MarathiTech - मराठीटेक
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
MarathiTech - मराठीटेक
No Result
View All Result
Home इंटरनेट

गुगल स्ट्रीटला भारतीय पर्याय : wonobo.com

Sooraj Bagal by Sooraj Bagal
October 22, 2013
in इंटरनेट
google-India.jpgआपण अनेकदा गुगल मॅपवरून आपले घर किंवा आपले गाव शोधतो. या सेवेत आकाशातून आपण आपल्या घराकडे पाहत असतो. पण हाच अनुभव आपण आपल्या गल्लीमधून फिरतो आहे, असा वाटला तर…? गुगल स्ट्रीट सर्व्हिसने ही सेवा जगात अनेक ठिकाणी उपलब्ध करून दिली. पण भारतात गुगलला ही परवानगी मिळाली नाही. पण गुगलला जे शक्य झाले नाही ते भारतातील एका कंपनीने करून दाखवले आहे. 

सोल आणि साजिद मलिक या दोन सख्ख्या भावांनी १९९५ साली स्थापन केलेल्या जेनेसिस इंटरनॅशनल या कंपनीने गुगलला उत्तर देण्यासाठी वोनोबो हा नवीन सर्च तयार केला आहे. यात भारतातील ५४ शहरांचे ३६० अंशामध्ये फोटो काढून त्यापासून इंटरनेटवर सारे शहर उभे केले आहे. नुकतेच मलिक बंधूनी आपल्या या अनोख्या प्रोजेक्टचे वोनोबो या नावाने औपचारिक घोषणा करून wonobo.com या नावाने साइट सुरू केली आहे. सध्यातरी साइटवरील नकाशे लोड होण्यास वेळ लागत असला, तरी एक दोन दिवसांत साइटचा वेग सामान्य होईल, असा त्यांचा दावा आहे. 

जेनेसिस कंपनी पूर्वीपासूनच सरकारला नकाशे बनवण्यात मदत करीत होती. त्याचा फायदा कंपनीला झाला. या प्रकल्पात स्ट्रीट व्ह्यू फोटोग्राफीची मर्यादा, संरक्षण खाते, भारतीय अहवाल खात्यांसारख्या कार्यालयांनी अनेक नियम आखून दिले होते. त्याचा या प्रकल्पात अडथळा आला, तरी सर्व नियम पाळत कटाक्षाने काही ठिकाणांचे फोटो काढले नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. जेनेसिसने यापूर्वी नॅव्हस्टेक, नोकिया, बिंगसारख्या मोठ्या ब्रॅण्डबरोबरच दुबई, मक्का आणि मदीनाचे नकाशे तयार करण्याचे काम केले आहे. 

कशी असेल ही सेवा 

पहिल्या पातळीवर एकूण १२ शहरांचे नकाशे उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. यात मुंबई, पुणे, दिल्ली, बेंगळुरु, चेन्नई, हैदराबाद, अहमदाबाद, सुरत, जयपूर, कोस्टल गोवा, कोलकाता आणि आग्रा या शहरांच्या नकाशांचा समावेश आहे. तसेच पुढील काही आठवड्यात इतर ४२ शहरांचा नकाशा साइटवर पाहता येणार आहे. 
या साइटवर डाव्या बाजूला शहराचा नकाशा असेल, तर उजव्या बाजूला शहराचा स्ट्रीट व्ह्यू असेल. तुम्ही नकाशावरील कोणत्याही ठिकाणी क्लिक केल्यास तुम्हाला उजव्या बाजूला त्या परिसराचा स्ट्रीट व्ह्यू दिसू शकणार आहे. तुम्ही माऊसच्या सहाय्याने या रस्त्यांवर व्हर्च्युअल व्हिजनच्या माध्यमातून फिरू शकता. सर्च बॉक्सचा ऑप्शनही या साइटवर राहणार असला, तरी या नकाशांमध्ये एक कोटी प्रसिद्ध ठिकाणे बाय डिफॉल्ट टॅग करण्यात आली आहेत. यात चार कोटी बिझनेसशी संबंधित ठिकाणे आहेत. 

नकाशातील सर्व फोटो हे सहा महिन्यापेक्षा जास्त जुने नसतील याची काळजी कंपनीमार्फत घेतली जाणार आहे. तुम्ही या साइटवर एखाद्याची संपूर्ण स्टोरीलाइन गाइड तयार करू शकता. उदा. तुम्ही सचिन तेंडूलकर गाइड तयार करत असाल, तर तुम्ही अगदी सचिनचा जन्म झाला त्या नर्सिंग होमपासून ते त्याच्या सध्याच्या घरापर्यंत सर्व काही त्या गाइडमध्ये टॅग करू शकता. वोनोबोने हाय रिझोल्यूशन फोटोंचा वापर करून नकाशे तयार केले असले, तरी भारतातील इंटरनेटचा स्पीड पाहता त्यांनी लो रेझोल्यूशन फोटो साइटवर उपलब्ध करू दिले आहेत. कंपनी लवकरच मोबाइल अॅपही लाँच करणार आहे. भारतीय पर्यटन विभागाबरोबर वोनोबो काम करीत असून, भारतातील प्रेक्षणीय स्थळे, पर्यटकांसाठी कोणती ठिकाणे पाहण्यासारखी आहेत, यावर काम करीत आहे. लवकर त्या शहरांचाही या नकाशात समावेश करण्यात येणार आहेत.
incoming search terms : Google street view alternative for India wonobo.com 

