MarathiTech - मराठीटेक
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
MarathiTech - मराठीटेक
No Result
View All Result
Home टॅब्लेट्स

अ‍ॅपलची’हवा’ई क्रांती : अ‍ॅपल आयपॅड एअर

Sooraj Bagal by Sooraj Bagal
November 12, 2013
in टॅब्लेट्स
अ‍ॅपलचा आयपॅड कितीही गुणाचा असला तरी गेल्या दोन-तीन वर्षांत आलेल्या त्याच्या नव्या व्हर्जन्समध्ये फार काही बदल पाहायला मिळाला नाही. प्रत्येक वेळी अधिक स्पष्ट डिस्प्ले, किंचित वेगवान प्रोसेसर आणि किंचित कमी वजन या पलीकडे फार काही ग्राहकांच्या हाती आलं नाही. पण मंगळवारी अ‍ॅपलनं आयपॅड एअर या आयपॅडच्या पाचव्या आवृत्तीच्या रूपाने ग्राहकांची ही तक्रार दूर करण्याचा प्रयत्न केला आहे. आधीच्या आयपॅडच्या तुलनेत बराच हलका, २० टक्के अधिक पातळ, अधिक बारीक कडा असलेला हा अधिक वेगवान टॅब्लेट अ‍ॅपिलच्या अनुषंगाने क्रांतीच आहे.
सुट्टय़ांचा हंगाम डोळय़ांसमोर ठेवून अ‍ॅपिलने अमेरिकेतील सॅनफ्रॅन्सिस्कोमध्ये आयपॅडची पाचवी आवृत्ती लाँच केली. वजन एक पाऊंड (४६९ग्रॅम) आणि जाडी ७.५ मिमी असलेला ‘आयपॅड एअर’ म्हणजे अ‍ॅँपलच्या पोतडीतून निघालेली नवी कमाल गोष्ट आहे. हा जगातील सर्वात हलका आणि पातळ टॅब्लेट असल्याचा दावा अ‍ॅगपलने केला आहे. अर्थात असं म्हणता येणार नाही, कारण सोनीचा झ्पेरीया झेड या टॅब्लेटची जाडी फक्त ६.५ मिमी आहे. पण अ‍ॅपलच्या आधीच्या टॅब्लेटच्या तुलनेत हा निष्टिद्धा (१५५)तच हलका, पातळ आणि वेगवान आहे. ४९९ डॉलर किमतीचा हा आयपॅड एअर येत्या एक नोव्हेंबरपासून अमेरिका आणि चीनच्या बाजारात उपलब्ध होईल. भारतात येण्यासाठी या टॅब्लेटला अद्याप काही वेळ लागेल, असे जाणकारांचे म्हणणे आहे.
तरीही रस्ता कठीण  : आतापर्यंत आलेल्या परीक्षणांतून आयपॅड एअर हे अ‍ॅपलसाठी यशस्वी उत्पादन ठरेल, असे मानले जात आहे. मात्र तरीही आयपॅड एअरला आकर्षक आणि अद्यावत टॅब्लेटच्या स्पध्रेला तोंड द्यावे लागणार आहे. गेल्याच आठवडय़ात नोकियाने नोकिया लुमिया २५२० (वैशिष्टय़े चौकटीत पाहा) हा आपला पहिलावहिला टॅब्लेट बाजारात आणला. नोकियाच्या स्मार्टफोन श्रेणीतील हँडसेटप्रमाणे आकर्षक आणि मजबूत बांधणीचा हा टॅब्लेट खूप यशस्वी होईल, अशी अटकळ बांधली जात आहे. याशिवाय अ‍ॅमेझॉनचा किंडल एचडीएक्स हादेखील आयपॅडच्या शर्यतीत आहे. याशिवाय सॅमसंग, एलजी आणि आसूस या कंपन्यांच्या टॅब्लेटसना बाजारातून मिळणारी पसंतीही आयपॅडसाठी आव्हान आहे. अर्थात अ‍ॅपिलचे लक्ष्य उच्चतम श्रेणीतील बाजारात आपले वर्चस्व अबाधित ठेवणे हेच असल्याने त्या ठिकाणी आयपॅड एअरला टक्कर देणारे टॅब्लेट्स फारच कमी आहे.  
डिस्प्ले :१५३६  ७   २०४८  पिक्सेल्स (९.७ इंच)   मेमरी :एक जीबी रॅम,     , 
इंटर्नल स्टोअरेज : १६/३२ /६४/ १२८   जीबीमध्ये उपलब्ध    
कॅमेरा : बॅक ५ मेगा पिक्सेल्स, फ्रंट १.२ मेगा पिक्सेल    
चिपसेट : अ‍ॅपल ए७   प्रोसेसर: डय़ुअर कोअर १.३  गिगा हट्र्झ. 
रंग :राखाडी व चंदेरी  रंग : निळा, लाल, पांढरा, काळा
आयपॅडच्या माध्यमातून टॅब्लेटच्या बाजारात सत्ता गाजवणाऱ्या अ‍ॅगपलने गेल्याच वर्षी आयपॅड मिनी लाँच केला होता. आयपॅडची किंमत न परवडणाऱ्या आणि टॅब्लेट हाताळताना होणारी दमछाक दूर करण्यासाठी बाजारात येऊ लागलेल्या मिनी टॅब्लेटच्या बाजारात प्रवेश करणे, हा त्या मागील अ‍ॅगपलचा हेतू होता. मात्र, गेल्या वर्षी लाँच झालेल्या आयपॅड मिनीची किंमत (३२९ डॉलर) बाजारातील अन्य कंपन्यांच्या मिनी टॅब्लेटच्या तुलनेत खूपच जास्त होती. त्यामुळे ग्राहकांनी त्याकडे फार लक्ष दिले नाही. याच पाश्र्वभूमीवर अ‍ॅगपलने मंगळवारी आयपॅड मिनीची दुसरी आवृत्ती लाँच केली. आयपॅड मिनी २ चे सर्वात मोठे वैशिष्टय़ म्हणजे त्याचा रेटिना डिस्प्ले आहे. रेटिना डिस्प्लेमुळे या टॅब्लेटवरून अतिशय दर्जेदार आणि स्पष्ट दृश्यांचा अनुभव घेता येतो. याशिवाय आधीच्या आयपॅड मिनीच्या तुलनेत नव्या ‘मिनी’ रेझोल्युशन दुप्पट (२०४८ ७ १५३६ ) आहे. याशिवाय यामध्येही आयपॅड एअरप्रमाणेच ६४ बिटचा ए७ हा अधिक वेगवान प्रोसेसर आहे. यामध्ये १६जीबीपासून १२८ जीबीपर्यंतच्या इंटर्नल स्टोअरेज असलेले प्रकार उपलब्ध आहेत. मात्र, आधीच्या आयपॅड मिनीप्रमाणेच ‘मिनी २’ची किंमतही ३९९ डॉलर इतकी आहे. त्यामुळे याला कितपत प्रतिसाद मिळतो, हे पाहावे लागेल.

