MarathiTech - मराठीटेक
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
MarathiTech - मराठीटेक
No Result
View All Result
Home ऑपरेटिंग सिस्टिम्स Android

अँड्रॉइड १० उपलब्ध : 5G सपोर्ट, डार्क थीम सारख्या नव्या सोयींची जोड

Sooraj Bagal by Sooraj Bagal
September 4, 2019
in Android, ऑपरेटिंग सिस्टिम्स
Android New Logo 2019

अँड्रॉइडची नवी ऑपरेटिंग सिस्टिम अँड्रॉइड १० कालपासून अनेक फोन्सवर उपलब्ध झाली आहे. अर्थात सर्वात आधी गूगलच्या स्वतःच्या पिक्सल फोन्सवर हे अपडेट देण्यात आलं असून त्यामध्ये Pixel, Pixel XL, Pixel 2, Pixel 2 XL, Pixel 3, Pixel 3 XL, Pixel 3a आणि Pixel 3a XL अशा सर्व फोन्सचा समावेश आहे! बाकी कंपन्यांमध्ये Redmi K20 Pro, OnePlus 7 व OnePlus 7 Pro, Essential Phone यांनी हे अपडेट अगदी पहिल्याच दिवशी दिलं आहे. रेडमी आणि वनप्लसनी चाचणी आवृत्ती दिली असून आता नव्याने फोन सादर करत नसलेल्या एसेंशियल कंपनीने मात्र स्टेबल आवृत्ती दिली आहे!

काही दिवसांपूर्वीच गूगलने माहिती दिल्याप्रमाणे अँड्रॉइड Q चं नवं नाव अँड्रॉइड १० असणार आहे. यापुढे अँड्रॉइडच्या आवृत्त्यांची नवे डेझर्टसवरून नसणार. त्यावेळी अँड्रॉइडसाठी नवा लोगोसुद्धा सादर करण्यात आला होता!

ADVERTISEMENT

अँड्रॉइड १० बद्दल माहिती देण्यासाठी गूगलतर्फे प्रसिद्ध करण्यात आलेल्या ब्लॉगपोस्टमध्ये असं सांगण्यात आलं आहे की अँड्रॉइड आता 5G फोन्सना सपोर्ट देत असून प्रथम LG V50 5G ThinQ, Samsung Galaxy S10 5G, Xiaomi Mi Mix 5G आणि OnePlus 7 Pro 5G यांना हा सपोर्ट मिळत आहे. यासोबत घडी घालता येणाऱ्या फोन्सना सुद्धा अँड्रॉइड १० सपोर्ट देत आहे. अँड्रॉइड १० ओएस अधिक सुरक्षित, पारदर्शक आणि तुमच्या डेटावर अधिक नियंत्रण देणारी असेल.

अँड्रॉइड १० मध्ये नव्याने जोडण्यात आलेल्या सुविधा

  • Foldables सपोर्ट : घडी घालता येणाऱ्या सॅमसंग गॅलक्सी फोल्ड सारख्या फोन्सना आता अधिकृत सपोर्ट मिळणार असून यामुळे हे फोन्स वापरणं आणखी सोपं होईल. येत्या काळात या प्रकारच्या फोन्सचं वाढणारं प्रमाण लक्षात घेऊन गूगलने हा बदल केला आहे. यामुळे फोन घडी घातलेल्या अवस्थेत करत असलेली गोष्ट घडी उलगडल्यावरसुद्धा मोठ्या स्क्रीनवर आपोआप अॅडजस्ट होईल!
  • 5G Networks : लवकरच सर्वत्र सुरू होत असलेल्या 5G तंत्रज्ञानाला अँड्रॉइड १० सपोर्ट देत असून यामुळे अनेक पटींनी वाढलेल्या इंटरनेट स्पीडचा आनंद अॅप्स व गेम्सवर सहज घेता येईल!
  • Live Caption : या सुविधेमुळे फोनमध्ये कुठेही ऑडिओ/व्हिडिओ सुरू असताना त्याच्या कॅप्शन्स पाहता येतील! https://youtu.be/YL-8Xfx6S5o
  • Smart Reply in notifications : नोटिफिकेशन्समध्ये स्मार्ट रिप्लायची सोय जी मशीन लर्निंगचा वापर करून नोटिफिकेशनला अपेक्षित रिप्लाय स्वतःहून सुचवेल!
  • Dark Theme : अँड्रॉइड १० मध्ये प्रथमच डार्क मोड थीमचा पूर्ण फोनमध्ये वापर करता येणार असून यामुळे डोळ्यांवरचा ताण कमी होईल आणि बॅटरीसुद्धा वाचेल!
  • Gesture navigation : यामुळे नॅविगेशन बार गायब होणार असून केवळ जेश्चर (वेगवेगळे स्वाईप) आधारित नॅविगेशन वापराव लागेल.
  • प्रायव्हसी : अलीकडे डेटा प्रायव्हसीवरून सुरू असलेल्या चर्चेला पर्याय म्हणून गूगलने अँड्रॉइड १० मध्ये बरेच नवे पर्याय जोडले आहेत जे आपल्याला डेटावर नियत्रण मिळवून देतील. यामध्ये प्रमुख पाऊल म्हणजे कोणत्या अॅपला कोणती परवानगी द्यायची याचं नियंत्रण. शिवाय लोकेशन, डिव्हाईस ट्रॅकिंगसाठीसुद्धा नवे पर्याय!
  • Digital Wellbeing वर सुद्धा आणखी जास्त लक्ष देण्यात आलं असून फोकस मोडद्वारे आपल्याला फोन वापरण्यामधून विश्रांती घेण्यास, कोणत्या अॅपवर किती वेळ घालवला हे पाहण्यास मदत होईल.
Android 10 Dark Theme
Tags: AndroidAndroid 10Operating Systems
Share12TweetSend
Previous Post