ADVERTISEMENT
Tags: GoogleGoogle StreetInnovationMapsWonobo
ShareTweetSend
Previous Post

अ‍ॅपलकडून दिवाळीची भेट, आयफोनचे नवे मॉडेल्‍स भारतात 1 नोव्‍हेंबरला होणार लॉंच

Next Post

मोबाइल ‘ओएस’वॉर मायक्रोसॉफ्ट विंडोज फोन ८ अपडेट

Sooraj Bagal

Sooraj Bagal

Related Posts

ॲपल मॅप्स आता भारतात खास नव्या सोयींसह!

ॲपल मॅप्स आता भारतात खास नव्या सोयींसह!

November 18, 2026
Google Workspace New App Icons

गूगलच्या वर्कस्पेस अ‍ॅप्समध्ये नवीन आयकॉन्स

May 29, 2026
Google Year In Search 2025

गूगल इयर इन सर्च : भारतीयांनी २०२५ मध्ये गूगलवर ‘काय’ शोधलं?

December 6, 2025
Jio Google Gemini Offer

जियोतर्फे Gemini AI Pro १८ महिने मोफत : आता सर्व 5G ग्राहकांसाठी उपलब्ध!

November 8, 2025
Next Post
मोबाइल ‘ओएस’वॉर  मायक्रोसॉफ्ट विंडोज फोन ८  अपडेट

मोबाइल ‘ओएस’वॉर मायक्रोसॉफ्ट विंडोज फोन ८ अपडेट

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ADVERTISEMENT
ॲपल मॅप्स आता भारतात खास नव्या सोयींसह!

ॲपल मॅप्स आता भारतात खास नव्या सोयींसह!

November 18, 2026
अंतराळयान Voyager 1 पृथ्वीपासून चक्क एक प्रकाश दिवस दूर  पोहोचलं!

अंतराळयान Voyager 1 पृथ्वीपासून चक्क एक प्रकाश दिवस दूर पोहोचलं!

November 18, 2026
Apple MacBook Pro Touch Screen Display

ॲपलचा नवीन मॅकबुक प्रो सादर : प्रथमच टचस्क्रीन डिस्प्लेसह!

October 29, 2026
टेस्लाची Roadster कार चक्क कोलांटी उडी मारून काही सेकंद उडू शकते!

टेस्लाची Roadster कार चक्क कोलांटी उडी मारून काही सेकंद उडू शकते!

October 16, 2026
MSRTC Timing Check Marathi

एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

September 25, 2012
यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

November 4, 2016
Apple MacBook Pro Touch Screen Display

ॲपलचा नवीन मॅकबुक प्रो सादर : प्रथमच टचस्क्रीन डिस्प्लेसह!

October 29, 2026
ADVERTISEMENT
MarathiTech - मराठीटेक

तंत्रज्ञानाविषयी मराठी भाषेतली प्रसिद्ध वेबसाइट! नवं तंत्रज्ञान, नवनवे फोन्स, ॲप्स यांच्याबद्दल रंजक माहिती...

मराठीटेकला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा

ॲपल मॅप्स आता भारतात खास नव्या सोयींसह!

ॲपल मॅप्स आता भारतात खास नव्या सोयींसह!

November 18, 2026
अंतराळयान Voyager 1 पृथ्वीपासून चक्क एक प्रकाश दिवस दूर  पोहोचलं!

अंतराळयान Voyager 1 पृथ्वीपासून चक्क एक प्रकाश दिवस दूर पोहोचलं!

November 18, 2026

ॲपल मॅप्स आता भारतात खास नव्या सोयींसह!

अंतराळयान Voyager 1 पृथ्वीपासून चक्क एक प्रकाश दिवस दूर पोहोचलं!

ॲपलचा नवीन मॅकबुक प्रो सादर : प्रथमच टचस्क्रीन डिस्प्लेसह!

टेस्लाची Roadster कार चक्क कोलांटी उडी मारून काही सेकंद उडू शकते!

iPhone Duo : ॲपलचा पहिला Foldable आयफोन 18 Pro सोबत सादर!

  • About
  • Advertise
  • Privacy Policy
  • Contact

© MarathiTech 2024 A Product by BagalTech

error: Content is protected!
No Result
View All Result
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • खास लेख
  • गेमिंग
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • शॉपिंग ऑफर्स
  • आमच्याबद्दल About Us
  • संपर्क – प्रतिक्रिया

© MarathiTech 2024 A Product by BagalTech