MarathiTech - मराठीटेक
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
MarathiTech - मराठीटेक
No Result
View All Result
Home Social Media

व्यक्त होताना भान असावं

Sooraj Bagal by Sooraj Bagal
December 16, 2013
in Social Media, इंटरनेट
socialपाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर तरुण बोलते झाले. बोलते झाले म्हणजे सोशल नेटवर्किंग साइटवर त्यांनी हव्या तशा प्रतिमा तयार करून राजकारण्यांची खिल्ली उडवली. हे कितपत योग्य आहे?

पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांचे निकाल नुकतेच लागलेत. त्यानंतर विविध पक्षांच्या राजकारण्यांवर, नेत्यांवर टीका करणाऱ्या, विडंबन करणाऱ्या पोस्ट सोशल मीडीयावर दणादण पडू लागल्या. पराभूत झालेल्या नेत्यांसोबतच जिंकलेल्या नेत्यांचीही वाटेल तशी प्रतिमा यातून रंगविली गेली. त्या नेत्यांचं वय, त्यांचं पद याचं कसलंही भान न ठेवता त्यांची उडवलेली खिल्ली आजच्या तरुणांची मानसिकता दाखवत होती. कोणत्याही राजकारण्यावर हवी तशी आणि हवी तेव्हा टीका करण्याचा आपल्याला अधिकार आहे, असा या पिढीचा समज तर नाही ना झालेला?

आजचे तरुण हेच देशाचं उद्याचं नशीब घडवणारे असतात. त्यामुळे त्यांनी जागरुक राहून, आपल्या सभोवतालच्या घडामोडींची दखल घेणं, त्यावर आपलं मत व्यक्त करणं केव्हाही चांगलंच; पण हे करत असताना खालच्या पातळीवर जाऊन एखाद्यावर टीका करणं, कितपत योग्य आहे? देशात महत्त्वाच्या पदावर असलेल्या व्यक्तीचे चेहरे तंत्रज्ञानाच्या आधारे कसेही वापरून त्यांची मानहानी करणं नक्कीच ठीक नाही. आपण टीका करत असलेली व्यक्ती कोणाची तरी आई, वडील किंवा आजोबा आहेत, याचं भान ठेवलेलंच दिसत नाही. राजकारण्यांचे चुकत असेलही, नव्हे चुकतेच; पण त्यांच्याशी असणारे वैचारिक किंवा तात्त्विक मतभेद योग्य प्रकारे मांडणं अधिक संयुक्तिक आहे. याविषयी आजच्या पिढीला काय वाटतं, ते जाणून घेऊ या.

चांगल्या भाषेत व्यक्त व्हा

कुणाचेही फोटो घेऊन त्यावर वाट्टेल तसे विनोद करणं किंवा फोटो एडिट करून कुणाची मानहानी करणं मला अजिबात आवडत नाही. असं करण्यापेक्षा पुढं येऊन स्वतः काहीतरी करून दाखवायला पाहिजे. आपण स्वतः काहीतरी करून दाखवल्यासच दुसऱ्यांना बोलण्याचा आपल्याला अधिकार असतो. राजकारणी कसेही असले, तरी त्या व्यक्तीचं समाजात नाव आहे. त्यांचेही काही प्रॉब्लेम असू शकतात, ते आपण समजून घेतले पाहिजेत. त्यामुळेच कोणाचीही मानहानी करणं चुकीचंच आहे. आपल्याला जे वाटतं, ते आपण चांगल्या भाषेतही सांगू शकतोच की.
– वैष्णवी कानिटकर

ही मर्दानगी नाही

कुणावरही टीका करताना जपूनच करायला हवी. मला वाटतं, विचारांचा लढा हा विचारांनीच लढायला हवा. आपण लोकशाही व्यवस्थेत जगतो आहोत, तर वैयक्तिक द्वेषातून सोशल नेटवर्किंगवर नेते मंडळींची फाल्तू पोस्टर तयार करण्यात आपण काही मर्दानगी गाजवतो आहोत असं अजिबात नाही. त्यापेक्षा मतपेटीतून तुमचं मत व्यक्त व्हायला हवं.
– राजेश केंद्रे

भान ठेवावं

आपण विनोद करतो आणि ते शेअर करतो इथंवर ठीक आहे; पण वैयक्तिक फोटो एडिट करून एखाद्याची चेष्टा करणं मला गैर वाटतं. आपल्या फोटोशी कुणी असं केलं, तर आपल्याला वाईट वाटेल. मग समोरची व्यक्ती ही ‘पब्लिक फीगर’ आहे म्हणून त्यांच्याविषयी असे मेसेज पसरवणं गैर आहे. मला वाटतं, तुमच्या मानसिकता प्रगल्भ असेल, तर असले उद्योग तुम्ही करणार नाही.
– प्रिया सरवणकर

विनोदात गैर काय

उठसूट कुणाबाबतही आपण असे जोक वा फोटो शेअर करत नाही. ते व्यक्त होण्याचं माध्यम आहे. अशा लोकांबाबतचा राग त्या विडंबनातून व्यक्त होतो. या लोकांनी काहीतरी विचित्र स्टेटमेंट केलेली चालतात, लोकांना गृहित धरलेलं चालतं, लोकशाहीची चेष्टा केलेली चालते, मग त्यांचं विडंबन झालं, तर त्यात काहीच गैर नाही.
– प्रमोद सोनावणे

