MarathiTech - मराठीटेक
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
  • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
  • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
MarathiTech - मराठीटेक
No Result
View All Result
Home स्मार्टफोन्स

सॅमसंग गॅलक्सी नोट १० व नोट १० प्लस सादर : आता अधिक मोठ्या डिस्प्लेसह!

Sooraj Bagal by Sooraj Bagal
August 8, 2019
in स्मार्टफोन्स
Samsung Galaxy Note 10

सॅमसंगच्या आज झालेल्या गॅलक्सी अनपॅक्ड कार्यक्रमात Samsung Galaxy Note 10 व Note 10 Plus हे दोन फोन्स सादर करण्यात आले आहेत. यामध्ये एक ६.३ इंची तर दुसरा ६.८ इंची डिस्प्ले असलेले नोट मालिकेतले नवे फोन्स आहेत. डिस्प्ले व आकार सोडला तर बाकी इतर गोष्टींबाबत या दोन्ही फोन्समध्ये बरंच साम्य आहे. नोट मालिकेमधील फोन्समध्ये आजवर सर्वात मोठा डिस्प्ले या मॉडेल्सद्वारे सॅमसंगने उपलब्ध करून दिला आहे.

Galaxy Note 10 मध्ये 2280×1080 pixels 401ppi डिस्प्ले असून Galaxy Note 10+ मध्ये 3040×1440 pixels 498ppi असलेला डिस्प्ले आहे. दोन्ही डिस्प्ले Dynamic AMOLED असून HDR10+ सपोर्ट आहे. Galaxy Note 10 साठी फक्त 8GB रॅम आणि 256GB स्टोरेज असा एकाच पर्याय असेल. (Note 10 मध्ये microSD कार्ड स्लॉट नाही, काही ठिकाणी 5G सोबत 12GB पर्याय उपलब्ध). Galaxy Note 10+ मध्ये microSD कार्ड सपोर्ट असून याच्यात 1TB पर्यंत स्टोरेज असलेलं कार्ड वापरता येईल. याच्यात 12GB रॅम आणि 256GB व 512GB असे दोन स्टोरेज पर्याय मिळतील. दक्षिण कोरियामध्ये 5G आवृत्ती आधी उपलब्ध होईल.

ADVERTISEMENT

दोन्ही फोन Auro Glow, Aura White व Aura Black या रंगात उपलब्ध असतील. Galaxy Note 10 मध्ये Red व Pink आणि Note 10+ साठी Blue पर्याय सुद्धा आहे. Note 10 मध्ये 3500mAh आणि Note 10+ मध्ये 4300mAh बॅटरी आहे.

Samsung Galaxy Note 10+ मधील काही खास गोष्टी

  • जवळपास पूर्ण स्क्रीन व्यापणारा Infinity-O डिस्प्ले
  • सेल्फी कॅमेरासाठी होलपंच प्रकारचा कॅमेरा
  • Bokeh video द्वारे व्हिडिओला सुद्धा बॅकग्राऊंड ब्लर उपलब्ध!
  • व्हिडिओ एडिटरचा समावेश!
  • एस पेन द्वारे आता अधिक गोष्टी नियंत्रित करता येतील
  • फिंगरप्रिंट स्कॅनर डिस्प्लेखालीच समाविष्ट
  • Samsung DeX द्वारे पीसी व मॅकला जोडून पूर्ण डेस्कटॉप प्रमाणे वापरता येईल!

Samsung Galaxy Note 10+ Specs

डिस्प्ले : 6.8-inch Quad HD+ 3040×1440 (498ppi), HDR10+, Dynamic AMOLED Infinity-O
प्रोसेसर : Qualcomm Snapdragon 855/Samsung Exynos 9 Octa 9825
रॅम : 12GB
स्टोरेज : 256GB/512GB
कॅमेरा : Ultra Wide: 16MP F2.2 (123°) + Wide-angle: 12MP 2PD AF F1.5/F2.4 OIS (77°) + Telephoto: 12MP F2.1 OIS (45°) + DepthVision Camera: VGA
फ्रंट कॅमेरा : 10MP 2PD AF F2.2 (80°)
बॅटरी : 4300mAh 45W fast charging
ऑपरेटिंग सिस्टिम : Android 9.0 (Pie)
सेन्सर्स : Accelerometer, Barometer, Ultrasonic Fingerprint Sensor, Gyro Sensor, Geomagnetic, Hall, Proximity Sensor, RGB light sensor
इतर : 5G, Bluetooth 5.0, USB Type-C, NFC, 25W charger
रंग : Auro Glow, Aura White, Aura Black, Blue
किंमत : Note 10+ : $1099 (12GB+256GB) $1199 (12GB+512GB)
(Note 10+ ची किंमत भारतात ₹७९९९९ पासून पुढे)
Note 10+ 5G : $1299.99 (12GB+256GB) $1399.99 (12GB+512GB)
Note 10 ची किंमत $949 असेल (भारतात ₹६९९९९)

