MarathiTech - मराठीटेक
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
MarathiTech - मराठीटेक
No Result
View All Result
Home ऑपरेटिंग सिस्टिम्स Android

Redmi 4A फोन सादर, सॅमसंग पे भारतात, अँड्रॉइड ओ !

Sooraj Bagal by Sooraj Bagal
March 22, 2017
in Android, स्मार्टफोन्स
Xiaomi Note 4A

शायोमीने त्यांच्या Note 4 च्या यशानंतर नवा स्वस्त स्मार्टफोन सादर केला आहे. या Redmi 4A या स्मार्टफोनला एचडी डिस्प्ले असून तब्बल 2GB रॅम, 13MP कॅमेरा अशा सुविधा असून याची किंमत केवळ रु ५९९९ इतकीच आहे! हा फोन उद्या २३ मार्च २०१७ दुपारी १२ वाजता शायोमीच्या साईटवर उपलब्ध होईल.
लिंक Buy Redmi 4A

Xiaomi Redmi 4A फीचर्स :
डिस्प्ले : 5 इंच 720×1280 pixels HD
प्रॉसेसर : 1.4GHz Qualcomm Snapdragon 425
रॅम : 2GB, स्टोरेज : 16GB + microSD स्लॉट
कॅमेरा : 13MP व 5MP फ्रंट
बॅटरी : 3120mAh
ओएस : अँड्रॉइड मार्शमेलो 6.0 MIUI8  
इतर : 4G VoLTE, Wi-Fi 802.11 b/g/n, Bluetooth v4.1.
सेन्सर्स : Accelerometer, ambient light, gyroscope, infrared, and proximity
किंमत : रु ५९९९

ADVERTISEMENT
Samsung Pay

सॅमसंग पे सेवा आता भारतात उपलब्ध!
Samsung Pay मध्ये तुमच्या सॅमसंग फोन द्वारे तुम्ही खरेदी/व्यवहार  करू शकता ज्यामुळे तुम्हाला तुमचे डेबिट/क्रेडिट कार्डसुद्धा जवळ बाळगणे गरजेचं नाही!
ठराविक सॅमसंग गॅलक्सी फोन्समध्ये तुमचं डेबिट/क्रेडिट कार्ड साठवल जाईल मग व्यवहारावेळी कार्ड स्वाईप करण्याऐवजी सॅमसंग फोन त्या मशीन जवळ (Magnetic/NFC POS) धरताच व्यवहार पूर्ण होतो ! हे व्यवहार तुमच्या फिंगरप्रिंटने सुरक्षित असून तुमच्या बोटाच्या ठशाशिवाय फोनमध्ये व्यवहार पुढे जाणार नाही!
(फोनच्या फिंगरप्रिंट स्कॅनरचा वापर करूनच व्यवहार पार पडतील).

सध्या सॅमसंग पे द्वारे HDFC बँक, ICICI Bank, Citi, Axis, Standard Chartered, SBI कार्डस या बँका व MasterCard, VISA, American Express हे कार्डस सपोर्ट करतील! पेटीएम वॉलेटसुद्धा यामध्ये उपलब्ध आहे. लवकरच UPI द्वारे व्यवहार करता येतील.  येत्या काळात अॅपल पे, गूगल वॉलेटसुद्धा भारतात उपलब्ध होईल!
Samsung Pay Supported Devices : Galaxy Note5, Galaxy S7, Galaxy S7 edge, Galaxy S6 edge+, Galaxy A7 (2017), Galaxy A5 (2017), Galaxy A7 (2016), Galaxy A5 (2016)
यासाठी हा यूट्यूब व्हिडीओ पहा : Introduction to Samsung Pay

Android O

अँड्रॉइडचं पुढचं व्हर्जन “अँड्रॉइड ओ” 
अँड्रॉइड ओचा प्रीव्यू गूगलने आज नेक्सस व पिक्सल फोनसाठी सादर केला आहे!
या नव्या अँड्रॉइड अपडेटमध्ये Picture in Picture नवी सुविधा असेल ज्यामुळे एखादे अॅप सुरु असताना त्यावरच दुसरे अॅप वापरता येईल!
सोबतच बॅटरी विषयी अधिक पर्याय, नोटिफिकेशन पर्याय उपलब्ध होतील. या व्हर्जनचं अधिकृत नाव अद्याप जाहीर करण्यात आलेलं नाही. अँड्रॉइड व्हर्जनची नावे पदार्थांवरून ठेवलेली असतात जसे की जेली बिन, किटकॅट, लॉलीपॉप, मार्शमेलो, नुगट ! खरेतर अद्याप सध्याचं अँड्रॉइड नुगट ७.१ सुद्धा खूपच थोड्या फोन्सवर उपलब्ध झालेलं आहे. तेव्हढ्यात नव्या व्हर्जनच्या प्रीव्यू इमेजेस गूगलने प्रसिद्ध केल्या आहेत.
हे अँड्रॉइड व्हर्जन अधिकृतरित्या सादर होताच मराठीटेकवर याविषयी लेख प्रसिद्ध केला जाईल.

अॅपलचा Special Edition RED iPhone 7 !
अॅपलने आयपॅड 9.7 सोबतच काही काळापुरता उपलब्ध असणारा लाल रंगाचा आयफोन 7 व 7 प्लस सादर केला आहे याबद्दल अधिक माहितीसाठी Special Edition RED iPhone
या फोनमधून मिळणारं उत्पन्न कॅन्सरग्रस्तांना मदत करणाऱ्या RED या संस्थेला दिलं जाणार आहे!

