वेबसाइट : www.gosf.in
गूगल इंडियाने यावेळी असेही जाहीर केलय की हयावर्षी ‘exclusive launch corner’ नावाच्या फीचरला रिलीज केल जाईल.याचाच एक भाग म्हणून गूगलने आज chromecast नावाचं स्ट्रीमिंग डिवाइस भारतात सादर केलय. अनेक ऑनलाइन शॉपिंग कंपनीनी pre party नावाने आधीच या मेळयाची डील्स उपलब्ध करून द्यायला सुरवात केली होती. ज्यामध्ये यूजर्सना 14 मिनिटांची फ्री शॉपिंग करण्याची संधी मिळणार होती. एशियन पेंट, जेट एयरवेज, किंडल, मायक्रोमॅक्स, एचपी, बिग बाजार, कूव, लॅक्मे आणि लेनेवो यांनी या पार्टीसाठी होस्टिंग केल होतं.
यावेळी आणखी एक आकर्षण म्हणजे “Rs. 299 Corner” ज्या प्रकारात जास्त डिस्काउंट सोबतच फ्री शिपिंगसुद्धा मिळेल. यात फिलिप्स, उबर, जेबीएल, बेनेटन, एवरप्यूअर अशा कंपनीचा सहभाग आहे. स्वस्त भावामुळे या कोर्नरवर नक्कीच गर्दी जमेल.
यावर्षीच्या इवेंटसाठी गूगलने आदित्य बिर्ला ग्रुपला प्रिफर्ड पार्टनर बनवलं आहे. हा उत्सव 2012 पासून सुरू झाला असून पाश्चात्य देशांतील ब्लॅक फ्रायडे सारख्या डिल्सचा आनंद भारतीय यूजर्सना मिळावा या उद्देशाने या उपक्रमाची सुरवात झाली आहे. गेल्या वर्षीसुद्धा ग्राहकांचा भरपूर प्रतिसाद लाभत तब्बल 2 मिलियन यूजर्सने या वेबसाइटला भेट दिली. प्रसिद्ध ऑनलाइन शॉपिंग कंपन्या जसे की SnapDeal, Myntra, eBay, amazon, askme, goibibo, ShopClues, बँका, शेअर कंपन्या, रीयल इस्टेट, ट्रॅवल अशा सर्वांनी यात सहभाग घेतलाय. फ्लिपकार्टने मात्र यावेळी सहभागी न होता स्वतःचा Big App Shopping Days नावाचा प्रोग्राम सुरू केला असून तो 8 ते 12 डिसेंबर सुरू राहील.
या उत्सवात इलेक्ट्रॉनिक्स, मेन विमेन लाइफस्टाईल, बेबी केयर, पुस्तकं, घर & किचन, खाद्यपदार्थ, गिफ्ट्स & फ्लॉवर्स, मोबाइल Apps, फायनॅन्स, नोकर्या, प्रवास, आरोग्य, स्पोर्ट्स, टेलीकॉम सर्विस, शिक्षण, लग्नासंबंधी , गेम्स अशा प्रत्येक गोष्टीवर डील आणि डिस्काउंट या तीन दिवसांत मिळतील.
तेव्हा तयार व्हा शॉपिंगसाठी .
हा लेख शेअर करा आणि अधिकाधिक लोकांना या उत्सवाचा आनंद द्या.
आम्हीही आमच्या फेसबूक पेजवर काही खास डिल्स जाहीर करू
www.facebook.com/marathitechblog










