MarathiTech - मराठीटेक
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
MarathiTech - मराठीटेक
No Result
View All Result
Home इंटरनेट

‘गुगल’वरच नेटची दुनिया बुलंद

Sooraj Bagal by Sooraj Bagal
August 28, 2013
in इंटरनेट
techno.jpgपूर्वी एखाद्या गोष्टीचा संदर्भ शोधायचा झाल्यास ग्रंथालयात जाऊन विविध पुस्तके संदर्भ ग्रथांचा आधार घेतला जात होता. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील क्रांतीमुळे ग्रंथालयात जाऊन पुस्तके पाहून संदर्भ पाहण्याचे प्रमाण कमी होऊ लागले आहे. आता पुस्तकेही ऑनलाइन उपलब्ध होऊ लागली आहेत. टॅब्लेट , स्मार्टफोनसारख्या गॅजेट्समुळे हा बदल होऊ लागला आहे. ऑनलाइन पुस्तक वाचणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. पूर्वी बऱ्याच लोकांना फोन नंबर पाठ होतो. काही वेळा , फोन डायरीचा वापर होत असे ; पण ही संख्या कमी होती. डिजिटल क्रांतीमुळे मोबाइलच्या वाढलेल्या वापराने किती लोक फोन नंबर लक्षात ठेवतात , हा प्रश्नच आहे. 

गुगल कंपनीने डिजिटल डेटा उपलब्ध करून देण्यात , तर क्रांतीच निर्माण केली आहे. अर्थात , सर्व संदर्भ गुगल या कंपनीने गोळा केले नसले , तरी ते एका क्लिकवर इंटरनेटवर माहिती शोधणाऱ्या यूजरला कसे उपलब्ध होऊ शकतील , याची काळजी मात्र नक्कीच घेतली आहे. ही माहिती फक्त काही देश , विषय यांच्या पुरती मर्यादित ठेवलेली नाही. सर्व माहितीची लिंक सर्चच्या आधारे मिळविता येते. संबंधित यूजरने अपेक्षित सर्चचा शब्द योग्य टाइप केलेला नसला , तरी त्याचा संदर्भ घेऊन सर्च रिझल्ट गुगल कंपनीचे सर्च इंजिन दाखविते. आता तर , टाइप करतानाचा संबंधित शब्दाशी निगडित सजेशनही त्यावर येतात. त्यामुळे त्यातून योग्य पर्याय निवडता येतो. या सर्व गोष्टी एका क्लिकच्या आधारे उपलब्ध झाल्याने नव्या पिढीला संदर्भ शोधण्यासाठी किती कष्ट , वेळ द्यावा लागतो , याची कल्पना करता येणार नाही. मात्र , या स्रोतावर अवलंबून राहण्यानेच ऐनवेळेला फजिती होऊ शकते. शनिवारी सकाळी पाच मिनिटे गुगल कंपनीतर्फे दिल्या जाणाऱ्या विविध सेवा म्हणजे जीमेल , ड्राइव्ह , मॅप आणि चॅट बंद झाल्या होत्या. 

या पाच मिनिटांत इंटरनेटवरील वापरावर ४० टक्के परिणाम झाला. यावरील अॅक्टिव्हिटी ४० टक्क्यांनी कमी झाली. गुगल कंपनीच्या सेवांवर जागतिक पातळीवरील इंटरनेट यूजर किती अवलंबून आहेत , हे कळू शकते. याहू आणि मायक्रोसॉफ्ट बिंग या कंपन्याही विविध सेवा देतात. मात्र , गुगल सेवा काही मिनिटे बंद राहिल्यावर झालेला परिणाम मोठा असल्याचा हवाला एका कंपनीने दिला आहे. यावरून गुगल ही इंटरनेटवरील दादा कंपनी असल्याचे स्पष्ट होत आहे ; तसेच लोकांचा यावरील अवलंबित्व किती मोठे आहे , हेही स्पष्ट होत आहे.

