MarathiTech - मराठीटेक
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
MarathiTech - मराठीटेक
No Result
View All Result
Home Social Media

विना इंटरनेट वापरा ट्विटर

Sooraj Bagal by Sooraj Bagal
December 17, 2013
in Social Media, इंटरनेट
twitter.jpgसोशल नेटवर्किंगच्या दुनियेत ‘ फेसबुक ‘ खालोखाल लोकप्रिय असणाऱ्या ‘ ट्विटर ‘ ची जादू लवकरच ‘ डेटा कनेक्शन ‘ विना अनुभवणे सहज शक्य होणार आहे. त्यामुळे ‘ एंट्री लेव्हल ‘ सेगमेंटमधील मोबाइलवरही ‘ट्विटर ‘ च्या ‘ टेक्स्ट मेसेजिंग ‘ सेवेचा आनंद घेता येणार आहे. सर्वसामान्य मोबाइल ग्राहकांनाही ही सेवा उपलब्ध व्हावी, यासाठी ‘ ट्विटर ‘ ने सिंगापूरस्थित ‘ यूटोपिया मोबाइल ‘ नामक स्टार्टअप कंपनीसमवेत करार केला आहे. 

‘ यूटोपिया मोबाइल ‘ ने यापूर्वी ‘ फेसबुक ‘ शीही अशाच प्रकारचा करार केला होता. ‘ यूटोपिया ‘ चे सहसंस्थापक आणि सीईओ सुमेश मेनन यांनी दिलेल्या माहितीनुसार ‘ट्विटर ‘ ची ही सेवा पुढील वर्षीच्या पहिल्या तिमाहीत सुरू होईल. साध्या मोबाइलवर एक कोड नंबर डायल करून यूजरना या सेवेचा लाभ घेता येईल. सध्या जगभरातील १.१० कोटी यूजर ‘ यूटोपिया ‘ च्या ‘फोनट्विश सेवे ‘ च्या माध्यमातून ‘ डेटा कनेक्शन ‘शिवाय ‘ फेसबुक ‘ आणि ‘ गुगल टॉक ‘ सेवेचा आनंद घेत आहेत, असेही मेनन यांनी नमूद केले. 

‘ अनस्ट्रक्चर्ड सप्लिमेंटरी सर्व्हिस डेटा ‘ अर्थात ‘ यूएसएसडी ‘ नामक टेलिकॉम प्रोटोकॉलच्या माध्यमातून ‘यूटोपिया ‘ तर्फे ही सेवा सामान्य मोबाइलमधारकांना प्रदान करण्यात येणार आहे. ‘ यूएसएसडी ‘ चा अंतर्भावर असणाऱ्या साध्या मोबाइलधारकांना ‘ ट्विटर ‘ चा वापर करता येईल. पण, त्यांना होमपेजवरील छायाचित्रे, व्हिडिओ आणि अन्य प्रकारची ग्राफिक्स पाहता येणार नसल्याचेही मेनन म्हणाले. 

विकसनशील राष्ट्रांमधील प्रत्येकी दहा मोबाइलधारकांमध्ये ८ मोबाइलधारक पॉकेट डेटा वापरत नाहीत. त्यामुळे अशा मोबाइलधारकांना विना इंटरनेट सोशल नेटवर्किंगचा आनंद घेता येण्यासाठी ‘ यूटोपिया ‘ प्रयत्नशील असल्याचेही मेनन म्हणाले. जगभरात सोशल नेटवर्किंगच्या संपर्कात राहणाऱ्यांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे. विशेषतः ​विकसनशील राष्ट्रांमध्ये हे प्रमाण अधिक आहे. या राष्ट्रांमधील तरुणवर्ग डोळ्यासमोर ठेवून अशाप्रकारच्या सुविधा देण्याकडे कंपनीचा कल असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. आशिया, आफ्रिका आणि दक्षिण अमेरिका आदी खंडांमधील तरुणाईचा सोशल नेटवर्किंगकडे कल अधिक असल्याचेही ते म्हणाले.  

