MarathiTech - मराठीटेक
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
MarathiTech - मराठीटेक
No Result
View All Result
Home ॲप्स

पेटीएम मनी सादर : म्युच्युयल फंडामध्ये गुंतवणुकीसाठी पेटीएमचं नवं अॅप

Sooraj Bagal by Sooraj Bagal
September 4, 2018
in ॲप्स

भारतीय पेमेंट कंपनी पेटीएमने नवं अॅप उपलब्ध करून दिलं असून जे नेहमीच्या पेटीएमपासून वेगळं असेल आणि या नव्या पेटीएम मनी अॅपद्वारे म्युच्युयल फंडामध्ये गुंतवणुक करता येईल! ४ सप्टेंबर पासून हे अॅप डाऊनलोडसाठी उपलब्ध झालं आहे. मात्र कंपनीने सुरूवातीला दरदिवशी फक्त २५०० जणांचीच नोंदणी स्वीकारली असून लवकरच ही मर्यादा १०००० प्रतिदिन करण्यात येईल!

या नव्या Paytm Money कंपनीसाठी पेटीएमची मालकी असलेल्या One97 Communications कडून १० मिलियन डॉलर्स गुंतवण्यात आले आहेत. Paytm Money हा One97 Communications चा चौथा ब्रँड असेल.
पेटीएम मनीसाठी ग्राहकांमध्ये मोठी उत्सुकता असून लाँचआधीच ८,५०,००० युजर्सनी यासाठी नोंदणी केली होती! ९६% नोंदणी मोबाईलमार्फत झाल्यामुळे सुरुवातीला केवळ अॅपवरच उपलब्ध असणार आहे.

ADVERTISEMENT

Download Link : Paytm Money on Google Play | Paytm Money for iOS

प्रविण जाधव (पेटीएम मनी प्रमुख) : वापरकर्त्यांना गुंतवणुकीपूर्वी सर्व माहिती, त्यामध्ये घ्यावी लागणारी रिस्क याबद्दल तंत्रज्ञानाच्या साहाय्याने मदत केली जाईल. म्युच्युयल फंड स्कीम्समध्ये वेगाने अपडेट्स पुरवून सर्व आकडेवारी योग्य रित्या ग्राहकांना पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. आमच्या प्लॅटफार्मवर दरदिवशी दहा लाख म्युच्युयल फंड व्यवहार करता येऊ शकतात!

पेटीएम मनीमध्ये गुंतवणूक करण्यासाठी प्रथम अॅप डाऊनलोड करून घ्यावं लागेल. ह्यासाठी कोणतही शुल्क लागणार नाही. ज्याद्वारे आपल्याला २५ हून अधिक AMC (असेट मॅनेजमेंट कंपनी) चा अॅक्सेस मिळेल! मात्र जर तुम्हाला खात्री वाटत नसेल की कोणत्या कंपनीमध्ये गुंतवणूक करावी तर त्यासाठी MorningStar, CRISIL व Value Research यांची मदत पुरवली जाईल. या कंपन्या कामगिरीचा अभ्यास करून योग्य तो सल्ला देतील.

पेटीएम मनीद्वारे अगदी १०० रुपयांपासून गुंतवणूक करता येते!  अधिकृत वेबसाइट

पेटीएम मनीच अॅप अँड्रॉइड व iOS दोन्हीवर उपलब्ध आहे. अॅपमध्ये सध्या प्रवेश मिळवणं अवघड आहे कारण सुरूवातीला प्रतिदिन फक्त २५०० जणांनाच प्रवेश दिला जात आहे मात्र लवकरच अधिक जणांना प्रवेश दिला जाईल. प्रवेश मिळालेल्या व्यक्तींना केवायसी कराव लागेल. तूर्तास पॅन, आधार, बँक अकाऊंट व्हेरिफिकेशन करून घेतलं जाईल. 
पेटीएम मनीचा उद्देश भारतातील म्युच्युयल फंड गुंतवणुकदारांची संख्या येत्या तीन चार वर्षात दुप्पट करणे असा आहे असं सांगण्यात येत आहे.

search terms : what is paytm money marathi information mutual funds

Tags: AppsMutual FundsOne97PaymentsPaytmPaytm Money
Share8TweetSend
Previous Post

भारतीय पोस्टाची इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक सुरू!