Loksatta
ADVERTISEMENT
Tags: AppleiPadTablets
ShareTweetSend
Previous Post

वेगवान अँड्रॉइडसाठी खास टिप्स

Next Post

सोशल साइट्सची नवी फाइट : ट्विटर लिंक्डइन यु ट्यूब इन्स्टाग्राम, पिन्ट्रेस्ट व्हॉट्सअॅप, बीबीएम, लाईन, वी-चॅट

Sooraj Bagal

Sooraj Bagal

Related Posts

नवा व्हिडिओ : ॲपल मॅकवर मराठीत टायपिंग!

नवा व्हिडिओ : ॲपल मॅकवर मराठीत टायपिंग!

March 20, 2023
वनप्लस 11, 11R फोन्स, OnePlus Pad, किबोर्ड, टीव्ही, इ. सादर!

वनप्लस 11, 11R फोन्स, OnePlus Pad, किबोर्ड, टीव्ही, इ. सादर!

February 7, 2023
Macbook Pro Mac Mini M2 Pro

ॲपलचे नवे मॅकबुक प्रो, मॅक मिनी उपलब्ध! आता M2 Pro & Max सह!

January 24, 2023
iPhone Marathi Typing

आयफोनवर मराठी टायपिंग करणं आता सोपं झालंय!

November 10, 2022
Next Post

सोशल साइट्सची नवी फाइट : ट्विटर लिंक्डइन यु ट्यूब इन्स्टाग्राम, पिन्ट्रेस्ट व्हॉट्सअॅप, बीबीएम, लाईन, वी-चॅट

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ADVERTISEMENT
नवा व्हिडिओ : ॲपल मॅकवर मराठीत टायपिंग!

नवा व्हिडिओ : ॲपल मॅकवर मराठीत टायपिंग!

March 20, 2023
जियो व एयरटेलतर्फे ग्राहकांना अमर्यादित मोफत 5G डेटा!

जियो व एयरटेलतर्फे ग्राहकांना अमर्यादित मोफत 5G डेटा!

March 18, 2023
सॅमसंगचे Galaxy A34 5G आणि A54 5G भारतात सादर!

सॅमसंगचे Galaxy A34 5G आणि A54 5G भारतात सादर!

March 17, 2023
टी सिरीजच्या हनुमान चालीसा व्हिडिओला तब्बल ३०० कोटी व्ह्यूज!

टी सिरीजच्या हनुमान चालीसा व्हिडिओला तब्बल ३०० कोटी व्ह्यूज!

March 10, 2023
एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

September 25, 2012
मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

September 10, 2012
यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

November 4, 2016
ADVERTISEMENT
MarathiTech – मराठीटेक

तंत्रज्ञानाविषयी मराठी भाषेतली प्रसिद्ध वेबसाइट! नवं तंत्रज्ञान, नवनवे फोन्स, ॲप्स यांच्याबद्दल रंजक माहिती...

मराठीटेकला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा

नवा व्हिडिओ : ॲपल मॅकवर मराठीत टायपिंग!

नवा व्हिडिओ : ॲपल मॅकवर मराठीत टायपिंग!

March 20, 2023
जियो व एयरटेलतर्फे ग्राहकांना अमर्यादित मोफत 5G डेटा!

जियो व एयरटेलतर्फे ग्राहकांना अमर्यादित मोफत 5G डेटा!

March 18, 2023

नवा व्हिडिओ : ॲपल मॅकवर मराठीत टायपिंग!

जियो व एयरटेलतर्फे ग्राहकांना अमर्यादित मोफत 5G डेटा!

सॅमसंगचे Galaxy A34 5G आणि A54 5G भारतात सादर!

टी सिरीजच्या हनुमान चालीसा व्हिडिओला तब्बल ३०० कोटी व्ह्यूज!

नोकियाचा कंपनीचा नवा लोगो

  • About
  • Advertise
  • Privacy Policy
  • Contact

© MarathiTech 2022 A Product by BagalTech

No Result
View All Result
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • खास लेख
  • गेमिंग
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • शॉपिंग ऑफर्स
  • आमच्याबद्दल About Us
  • संपर्क – प्रतिक्रिया

© MarathiTech 2022 A Product by BagalTech

error: Content is protected!