MarathiTech - मराठीटेक
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
MarathiTech - मराठीटेक
No Result
View All Result
Home इंटरनेट

डिज्नी प्लस : बहुचर्चित स्ट्रिमिंग सेवा सादर : नोव्हेंबरपासून उपलब्ध!

Sooraj Bagal by Sooraj Bagal
April 12, 2019
in इंटरनेट

डिज्नी (Disney) ने त्यांची बर्‍याच दिवसांपासून चर्चा सुरू असलेली स्ट्रिमिंग सेवा आज जाहीर केली असून ही सेवा १२ नोव्हेंबरपासून अमेरिकेत उपलब्ध होईल! या सेवेचं नाव डिज्नी प्लस असं असणार आहे. या सेवेची किंमत $6.99/महिना (~₹४८५) व $69.99/वर्ष (~₹४९००) अशी असेल. भारतीय बाजारात उपलब्धतता किंवा किंमतीबद्दल माहिती देण्यात आलेली नाही.

डिज्नीच्या केव्हीन मेयर यांनी कंपनीच्या या नव्या उत्पादनाची आज गुंतवणूकदारांना माहिती दिली. यावेळी Disney+ अॅप इंटरफेससुद्धा दाखवण्यात आला आहे. नेटफ्लिक्सप्रमाणेच आडव्या रांगामध्ये आपल्याला चित्रपट, मालिका यांची यादी पाहता येईल. मात्र याचं वेगळेपण म्हणजे वर आपल्याला पाच स्वतंत्र नावे असलेली जागा दिसेल ज्यामध्ये डिज्नीसोबत त्यांच्याच पिक्सार, मार्व्हल, स्टार वॉर्स व नॅशनल जिओग्राफिक यांना स्थान दिलेलं असेल. त्यानुसार ज्या त्या franchise चा चित्रपट/मालिका आपण सहज पाहू शकू…

ADVERTISEMENT

डिज्नी प्लसची सेवा जवळपास सर्वच उपकरणांवर उपलब्ध होत असून स्मार्ट टीव्ही, वेब ब्राऊजर, टॅब्लेट्स, स्मार्टफोन्स, गेम कॉन्सोल्स, क्रोमकास्ट,इ अशा सर्व ठिकाणी आपण डिज्नी प्लस सेवा स्ट्रिम करू शकणार आहोत.

Disney+ च्या सभासदांना प्रोफाइल्स जोडता येणार असून त्यानुसार घरातील सर्वांना स्वतःची वेगळी प्रोफाइल देता येईल व त्यानुसार कंटेंट पाहता येईल. लहान मुलांसाठी पॅरेंटल कंट्रोल्ससुद्धा देण्यात आले आहेत. या सेवेमधील सर्व कंटेंट ऑफलाइन पाहण्यासाठी डाऊनलोड सुद्धा करता येणार आहे. 4K HDR सपोर्टेड टीव्ही असल्यास त्या प्रकारचा कंटेंट सुद्धा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

खास डिज्नी प्लससाठी नव्याने कंटेंट तयार करण्यात येणार असून याबद्दलसुद्धा माहिती देण्यात आलेली आहे. मार्व्हलसोबत फाल्कन, विंटर सोल्जर यांच्यावर आधारित मालिका, सोबत लोकी व हॉकआय यांची लाईव्ह अॅक्शन, मोंस्टर्स. इंक शो, स्टार वॉर्सची मालिका तयार करण्यात येत आहे.

गेले कित्येक महीने अनेक स्ट्रिमिंग सर्व्हिसेस/ टीव्ही चॅनल्सवरून नेहमीचा करार रद्द करण्याचे प्रकार पाहून लवकरच डिज्नी स्वतःची सेवा आणणार हे स्पष्ट होत होतं. त्यांचे स्वतःचे सर्व चित्रपट डिज्नी प्लस वर उपलब्ध होणार आहेतचं शिवाय आता 21st Century Fox च्या अधिग्रहणानंतर त्यांचेही सर्व चित्रपट/मालिका डिज्नीकडे उपलब्ध होतील!

