MarathiTech - मराठीटेक
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
MarathiTech - मराठीटेक
No Result
View All Result
Home Social Media

सोशल नेटवर्कींगवर सेल्फीचा ट्रेण्ड

Sooraj Bagal by Sooraj Bagal
December 12, 2013
in Social Media, स्मार्टफोन्स
सध्या ऑनलाइन विश्वात धुमाकूळ घालणारा शब्द म्हणजे ‘सेल्फी’. आता सेल्फी हे नेमकं काय आहे असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. आपणच आपला फोटो काढून तो सोशल मीडियावर अपलोड करणं म्हणजे सेल्फी… 

फोटो काढून घेण्याची हौस कुणाला नसते? फोटो काढायचा आणि तो सगळ्यांना कौतुकाने दाखवायचा हे सगळेचजण करतात. पण तरीही त्यात आता जरा वेगळाच ट्रेंड बघायला मिळतोय. फ्रंट कॅमेऱ्याने किंवा वेब कॅमेऱ्याने आपलाच फोटो काढायचा आणि तो सोशल मीडियावर टाकायचा हा ट्रेंड आता जोरात आहे. त्याला ‘सेल्फी’ असं म्हटलं जातंय. स्वतःच स्वतःचे फोटो काढून ते सोशल मीडीयावर टाकण्याचं हे फॅड यंगिस्तानमध्ये सध्या दिसून येत आहे. २०१३ मध्ये ‘सेल्फी’ हा शब्द सगळ्यात जास्त वेळा वापरला असल्याचं समजतं. या शब्दाने नुकतंच ऑक्सफर्ड इंग्लिश डिक्शनरीतही स्थान मिळवलं आहे. 

सेल्फीच्या या ट्रेंडला कुणी आत्मकेंद्रीतपणा म्हणतो. तर कुणाला हा तद्दन मूर्खपणा वाटतो. पण तरीही अनेकांना ते आवडतंय हे खरं. काही लोक तर याकडे स्ट्रेसबस्टर म्हणूनही बघतात. म्हणूनच आपले फोटो काढून ते सोशल नेटवर्किंग साइट्सवर टाकले जात आहेत. 

तरुण-तरुणींच्या हातात स्मार्टफोन नाही असं होऊच शकत नाही. पण हल्ली त्या स्मार्टफोनला फ्रंट फेसिंग कॅमेरा असणं अत्यावश्यक झालं आहे हे विशेष. कॉलेजिअन्समध्ये हा ट्रेंड सर्वधिक पॉप्युलर आहे. एकसे बढकर एक पोझ देऊन फोटो काढले जातात आणि ते टाकले जातात. तसं करणाऱ्या हौशी मंडळींना ड्रामा किंग आणि क्वीन्स म्हणून ओळखलं जातं. 

हा ट्रेंड फक्त कॉलेजिअन्समध्ये नाही. याला मोठमोठे सेलिब्रिटीही अपवाद नाहीत. सध्या फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, स्नॅपचॅट, माय स्पेस यासारख्या तमाम सोशल मीडियाच्या माध्यमावर सगळेच आपापले फोटोज टाकू लागले आहेत. तरुणाईच नाही तर अगदी हॉलिवूड-बॉलिवूडही सेल्फीच्या या ट्रेंडसारखे फोटो टाकतायत. त्यांच्या फॅन्सना यातून नवनवे फोटो अपडेट बघायला मिळतात. तसंच फॅन्सही त्यांच्या लाडक्या सेलिब्रिटीसोबत फोटो काढायचा असेल तर हा फंडा हमखास वापरताना जातो. किम कार्डशिअन रिहाना, जस्टीन बिबर, बेयॉन्स, ब्रॅडली कूपर, निकी मिनाज ही काही हॉलिवूडमधली नावं आहेत ज्यांना ‘सेल्फी’ची सवय झाली आहे. 