ADVERTISEMENT
Tags: GoogleInternet
ShareTweetSend
Previous Post

‘FB’ ऐकत नाही, म्हणून झुकेरबर्गचंच अकाउण्ट हॅक

Next Post

पुणे-मुंबई टॅक्सीचे कॉल सेंटर

Sooraj Bagal

Sooraj Bagal

Related Posts

Google Workspace New App Icons

गूगलच्या वर्कस्पेस अ‍ॅप्समध्ये नवीन आयकॉन्स

May 29, 2026
Google Year In Search 2025

गूगल इयर इन सर्च : भारतीयांनी २०२५ मध्ये गूगलवर ‘काय’ शोधलं?

December 6, 2025
Jio Google Gemini Offer

जियोतर्फे Gemini AI Pro १८ महिने मोफत : आता सर्व 5G ग्राहकांसाठी उपलब्ध!

November 8, 2025
Google AI Hub in India

गूगल भारतात उभारणार मोठे AI हब : १.२५ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक !

October 15, 2025
Next Post

पुणे-मुंबई टॅक्सीचे कॉल सेंटर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ADVERTISEMENT
ॲपलने मॅकबुक, आयपॅडच्या आणि इतर प्रॉडक्टच्या किंमती वाढवल्या

ॲपलने मॅकबुक, आयपॅडच्या आणि इतर प्रॉडक्टच्या किंमती वाढवल्या

June 25, 2026
WhatsApp CEO Kunal Shah

CRED चे संस्थापक कुणाल शहा आता WhatsApp चे सीईओ!

June 25, 2026
Google Workspace New App Icons

गूगलच्या वर्कस्पेस अ‍ॅप्समध्ये नवीन आयकॉन्स

May 29, 2026
Freepik Is Now Magnific

Freepik कंपनीचं नवं नाव आता Magnific : स्टॉक फोटोज् व AI टूल्ससाठी प्रसिद्ध

April 29, 2026
MSRTC Timing Check Marathi

एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

September 25, 2012
यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

November 4, 2016
मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

September 10, 2012
ADVERTISEMENT
MarathiTech - मराठीटेक

तंत्रज्ञानाविषयी मराठी भाषेतली प्रसिद्ध वेबसाइट! नवं तंत्रज्ञान, नवनवे फोन्स, ॲप्स यांच्याबद्दल रंजक माहिती...

मराठीटेकला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा

ॲपलने मॅकबुक, आयपॅडच्या आणि इतर प्रॉडक्टच्या किंमती वाढवल्या

ॲपलने मॅकबुक, आयपॅडच्या आणि इतर प्रॉडक्टच्या किंमती वाढवल्या

June 25, 2026
WhatsApp CEO Kunal Shah

CRED चे संस्थापक कुणाल शहा आता WhatsApp चे सीईओ!

June 25, 2026

ॲपलने मॅकबुक, आयपॅडच्या आणि इतर प्रॉडक्टच्या किंमती वाढवल्या

CRED चे संस्थापक कुणाल शहा आता WhatsApp चे सीईओ!

गूगलच्या वर्कस्पेस अ‍ॅप्समध्ये नवीन आयकॉन्स

Freepik कंपनीचं नवं नाव आता Magnific : स्टॉक फोटोज् व AI टूल्ससाठी प्रसिद्ध

ॲपलचे नवे सीईओ जॉन टर्नस : टिम कुक यांच्यानंतर घेणार जबाबदारी!

  • About
  • Advertise
  • Privacy Policy
  • Contact

© MarathiTech 2024 A Product by BagalTech

error: Content is protected!
No Result
View All Result
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • खास लेख
  • गेमिंग
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • शॉपिंग ऑफर्स
  • आमच्याबद्दल About Us
  • संपर्क – प्रतिक्रिया

© MarathiTech 2024 A Product by BagalTech