आता नेटफ्लिक्स, अॅमेझॉन प्राइम व्हिडिओ, अॅपल यांना डिज्नीच्या मोठ्या स्पर्धेचा सामना करावा लागेल. मनोरंजन क्षेत्रात या सर्वांपेक्षा डिज्नीकडे साहजिकच फार मोठी ताकद असून अनेकांनी डिज्नी या क्षेत्रात एकाधिकारशाहीसुद्धा निर्माण करू शकेल अशी भीती व्यक्त केली आहे. ज्या वेगाने डिज्नीने इतरांकडून चित्रपट/मालिका खेचून घेतल्या आहेत त्यावरून त्यामध्ये तथ्य सुद्धा असू शकेल. ही सेवा आधीच उपलब्ध सेवांसमोर कशा प्रकारे चालेल हे येणार्‍या काळात कळेलच…

Search Terms : Disney+ streaming service launched to be available from November

Source: Disney Plus Website
Tags: DisneyDisney PlusMarvelPixarStreamingSubscriptions
Share9TweetSend
Previous Post

स्पेसएक्सच्या सर्वात मोठ्या रॉकेटच पुन्हा यशस्वी उड्डाण!

Next Post

टिकटॉकवर भारतात बंदी! : गूगल, अॅपलला अॅप काढून टाकण्याचे आदेश

Sooraj Bagal

Sooraj Bagal

Related Posts

डिज्नी + हॉटस्टार आता जियो हॉटस्टार : JioTele OS चे टीव्ही येणार!

डिज्नी + हॉटस्टार आता जियो हॉटस्टार : JioTele OS चे टीव्ही येणार!

February 20, 2025
Netflix India New Plans

नेटफ्लिक्सचे भारतात नवे स्वस्त प्लॅन्स जाहीर!

December 14, 2021
gamescom 2021

gamescom 2021 कार्यक्रम : Saints Row, Marvel Midnight Suns जाहीर!

August 26, 2021
Amazon Fire TV Live TV

ॲमेझॉन फायर टीव्हीवर आता लाईव्ह टीव्ही चॅनल्स पाहता येणार!

October 9, 2020
Next Post
टिकटॉकवर भारतात बंदी! : गूगल, अॅपलला अॅप काढून टाकण्याचे आदेश

टिकटॉकवर भारतात बंदी! : गूगल, अॅपलला अॅप काढून टाकण्याचे आदेश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ADVERTISEMENT
ChatGPT India Plans Whats Included

ChatGPT चा खास भारतीयांसाठी नवा स्वस्त प्लॅन : ChatGPT Go

August 19, 2025
Perplexity Pro Airtel Offer

एयरटेलच्या सर्व ग्राहकांना Perplexity Pro AI वर्षभर मोफत!

July 18, 2025
Google Gemini AI Pro Free Offer

गूगलची विद्यार्थ्यांसाठी ऑफर : Gemini AI Pro + 2TB स्टोरेज एक वर्ष मोफत!

July 17, 2025
सॅमसंगचे Galaxy Fold7, Flip7 आणि Flip7 FE सादर!

सॅमसंगचे Galaxy Fold7, Flip7 आणि Flip7 FE सादर!

July 10, 2025
MSRTC Timing Check Marathi

एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

September 25, 2012
Windows 10 Marathi Typing

विंडोज १० वर आता मराठी टायपिंगसाठी स्मार्ट फोनेटिक कीबोर्ड!

June 18, 2019
मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

September 10, 2012
ADVERTISEMENT
MarathiTech - मराठीटेक

तंत्रज्ञानाविषयी मराठी भाषेतली प्रसिद्ध वेबसाइट! नवं तंत्रज्ञान, नवनवे फोन्स, ॲप्स यांच्याबद्दल रंजक माहिती...

मराठीटेकला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा

ChatGPT India Plans Whats Included

ChatGPT चा खास भारतीयांसाठी नवा स्वस्त प्लॅन : ChatGPT Go

August 19, 2025
Perplexity Pro Airtel Offer

एयरटेलच्या सर्व ग्राहकांना Perplexity Pro AI वर्षभर मोफत!

July 18, 2025

ChatGPT चा खास भारतीयांसाठी नवा स्वस्त प्लॅन : ChatGPT Go

एयरटेलच्या सर्व ग्राहकांना Perplexity Pro AI वर्षभर मोफत!

गूगलची विद्यार्थ्यांसाठी ऑफर : Gemini AI Pro + 2TB स्टोरेज एक वर्ष मोफत!

सॅमसंगचे Galaxy Fold7, Flip7 आणि Flip7 FE सादर!

मोटोचा Moto g96 भारतात सादर!

  • About
  • Advertise
  • Privacy Policy
  • Contact

© MarathiTech 2024 A Product by BagalTech

error: Content is protected!
No Result
View All Result
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • खास लेख
  • गेमिंग
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • शॉपिंग ऑफर्स
  • आमच्याबद्दल About Us
  • संपर्क – प्रतिक्रिया

© MarathiTech 2024 A Product by BagalTech