यावेळी सॅमसंगने Galaxy Book S हा लॅपटॉपसुद्धा सादर केला असून हा Qualcomm Snapdragon 8cx आधारित असेल जो जवळपास पूर्ण दिवस बॅटरी लाईफ देतो! यामध्ये 8GB रॅम, 256GB/512GB स्टोरेज, 13.3” FHD TFT डिस्प्ले, 42Whबॅटरी देण्यात आली आहे.

Source: Introducing Samsung Galaxy Note 10
Tags: Galaxy NoteNoteSamsungSmartphones
Share3TweetSend
Previous Post

शायोमीचा चक्क 64MP कॅमेरा जाहीर : रेडमी फोन्समध्ये समावेश!

Next Post

हुवावेची नवी ऑपरेटिंग सिस्टम हार्मनी ओएस सादर : अँड्रॉइडला पर्याय?

Sooraj Bagal

Sooraj Bagal

Related Posts

Pixel 6a India

गूगलचा Pixel 6a भारतात उपलब्ध : सोबत Pixel Buds Pro सुद्धा!

July 21, 2022
Nothing Phone 1

Nothing कंपनीचा पहिला Nothing Phone (1) सादर : नवं पारदर्शक डिझाईन!

July 12, 2022
Moto G42 भारतात सादर : AMOLED डिस्प्ले, 50MP कॅमेरा!

Moto G42 भारतात सादर : AMOLED डिस्प्ले, 50MP कॅमेरा!

July 4, 2022
Poco F4 5G

Poco F4 5G भारतात सादर : SD870, AMOLED डिस्प्ले आणि किंमतही कमी!

June 24, 2022
Next Post
huawei harmony os

हुवावेची नवी ऑपरेटिंग सिस्टम हार्मनी ओएस सादर : अँड्रॉइडला पर्याय?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ADVERTISEMENT
Gmail Redesign 2022

जीमेल आता नव्या रूपात : नव्या डिझाईनसोबत वर्कस्पेस एका क्लिकवर!

July 29, 2022
Google Street View India

गूगलची स्ट्रीट व्ह्यू भारतात पुन्हा सुरू : १० शहरांचा 360° पॅनोरामा पहा!

July 27, 2022
Amazon Prime Day India

ॲमेझॉन प्राइम डे सेल २३ व २४ जुलै : प्राइम ग्राहकांसाठी खास ऑफर्स!

July 22, 2022
Pixel 6a India

गूगलचा Pixel 6a भारतात उपलब्ध : सोबत Pixel Buds Pro सुद्धा!

July 21, 2022
एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

September 25, 2012
मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

September 10, 2012
यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

November 4, 2016
ADVERTISEMENT
MarathiTech – मराठीटेक

तंत्रज्ञानाविषयी मराठी भाषेतली प्रसिद्ध वेबसाइट! नवं तंत्रज्ञान, नवनवे फोन्स, ॲप्स यांच्याबद्दल रंजक माहिती...

मराठीटेकला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा

Gmail Redesign 2022

जीमेल आता नव्या रूपात : नव्या डिझाईनसोबत वर्कस्पेस एका क्लिकवर!

July 29, 2022
Google Street View India

गूगलची स्ट्रीट व्ह्यू भारतात पुन्हा सुरू : १० शहरांचा 360° पॅनोरामा पहा!

July 27, 2022

जीमेल आता नव्या रूपात : नव्या डिझाईनसोबत वर्कस्पेस एका क्लिकवर!

गूगलची स्ट्रीट व्ह्यू भारतात पुन्हा सुरू : १० शहरांचा 360° पॅनोरामा पहा!

ॲमेझॉन प्राइम डे सेल २३ व २४ जुलै : प्राइम ग्राहकांसाठी खास ऑफर्स!

गूगलचा Pixel 6a भारतात उपलब्ध : सोबत Pixel Buds Pro सुद्धा!

गूगलची ChromeOS Flex जुन्या लॅपटॉप्स, पीसीसाठीही उपलब्ध!

  • About
  • Advertise
  • Privacy Policy
  • Contact

© MarathiTech 2022 A Product by BagalTech

No Result
View All Result
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • खास लेख
  • गेमिंग
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • शॉपिंग ऑफर्स
  • आमच्याबद्दल About Us
  • संपर्क – प्रतिक्रिया

© MarathiTech 2022 A Product by BagalTech

error: Content is protected!