Next Post

Honor 7S सादर : स्वस्त फोन्समध्ये नवा पर्याय!

Sooraj Bagal

Sooraj Bagal

Related Posts

Google Play Best Apps & Games of 2025

गूगल प्ले स्टोअरवरील २०२५ चे सर्वोत्तम ॲप्स, गेम्स जाहीर!

November 23, 2025
OpenAI Sora 2

OpenAI ने आणलं Sora 2 आणि AI व्हिडिओसाठी इंस्टाग्रामसारखं अ‍ॅप!

October 1, 2025
WhatsApp for iPad

व्हॉट्सॲप आता ॲपल आयपॅडवरसुद्धा उपलब्ध!

May 28, 2025
Instagran Edits App

इंस्टाग्रामचं नवं Edits ॲप : फोनवरच व्हिडिओ एडिट करा!

April 23, 2025
Next Post
Honor 7S सादर : स्वस्त फोन्समध्ये नवा पर्याय!

Honor 7S सादर : स्वस्त फोन्समध्ये नवा पर्याय!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ADVERTISEMENT
सॅमसंग Galaxy Z Fold8 Ultra, Fold8, Flip8, Watch Ultra2, Watch9 सादर

सॅमसंग Galaxy Z Fold8 Ultra, Fold8, Flip8, Watch Ultra2, Watch9 सादर

July 24, 2026
Skyroot Vikram 1

Skyroot च्या Vikram-1 या भारताच्या पहिल्या खासगी ऑर्बिटल रॉकेटचे यशस्वी प्रक्षेपण!

July 24, 2026
ॲपलने मॅकबुक, आयपॅडच्या आणि इतर प्रॉडक्टच्या किंमती वाढवल्या

ॲपलने मॅकबुक, आयपॅडच्या आणि इतर प्रॉडक्टच्या किंमती वाढवल्या

June 25, 2026
WhatsApp CEO Kunal Shah

CRED चे संस्थापक कुणाल शहा आता WhatsApp चे सीईओ!

June 25, 2026
MSRTC Timing Check Marathi

एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

September 25, 2012
मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

September 10, 2012
सॅमसंग Galaxy Z Fold8 Ultra, Fold8, Flip8, Watch Ultra2, Watch9 सादर

सॅमसंग Galaxy Z Fold8 Ultra, Fold8, Flip8, Watch Ultra2, Watch9 सादर

July 24, 2026
ADVERTISEMENT
MarathiTech - मराठीटेक

तंत्रज्ञानाविषयी मराठी भाषेतली प्रसिद्ध वेबसाइट! नवं तंत्रज्ञान, नवनवे फोन्स, ॲप्स यांच्याबद्दल रंजक माहिती...

मराठीटेकला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा

सॅमसंग Galaxy Z Fold8 Ultra, Fold8, Flip8, Watch Ultra2, Watch9 सादर

सॅमसंग Galaxy Z Fold8 Ultra, Fold8, Flip8, Watch Ultra2, Watch9 सादर

July 24, 2026
Skyroot Vikram 1

Skyroot च्या Vikram-1 या भारताच्या पहिल्या खासगी ऑर्बिटल रॉकेटचे यशस्वी प्रक्षेपण!

July 24, 2026

सॅमसंग Galaxy Z Fold8 Ultra, Fold8, Flip8, Watch Ultra2, Watch9 सादर

Skyroot च्या Vikram-1 या भारताच्या पहिल्या खासगी ऑर्बिटल रॉकेटचे यशस्वी प्रक्षेपण!

ॲपलने मॅकबुक, आयपॅडच्या आणि इतर प्रॉडक्टच्या किंमती वाढवल्या

CRED चे संस्थापक कुणाल शहा आता WhatsApp चे सीईओ!

गूगलच्या वर्कस्पेस अ‍ॅप्समध्ये नवीन आयकॉन्स

  • About
  • Advertise
  • Privacy Policy
  • Contact

© MarathiTech 2024 A Product by BagalTech

error: Content is protected!
No Result
View All Result
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • खास लेख
  • गेमिंग
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • शॉपिंग ऑफर्स
  • आमच्याबद्दल About Us
  • संपर्क – प्रतिक्रिया

© MarathiTech 2024 A Product by BagalTech