बॉलिवूडचे टॉप स्टार्सही सतत स्वतःचे फोटो काढून यात टाकत असतात. अगदी फॅशनिस्टा सोनम कपूरपासून ते डॅडीज लिटील गर्ल प्रियांका ते अगदी किंग ऑफ रोमान्स शाहरुख खानपर्यंत सगळ्यांच्या मानगुटीवरव या सेल्फिजचं भूत आहे. या स्टार्सना सेल्फ-कॅमेरा मोड ऑन करून शूटिंग, प्रमोशन, प्रवासात कुठेही पोज देऊन फोटो काढायला आवडतं. सगळ्यांनाच या ग्लॅम शॉट्सनी वेड लावल्याचं चित्र दिसून येतंय.
ADVERTISEMENT
Tags: PhotographySmartphonesSocial Media
ShareTweetSend
Previous Post

चकटफू फोटोग्राफी अॅप्स

Next Post

हॅशटॅग वापरण्यासाठी खास टिप्स

Sooraj Bagal

Sooraj Bagal

Related Posts

Apple iPhone 16e

ॲपलचा iPhone 16e सादर : नवा स्वस्त (!) फोन

February 20, 2025
सॅमसंगचे Galaxy S25, S25+ आणि S25 Ultra सादर!

सॅमसंगचे Galaxy S25, S25+ आणि S25 Ultra सादर!

January 23, 2025
Apple iPhone 16 Series

ॲपलचे iPhone 16, 16 Pro, Watch Series 10, AirPods 4 सादर!

September 10, 2024
Ronaldo YouTube Channel

फुटबॉलपटू रोनाल्डोचं यूट्यूब चॅनल : २४ तासात तब्बल २ कोटी सबस्क्रायबर्स!

August 22, 2024
Next Post

हॅशटॅग वापरण्यासाठी खास टिप्स

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ADVERTISEMENT
WWDC 2025 Marathi

ॲपल WWDC25 : iOS 26, macOS 26 व Liquid Glass डिझाईन जाहीर!

June 10, 2025
गूगल I/O 2025: एआय आणि गूगलच्या सेवांमधील स्मार्ट तंत्रज्ञान

गूगल I/O 2025: एआय आणि गूगलच्या सेवांमधील स्मार्ट तंत्रज्ञान

May 29, 2025
WhatsApp for iPad

व्हॉट्सॲप आता ॲपल आयपॅडवरसुद्धा उपलब्ध!

May 28, 2025
Instagran Edits App

इंस्टाग्रामचं नवं Edits ॲप : फोनवरच व्हिडिओ एडिट करा!

April 23, 2025
MSRTC Timing Check Marathi

एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

September 25, 2012
यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

November 4, 2016
WWDC 2025 Marathi

ॲपल WWDC25 : iOS 26, macOS 26 व Liquid Glass डिझाईन जाहीर!

June 10, 2025
ADVERTISEMENT
MarathiTech - मराठीटेक

तंत्रज्ञानाविषयी मराठी भाषेतली प्रसिद्ध वेबसाइट! नवं तंत्रज्ञान, नवनवे फोन्स, ॲप्स यांच्याबद्दल रंजक माहिती...

मराठीटेकला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा

WWDC 2025 Marathi

ॲपल WWDC25 : iOS 26, macOS 26 व Liquid Glass डिझाईन जाहीर!

June 10, 2025
गूगल I/O 2025: एआय आणि गूगलच्या सेवांमधील स्मार्ट तंत्रज्ञान

गूगल I/O 2025: एआय आणि गूगलच्या सेवांमधील स्मार्ट तंत्रज्ञान

May 29, 2025

ॲपल WWDC25 : iOS 26, macOS 26 व Liquid Glass डिझाईन जाहीर!

गूगल I/O 2025: एआय आणि गूगलच्या सेवांमधील स्मार्ट तंत्रज्ञान

व्हॉट्सॲप आता ॲपल आयपॅडवरसुद्धा उपलब्ध!

इंस्टाग्रामचं नवं Edits ॲप : फोनवरच व्हिडिओ एडिट करा!

OpenAI चं 4o इमेज जनरेशन : सोशल मीडियावर Ghibli आर्टची लोकप्रियता

  • About
  • Advertise
  • Privacy Policy
  • Contact

© MarathiTech 2024 A Product by BagalTech

error: Content is protected!
No Result
View All Result
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • खास लेख
  • गेमिंग
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • शॉपिंग ऑफर्स
  • आमच्याबद्दल About Us
  • संपर्क – प्रतिक्रिया

© MarathiTech 2024 A Product by BagalTech