तरुणांसाठी ‘रोल मॉडेल’चं नाही

आजच्या तरुणांना कोणत्याही क्षेत्रात ‘रोल मॉडेल’ उरलेलाच नाही. आपलं घर, शिक्षणक्षेत्र, राजकारण… सगळीकडेच त्यांना नीतीमूल्यं हरवलेली दिसतात. त्यांचा हा राग, असंतोष मग अशा प्रकारे व्यक्त केला जातो. त्यातच राजकारणी हे ‘सॉफ्ट टार्गेट’ बनले आहेत. त्यामुळे तरुणांच्या हातात कायम हजर असलेल्या सोशल मीडियाद्वारे त्यांच्यावर कशीही टीका केली जाते. हे चुकीचं असेलही; पण आजची पिढी कुणाचाच आदर राखताना दिसत नाही. मग नेत्यांचा तरी आदर ठेवण्याची अपेक्षा त्यांच्याकडून कशी ठेवायची? मुलांमधील ऊर्जेला योग्य दिशा दिल्यास त्यांच्याकडून काही सकारात्मक कार्य नक्की घडेल.
– अश्विनी लाटकर, समुपदेशक

ADVERTISEMENT
Tags: MannersNetworkingOnlineSocial Media
ShareTweetSend
Previous Post

हॅशटॅग वापरण्यासाठी खास टिप्स

Next Post

विना इंटरनेट वापरा ट्विटर

Sooraj Bagal

Sooraj Bagal

Related Posts

ट्विटर ब्ल्यु भारतात उपलब्ध होण्यास सुरुवात!

ट्विटर ब्ल्यु भारतात उपलब्ध होण्यास सुरुवात!

February 9, 2023
ट्विटर हॅक : बराक ओबामा, बिल गेट्ससारख्या प्रसिद्ध व्यक्तींची अकाऊंट्स हॅक!

२० कोटी ट्विटर यूजर्सचा डेटा हॅक : डेटा हॅकर्सकडून प्रकाशित!

January 6, 2023
MrBeast Most Subscribed

MrBeast आता सर्वाधिक सबस्क्रायबर्स असलेला यूट्यूबर : PewDiePie ला मागे टाकलं!

November 16, 2022
यूट्यूब आता नव्या रूपात उपलब्ध : डिझाईनमध्ये बरेच बदल!

यूट्यूब आता नव्या रूपात उपलब्ध : डिझाईनमध्ये बरेच बदल!

November 5, 2022
Next Post
विना इंटरनेट वापरा ट्विटर

विना इंटरनेट वापरा ट्विटर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ADVERTISEMENT
अडोबीची फोटोशॉपमध्ये नवी सोय : Generative Fill

अडोबीची फोटोशॉपमध्ये नवी सोय : Generative Fill

May 29, 2023
PlayStation Showcase

प्लेस्टेशन शोकेस : स्पायडरमॅन २ सह अनेक नव्या गेम्स जाहीर!

May 26, 2023
Moto Edge 40

मोटोरोलाचा Edge 40 भारतात सादर : 144Hz pOLED डिस्प्ले!

May 25, 2023
WhatsApp Edit Message

व्हॉट्सॲपवर आता पाठवलेला मेसेज एडिट करता येणार!

May 25, 2023
एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

September 25, 2012
WhatsApp Chat Lock

आता व्हॉट्सॲपवर ठराविक चॅट लॉक करता येणार!

May 16, 2023
मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

September 10, 2012
ADVERTISEMENT
MarathiTech – मराठीटेक

तंत्रज्ञानाविषयी मराठी भाषेतली प्रसिद्ध वेबसाइट! नवं तंत्रज्ञान, नवनवे फोन्स, ॲप्स यांच्याबद्दल रंजक माहिती...

मराठीटेकला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा

अडोबीची फोटोशॉपमध्ये नवी सोय : Generative Fill

अडोबीची फोटोशॉपमध्ये नवी सोय : Generative Fill

May 29, 2023
PlayStation Showcase

प्लेस्टेशन शोकेस : स्पायडरमॅन २ सह अनेक नव्या गेम्स जाहीर!

May 26, 2023

अडोबीची फोटोशॉपमध्ये नवी सोय : Generative Fill

प्लेस्टेशन शोकेस : स्पायडरमॅन २ सह अनेक नव्या गेम्स जाहीर!

मोटोरोलाचा Edge 40 भारतात सादर : 144Hz pOLED डिस्प्ले!

व्हॉट्सॲपवर आता पाठवलेला मेसेज एडिट करता येणार!

लावा या भारतीय कंपनीचा AGNI 2 5G स्मार्टफोन सादर!

  • About
  • Advertise
  • Privacy Policy
  • Contact

© MarathiTech 2022 A Product by BagalTech

No Result
View All Result
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • खास लेख
  • गेमिंग
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • शॉपिंग ऑफर्स
  • आमच्याबद्दल About Us
  • संपर्क – प्रतिक्रिया

© MarathiTech 2022 A Product by BagalTech

error: Content is protected!