शायोमीचा ‘दिवाळी विथ एमआय’ सेल!


काहीच दिवसांपूर्वी अॅमेझॉनने, फ्लिपकार्ट या ऑनलाईन शॉपिंग वेबसाईटचे सेल पार पडले असताना शायोमीने सुद्धा त्यांचा सेल आणला असून आजपासून म्हणजेच २३ ऑक्टोबर ते २५ ऑक्टोबर दरम्यान mi.com हा सेल पार पडेल. ‘दिवाळी विथ एमआय’ म्हणून हा सेल असून शायोमीच्या अनेक प्रॉडक्ट्सवर ऑफर्स, डिस्काउंट ग्राहकांना मिळणार आहेत.

रेडमी नोट ५ प्रो, पोको F1 सारख्या फोन्सवर ग्राहकांना डिस्काउंट तसेच पेटीएमवर कॅशबॅक, अॅमेझॉन पे वरून पेमेंट केल्यास मी ३२ आणि ४३ इंची LED टीव्हीवर ५०० रुपयांची सूट मिळणार आहे. त्यासोबतच SBI क्रेडिट कार्ड ग्राहकांनासुद्धा ७५० पर्यंत इन्स्टंट  डिस्काउंट  मिळेल. Ixigo चे ३५०० पर्यंतचे कूपन सुद्धा स्मार्टफोन खरेदीवर उपलब्ध होणार आहेत.

काही दिवसांपूर्वी सादर करण्यात आलेली शायोमीची स्मार्ट होम उपकरणे या सेल दरम्यान उपलब्ध असतील. यामध्ये Mi Band 3, Mi Home Security Camera 360°, Mi Compact Bluetooth Speaker 2 उपकरणांचा समावेश आहे.

अधिक माहितीसाठी - Diwali with MI Sale

त्याचबरोबर अॅमेझॉनचा ग्रेट इंडियन फेस्टिवल सेल तर  फ्लिपकार्टतर्फे फेस्टिव्ह धमाका डेज सेल चालू होणार असून २४ ऑक्टोबर ते २७ ऑक्टोबर दरम्यान असतील. याबद्दल लवकरच लेख प्रसिद्ध केला जाईल.

शायोमीचा ‘दिवाळी विथ एमआय’ सेल! शायोमीचा ‘दिवाळी विथ एमआय’ सेल! Reviewed by Swapnil Bhoite on October 23, 2018 Rating: 5

No comments:

Powered by Blogger.