एयरटेल Xstream अँड्रॉइड टीव्ही बॉक्स व स्टिक सादर!

Next Post

एसर व एसुस यांचे जगात प्रथमच 300Hz डिस्प्ले असलेले लॅपटॉप!

Sooraj Bagal

Sooraj Bagal

Related Posts

Windows 11 2022 अपडेट आजपासून उपलब्ध : 22H2 मध्ये नव्या सोयी!

Windows 11 2022 अपडेट आजपासून उपलब्ध : 22H2 मध्ये नव्या सोयी!

September 21, 2022
अँड्रॉइडमध्ये आता अनेक नव्या सोयी : Meet वर मित्रांसोबत यूट्यूब व्हिडिओ पहा!

अँड्रॉइडमध्ये आता अनेक नव्या सोयी : Meet वर मित्रांसोबत यूट्यूब व्हिडिओ पहा!

September 10, 2022
Chrome OS Flex

गूगलची ChromeOS Flex जुन्या लॅपटॉप्स, पीसीसाठीही उपलब्ध!

July 15, 2022
Call Recording Android App

कॉल रेकॉर्डिंग ॲप्स बंद होणार : ११ मे पासून गूगलचा निर्णय!

April 22, 2022
Next Post
Asus 300Hz display laptop

एसर व एसुस यांचे जगात प्रथमच 300Hz डिस्प्ले असलेले लॅपटॉप!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ADVERTISEMENT
नवा व्हिडिओ : ॲपल मॅकवर मराठीत टायपिंग!

नवा व्हिडिओ : ॲपल मॅकवर मराठीत टायपिंग!

March 20, 2023
जियो व एयरटेलतर्फे ग्राहकांना अमर्यादित मोफत 5G डेटा!

जियो व एयरटेलतर्फे ग्राहकांना अमर्यादित मोफत 5G डेटा!

March 18, 2023
सॅमसंगचे Galaxy A34 5G आणि A54 5G भारतात सादर!

सॅमसंगचे Galaxy A34 5G आणि A54 5G भारतात सादर!

March 17, 2023
टी सिरीजच्या हनुमान चालीसा व्हिडिओला तब्बल ३०० कोटी व्ह्यूज!

टी सिरीजच्या हनुमान चालीसा व्हिडिओला तब्बल ३०० कोटी व्ह्यूज!

March 10, 2023
एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

September 25, 2012
यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

November 4, 2016
मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

September 10, 2012
ADVERTISEMENT
MarathiTech – मराठीटेक

तंत्रज्ञानाविषयी मराठी भाषेतली प्रसिद्ध वेबसाइट! नवं तंत्रज्ञान, नवनवे फोन्स, ॲप्स यांच्याबद्दल रंजक माहिती...

मराठीटेकला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा

नवा व्हिडिओ : ॲपल मॅकवर मराठीत टायपिंग!

नवा व्हिडिओ : ॲपल मॅकवर मराठीत टायपिंग!

March 20, 2023
जियो व एयरटेलतर्फे ग्राहकांना अमर्यादित मोफत 5G डेटा!

जियो व एयरटेलतर्फे ग्राहकांना अमर्यादित मोफत 5G डेटा!

March 18, 2023

नवा व्हिडिओ : ॲपल मॅकवर मराठीत टायपिंग!

जियो व एयरटेलतर्फे ग्राहकांना अमर्यादित मोफत 5G डेटा!

सॅमसंगचे Galaxy A34 5G आणि A54 5G भारतात सादर!

टी सिरीजच्या हनुमान चालीसा व्हिडिओला तब्बल ३०० कोटी व्ह्यूज!

नोकियाचा कंपनीचा नवा लोगो

  • About
  • Advertise
  • Privacy Policy
  • Contact

© MarathiTech 2022 A Product by BagalTech

No Result
View All Result
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • खास लेख
  • गेमिंग
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • शॉपिंग ऑफर्स
  • आमच्याबद्दल About Us
  • संपर्क – प्रतिक्रिया

© MarathiTech 2022 A Product by BagalTech

error: Content is protected!