अँड्रॉइड ९ पाय : Android Pie अँड्रॉइडचं नवं व्हर्जन

गूगलच्या सर्वात प्रसिद्ध स्मार्टफोन ऑपरेटिंग सिस्टिम अँड्रॉइडची नवी आवृत्ती अँड्रॉइड ९ पाय : Android Pie 9 सादर करण्यात आलं आहे. गूगल नेहमी अँड्रॉइडच्या व्हर्जन्सची नावं अनुक्रमे डेझर्ट्सवरून ठेवत असतं उदा. कपकेक, डोनट, फ्रोयो(2.0), जिंजरब्रेड(2.3), हनीकोंब (3.0), आईसक्रीम सँडविच(4.0), जेली बीन(4.1), किटकॅट(4.4), लॉलीपॉप(5.0), मार्शमेलो(6.0), नुगट(7.0), ओरीओ(8.0) आणि आता नववं व्हर्जन पाय…! पाय (Pie) हा एक पेस्ट्रीमध्ये फळे/भाज्या यांच मिश्रण करून बनवलेला पदार्थ आहे!

अँड्रॉइड पाय आता पूर्ण डेव्हलप झालं असून गूगलच्या पिक्सल फोन्सवर उपलब्ध झालं आहे! गूगलचे सर्व ओएस अपडेट प्रथम त्यांच्याच नेक्सस फोन्स वर मिळायचे आता ते पिक्सलवर मिळतात.

अँड्रॉइड पाय सुद्धा एक बऱ्यापैकी मोठं अपडेट आहे. डिझाईन मध्ये काही बदल, नवा नोटिफिकेशन पॅनल, रिसेंट्ससाठी नवी स्क्रिन, नवे पर्याय सोबत इतरही अनेक बदल उपलब्ध करून देण्यात आले आहेत! नॉच म्हणजे नव्या पूर्ण डिस्प्लेने व्यापणाऱ्या फोन्ससाठी अँड्रॉइडतर्फे सपोर्ट देण्यात येणार असून AI म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून अडाप्टिव्ह बॅटरी सिस्टिम मिळेल, ऑटो ब्राईटनेससाठी नवा अल्गोरिदम आणि CPU बॅकग्राऊंड प्रोसेस यांसाठी नवे सुधारित पर्याय आले आहेत!

 अँड्रॉइड ९ पाय मध्ये नवं काय? : What’s New in Android 9 Pie? : 

Adaptive Battery : एका चार्जवर आता फोन अधिक काळ चालेल! तुमच्या वापरानुसार हे तंत्र स्वतः शिकून सुधारणा करेल आणि पर्यायाने आपल्या फोनची बॅटरी लाईफ वाढेल! 
Slices : आपल्या आवडत्या अॅपचा काही भाग आपण सर्च करताच आपल्या समोर येईल!
Intuitive Navigation : आता बटणांऐवजी स्वाईप करण्याच्या कृतीने अॅप्स उघडता येतील!
Dashboard : आपण कोणत्या अॅपमध्ये किती वेळ घालवत आहोत हे पाहता येणार!
App Timers : यामुळे आपल्याला अॅप्ससाठी वेळ लावून ठेवता येईल त्यापलीकडे आपल्याला अॅप वापरताना आयकॉन्स करड्या रंगात बदलतील जेणेकरून आपला फोन वापरण्यावर ताबा राहील.    
वरील दोन सोयी Digital Wellbeing For Android  चा भाग असून यामुळे लोकांचं फोनच्या अति वापरावर नियंत्रण राहील!

 Adaptive Brightness : यामुळे फोन स्वतः कधी किती ब्राईटनेस ठेवायची ते स्वतः शिकेल! 

Multi-camera support : आता एकापेक्षा अधिक कॅमेरे एकाच वेळी वापरता येतील! शिवाय आता USB द्वारे बाहेरून कॅमेरा जोडण्याची सोया सुद्धा काही फोन्सना देण्यात येणार आहे!

इतर सोयी : 
A smarter smartphone, with machine learning at the core
App Actions
Text Classifier
Neural Networks API 1.1

Getting the most from your phone — more easily
New System Navigation
Display Cutout
Notifiocation and Smart reply
Text Magnieifier

Security and privacy for users
Biometrik Prompt
Protected Confirmation
Stronger Protection
DNS over TLS
HTTPS by default
Privacy For Users

New experiences in camera, audio, and graphics
Multi Camera API
HDR VP9 Video
Enhanced audio with Dynamics Processing

Connectivity and location
Wi-Fi RTT for indoor positioning
Data cost sensitivity in JobScheduler

Open Mobile API for NFC payments and secure transactions
Performance for apps
ART performance
Optimized for Kotlin
Modern Android

अधिकृत माहिती : Android Pie 9 What’s New

search term : Google Android Operating System Android 9 Pie Update
Exit mobile version