाठी आपल्या नोकिया आशा सिरिजमधला नवीन फोन नुकताच लॉन्च केला. नवी दिल्ली येथे झालेल्या एका भव्य कार्यक्रमात नोकियाचे सीईओ स्टीफन इलोप यांनी नोकिया आशा ५०१ या नवीन मोबाइल फोनचे आनावरण केले. सध्या भारतातील अनेक देशी आणि विदेशी कंपन्यांच्या अॅण्ड्रॉइड बेस मोबाइल्सला टक्कर देण्यासाठी नोकियाचा हा प्रयत्न असल्याची चर्चा आहे.


नोकिया आशा सिरिजने ज्याप्रकारे भारतात विक्रीचे विक्रम केले आहेत त्याबद्दल कंपनी समाधानी असून आशा सिरिज अपडेट करण्याच्या दृष्टीनेच हा नवीन आशा ५०१ हा फोन कंपनीने बाजारात उतरवण्याचे ठरवले आहे, असे मत स्टीफन इलोप यांनी व्यक्त केले. तसेच खास भारतीय ग्राहकांचा विचार करुन नोकियाने आशा ५ सिरीजमधील मोबाइल डिझाइन केल्याचा दावाही स्टीफन यांनी केला.


 नोकियाने फेसबूकसोबत पार्टनशीप केली असून नोकिया आशा ५०१ वापरणा-यांना एअरटेल आणि एमटीएनएल नेटवर्कवरुन मोफत फेसबूक वापरता येणार असल्याचेही कंपनीने सांगितले.
संपूर्ण टच स्क्रीन असणारा हा फोन नोकिया लुमियाचा लहान अवतार वाटावा अशी या फोनची डिझाइन असून हा फोन सहा रंगामध्ये उपलब्ध होणार असल्याची माहिती कंपनीने दिली. हा फोन बाजारात येणासाठी ग्राहकांना जून महिन्यापर्यंत वाट पहावी लागणार आहे. ह्या मोबाइलची किंमत साडेपाच हजार रुपयांपर्यंत (९९ डॉलर+ टॅक्स) असणार आहे. 

नोकिया आशा 501 लॉंच, 48 दिवस चालणार बॅटरी आणि किंमतही फक्‍त 5300 रूपये

48 दिवस चालणार बॅटरी आणि किंमतही फक्‍त 5300 रूपये

सध्या अनेक कंपन्यांनी १० हजार रुपयांवरुनही कमी किंमतीत अॅण्ड्रॉइड बेस मोबाइल बाजारात उतरवले असल्याने सध्या नोकियाच्या मोबाइलच्या खपामध्ये कमालीची घट झाली आहे. मागील वर्षी पहिल्या तीन महिन्याच्या ९.३ लाख मोबाइलच्या तुलनेत या वर्षी नोकिया आशाचे फक्त ५ लाख मोबाईल विकले गेले आहेत. त्यामुळे विंडोजवर काम करणारा ‘आशा ५०१’ हा भारतीय बाजारात टीकून राहण्यासाठी नोकियाचा प्रयत्न असल्याचे मत जाणकारांनी व्यक्त केली आहे.


*नोकीया आशा ५०१ स्पेसिफिकेशन


नेटवर्क : जीएसम
स्टाइल : बार
डायमेन्शन्स : ९९.२*५८*१२.१ एमएम
वजन : ९८ ग्रॅम (बॅटरीसहीत)
बॅटरी टाइप : लि-ओन १२०० एमएच (बीएल- फोर यू)
डीसप्ले रिझोल्यूशन : ३२०*२४० पिक्स
इनबिल्ट मेमरी : १२८ एमबी (इंटरनल) + ४ जीबी (एमएमसी)
एक्सटर्नल मेमरी : मायक्रो एसडी ३२ जीबी
मेसेज : एमएमएस, इमेल.
कॅमेरा रिझोल्यूशन : ३.२ मेगापिक्सल २०४८*१५३६ पिकसल्स
कॅमेरा झूम : ३* डीजीटल झूम फिक्स फोकससहीत
व्हिडीओ कॅप्चर : एमपीइजी-४. एच.२६४. एव्हीसी, एच.२६३
म्यूझीक प्लेअर : एमपी थ्री, एमआर डब्यूबी क्ष एनबी, एमआयडीआय सपोर्ट.
एफएम रेडीओ
लाउड स्पीकर्स
पोर्ट कनेक्टव्हीटी: यूएसबी पोर्ट २.०
ब्लूटूथ कनेक्टव्हीटी : व्ही ३.० ओपीपी. एचएफपी, एचएसपी, पीबीएपी सहीत
वायफाय कनेक्टव्हीटी : वीलॅन आयईईई ८०२.११ बी/जी
इंटरनेट कनेक्टव्हीटी: जीपीआपएस. इडीजीइ
ऑपरेटींग सिस्टीम : नोकीया आशा सीरीज १.०.