अॅपलने सादर केला आहे नवा आयपॅड !
“आयपॅड 9.7” हा अॅपलचा नवा टॅब्लेट असून यामध्ये सुधारित A9 चिपचा समावेश आहे . याची किंमत 329$ असून हा iOS 10 वर काम करतो!
आयपॅड 9.7 फीचर्स :
डिस्प्ले 9.7 Inch Retina Display 2048×1536 resolution
प्रोसेसर A9 Chip 64bit
ऑपरेटिंग सिस्टिम iOS 10
TouchID Fingerprint Scanner
कॅमेरा 8MP व 1.2MP Camera
बॅटरी 10 Hour Battery Life
WiFi Up to 866 Mbps Wi-Fi
LTE Up to 150 Mbps
अधिक माहिती : iPad 9.7

Tags: AppleiPadiPhoneSamsungSamsung PaySmartphonesTabletsXiaomi
ShareTweetSend
Previous Post

मोबाइल वर्ल्ड कॉंग्रेस २०१७ कार्यक्रमाबद्दल : नोकियाचे नवे फोन सादर!

Next Post

फ्लिपकार्टने इबे इंडियाला घेतलं विकत : उभारलं 1.4 बिलियन डॉलर्स भांडवल!

Sooraj Bagal

Sooraj Bagal

Related Posts

नवा व्हिडिओ : ॲपल मॅकवर मराठीत टायपिंग!

नवा व्हिडिओ : ॲपल मॅकवर मराठीत टायपिंग!

March 20, 2023
वनप्लस 11, 11R फोन्स, OnePlus Pad, किबोर्ड, टीव्ही, इ. सादर!

वनप्लस 11, 11R फोन्स, OnePlus Pad, किबोर्ड, टीव्ही, इ. सादर!

February 7, 2023
Samsung Galaxy S23

सॅमसंगचे Galaxy S23, S23+ आणि S23 Ultra सादर!

February 1, 2023
Macbook Pro Mac Mini M2 Pro

ॲपलचे नवे मॅकबुक प्रो, मॅक मिनी उपलब्ध! आता M2 Pro & Max सह!

January 24, 2023
Next Post
फ्लिपकार्टने इबे इंडियाला घेतलं विकत : उभारलं 1.4 बिलियन डॉलर्स भांडवल!

फ्लिपकार्टने इबे इंडियाला घेतलं विकत : उभारलं 1.4 बिलियन डॉलर्स भांडवल!

Comments 2

  1. Buy Contact Lenses says:
    6 years ago

    Very informative, keep posting such good articles, it really helps to know about things.

    Reply
  2. GST Registration Delhi says:
    6 years ago

    Interesting. Your instructions look clear but I'm not very good at this so I hope this will work well for me. Thanks for the tips!

    Reply

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ADVERTISEMENT
नवा व्हिडिओ : ॲपल मॅकवर मराठीत टायपिंग!

नवा व्हिडिओ : ॲपल मॅकवर मराठीत टायपिंग!

March 20, 2023
जियो व एयरटेलतर्फे ग्राहकांना अमर्यादित मोफत 5G डेटा!

जियो व एयरटेलतर्फे ग्राहकांना अमर्यादित मोफत 5G डेटा!

March 18, 2023
सॅमसंगचे Galaxy A34 5G आणि A54 5G भारतात सादर!

सॅमसंगचे Galaxy A34 5G आणि A54 5G भारतात सादर!

March 17, 2023
टी सिरीजच्या हनुमान चालीसा व्हिडिओला तब्बल ३०० कोटी व्ह्यूज!

टी सिरीजच्या हनुमान चालीसा व्हिडिओला तब्बल ३०० कोटी व्ह्यूज!

March 10, 2023
एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

September 25, 2012
मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

September 10, 2012
यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

November 4, 2016
ADVERTISEMENT
MarathiTech – मराठीटेक

तंत्रज्ञानाविषयी मराठी भाषेतली प्रसिद्ध वेबसाइट! नवं तंत्रज्ञान, नवनवे फोन्स, ॲप्स यांच्याबद्दल रंजक माहिती...

मराठीटेकला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा

नवा व्हिडिओ : ॲपल मॅकवर मराठीत टायपिंग!

नवा व्हिडिओ : ॲपल मॅकवर मराठीत टायपिंग!

March 20, 2023
जियो व एयरटेलतर्फे ग्राहकांना अमर्यादित मोफत 5G डेटा!

जियो व एयरटेलतर्फे ग्राहकांना अमर्यादित मोफत 5G डेटा!

March 18, 2023

नवा व्हिडिओ : ॲपल मॅकवर मराठीत टायपिंग!

जियो व एयरटेलतर्फे ग्राहकांना अमर्यादित मोफत 5G डेटा!

सॅमसंगचे Galaxy A34 5G आणि A54 5G भारतात सादर!

टी सिरीजच्या हनुमान चालीसा व्हिडिओला तब्बल ३०० कोटी व्ह्यूज!

नोकियाचा कंपनीचा नवा लोगो

  • About
  • Advertise
  • Privacy Policy
  • Contact

© MarathiTech 2022 A Product by BagalTech

No Result
View All Result
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • खास लेख
  • गेमिंग
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • शॉपिंग ऑफर्स
  • आमच्याबद्दल About Us
  • संपर्क – प्रतिक्रिया

© MarathiTech 2022 A Product by BagalTech

error: Content is protected!