ADVERTISEMENT
Tags: OfflineSMSTwitterUSSD
ShareTweetSend
Previous Post

व्यक्त होताना भान असावं

Next Post

व्हॉट्सअॅपची भरारी

Sooraj Bagal

Sooraj Bagal

Related Posts

Community Notes India

X (ट्विटर) वरील Community Notes आता भारतात उपलब्ध!

April 4, 2024
ट्विटरचा आजपासून निळ्या चिमणीऐवजी नवा 𝕏 लोगो!

ट्विटरचा आजपासून निळ्या चिमणीऐवजी नवा 𝕏 लोगो!

July 24, 2023
ट्विटर ब्ल्यु भारतात उपलब्ध होण्यास सुरुवात!

ट्विटर ब्ल्यु भारतात उपलब्ध होण्यास सुरुवात!

February 9, 2023
ट्विटर हॅक : बराक ओबामा, बिल गेट्ससारख्या प्रसिद्ध व्यक्तींची अकाऊंट्स हॅक!

२० कोटी ट्विटर यूजर्सचा डेटा हॅक : डेटा हॅकर्सकडून प्रकाशित!

January 6, 2023
Next Post
व्हॉट्सअॅपची भरारी

व्हॉट्सअॅपची भरारी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ADVERTISEMENT
iPhone Duo

iPhone Duo : ॲपलचा पहिला Foldable आयफोन 18 Pro सोबत सादर!

September 10, 2026
GTA VI चा Extended Look २६ मिनिटांचा गेमप्ले व्हिडिओ आता उपलब्ध!

GTA VI चा Extended Look २६ मिनिटांचा गेमप्ले व्हिडिओ आता उपलब्ध!

August 28, 2026
सॅमसंग Galaxy Z Fold8 Ultra, Fold8, Flip8, Watch Ultra2, Watch9 सादर

सॅमसंग Galaxy Z Fold8 Ultra, Fold8, Flip8, Watch Ultra2, Watch9 सादर

July 24, 2026
Skyroot Vikram 1

Skyroot च्या Vikram-1 या भारताच्या पहिल्या खासगी ऑर्बिटल रॉकेटचे यशस्वी प्रक्षेपण!

July 24, 2026
MSRTC Timing Check Marathi

एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

September 25, 2012
यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

November 4, 2016
GTA VI चा Extended Look २६ मिनिटांचा गेमप्ले व्हिडिओ आता उपलब्ध!

GTA VI चा Extended Look २६ मिनिटांचा गेमप्ले व्हिडिओ आता उपलब्ध!

August 28, 2026
ADVERTISEMENT
MarathiTech - मराठीटेक

तंत्रज्ञानाविषयी मराठी भाषेतली प्रसिद्ध वेबसाइट! नवं तंत्रज्ञान, नवनवे फोन्स, ॲप्स यांच्याबद्दल रंजक माहिती...

मराठीटेकला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा

iPhone Duo

iPhone Duo : ॲपलचा पहिला Foldable आयफोन 18 Pro सोबत सादर!

September 10, 2026
GTA VI चा Extended Look २६ मिनिटांचा गेमप्ले व्हिडिओ आता उपलब्ध!

GTA VI चा Extended Look २६ मिनिटांचा गेमप्ले व्हिडिओ आता उपलब्ध!

August 28, 2026

iPhone Duo : ॲपलचा पहिला Foldable आयफोन 18 Pro सोबत सादर!

GTA VI चा Extended Look २६ मिनिटांचा गेमप्ले व्हिडिओ आता उपलब्ध!

सॅमसंग Galaxy Z Fold8 Ultra, Fold8, Flip8, Watch Ultra2, Watch9 सादर

Skyroot च्या Vikram-1 या भारताच्या पहिल्या खासगी ऑर्बिटल रॉकेटचे यशस्वी प्रक्षेपण!

ॲपलने मॅकबुक, आयपॅडच्या आणि इतर प्रॉडक्टच्या किंमती वाढवल्या

  • About
  • Advertise
  • Privacy Policy
  • Contact

© MarathiTech 2024 A Product by BagalTech

error: Content is protected!
No Result
View All Result
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • खास लेख
  • गेमिंग
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • शॉपिंग ऑफर्स
  • आमच्याबद्दल About Us
  • संपर्क – प्रतिक्रिया

© MarathiTech 2024 A Product by BagalTech