* काय नाही
ड्यूएल सीमकार्ड स्लॉट नाही.
पुश मेल सुविधा उपलब्ध नाही.
इन्फ्रारेड आणि एटूडीपी कनेक्टव्हीटी नाही.
थ्रीजी कनेक्टीव्हीटी नाही.
जीपीएस नेटवर्क नाही.

ADVERTISEMENT
Tags: AshaNokiaSmartphones
ShareTweetSend
Previous Post

‘गुगल ट्रान्स्लेटर’ अखेर मराठीतही!

Next Post

तुमच्यावर ‘नजर’ आहे

Sooraj Bagal

Sooraj Bagal

Related Posts

नोकियाचा कंपनीचा नवा लोगो

नोकियाचा कंपनीचा नवा लोगो

March 1, 2023
वनप्लस 11, 11R फोन्स, OnePlus Pad, किबोर्ड, टीव्ही, इ. सादर!

वनप्लस 11, 11R फोन्स, OnePlus Pad, किबोर्ड, टीव्ही, इ. सादर!

February 7, 2023
Samsung Galaxy S23

सॅमसंगचे Galaxy S23, S23+ आणि S23 Ultra सादर!

February 1, 2023
Redmi Note 12 Series

Redmi Note 12 सिरीज सादर : आता चक्क 200MP कॅमेरा 5G सह!

January 5, 2023
Next Post

तुमच्यावर 'नजर' आहे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ADVERTISEMENT
नवा व्हिडिओ : ॲपल मॅकवर मराठीत टायपिंग!

नवा व्हिडिओ : ॲपल मॅकवर मराठीत टायपिंग!

March 20, 2023
जियो व एयरटेलतर्फे ग्राहकांना अमर्यादित मोफत 5G डेटा!

जियो व एयरटेलतर्फे ग्राहकांना अमर्यादित मोफत 5G डेटा!

March 18, 2023
सॅमसंगचे Galaxy A34 5G आणि A54 5G भारतात सादर!

सॅमसंगचे Galaxy A34 5G आणि A54 5G भारतात सादर!

March 17, 2023
टी सिरीजच्या हनुमान चालीसा व्हिडिओला तब्बल ३०० कोटी व्ह्यूज!

टी सिरीजच्या हनुमान चालीसा व्हिडिओला तब्बल ३०० कोटी व्ह्यूज!

March 10, 2023
एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

September 25, 2012
मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

September 10, 2012
यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

November 4, 2016
ADVERTISEMENT
MarathiTech – मराठीटेक

तंत्रज्ञानाविषयी मराठी भाषेतली प्रसिद्ध वेबसाइट! नवं तंत्रज्ञान, नवनवे फोन्स, ॲप्स यांच्याबद्दल रंजक माहिती...

मराठीटेकला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा

नवा व्हिडिओ : ॲपल मॅकवर मराठीत टायपिंग!

नवा व्हिडिओ : ॲपल मॅकवर मराठीत टायपिंग!

March 20, 2023
जियो व एयरटेलतर्फे ग्राहकांना अमर्यादित मोफत 5G डेटा!

जियो व एयरटेलतर्फे ग्राहकांना अमर्यादित मोफत 5G डेटा!

March 18, 2023

नवा व्हिडिओ : ॲपल मॅकवर मराठीत टायपिंग!

जियो व एयरटेलतर्फे ग्राहकांना अमर्यादित मोफत 5G डेटा!

सॅमसंगचे Galaxy A34 5G आणि A54 5G भारतात सादर!

टी सिरीजच्या हनुमान चालीसा व्हिडिओला तब्बल ३०० कोटी व्ह्यूज!

नोकियाचा कंपनीचा नवा लोगो

  • About
  • Advertise
  • Privacy Policy
  • Contact

© MarathiTech 2022 A Product by BagalTech

No Result
View All Result
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • खास लेख
  • गेमिंग
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • शॉपिंग ऑफर्स
  • आमच्याबद्दल About Us
  • संपर्क – प्रतिक्रिया

© MarathiTech 2022 A Product by BagalTech

error: Content is protected!