MarathiTech - मराठीटेक
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
MarathiTech - मराठीटेक
No Result
View All Result
Home इंटरनेट

डिज्नी+ स्ट्रीमिंग सेवा भारतात उपलब्ध : डिज्नी+ हॉटस्टारद्वारे सुरुवात!

Sooraj Bagal by Sooraj Bagal
March 11, 2020
in इंटरनेट

Disney+ या डिज्नी या मनोरंजन क्षेत्रातील मोठ्या कंपनीच्या स्ट्रीमिंग सेवेस आजपासून भारतात सुरूवात झाली आहे. यापूर्वी जाहीर केलेल्या तारखेच्या १८ दिवस आधीच ही सेवा उपलब्ध होत आहे! भारतीय स्ट्रीमिंग सेवा हॉटस्टार यांच्यासोबत त्यांनी भागीदारी केली असून भारतात त्यांचे कार्यक्रम, चित्रपट, मालिका डिज्नी + हॉटस्टार या नावाखाली उपलब्ध होतील.
हॉटस्टारची मालकी स्टार इंडियाकडे असून स्टार इंडियाची मालकी वॉल्ट डिज्नी कंपनीकडे आहे!

डिज्नी + च्या स्वतःच्या मालिका (Originals) जसे की मॅन्डोलोरीयन, मार्व्हलचा हीरो प्रोजेक्ट आता प्रेक्षकांना भारतात पाहावयास मिळेल. यासोबत काही दिवसांपूर्वी जाहीर केलेले मार्व्हल सिनेमॅटिक युनिव्हर्समधील चित्रपट जसे की कॅप्टन अमेरिका सिव्हिल वॉर, डॉक्टर स्ट्रेंज आणि पिक्सारचे ए बग्स लाईफ, कार्स ३ नॅशनल जिओग्राफिकच्या डॉक्युमेंटरी सुद्धा उपलब्ध झाल्या आहेत. शिवाय मिकी माऊस सारखे लहान मुलांसाठीचे कार्यक्रम तर आहेतच.

ADVERTISEMENT

हॉटस्टारच्या अॅपचा लोगो, थीम असं सर्वकाही बदलण्यात आलं असून अँड्रॉइड (प्ले स्टोअर) व iOS (अॅप स्टोअर) वर नव्या अपडेटद्वारे ही बदल पाहायला मिळतील. ही सेवा खरेतर २९ मार्च पासून उपलब्ध होत आहे असं अधिकृतरित्या सांगण्यात आलं होतं. अजूनही हॉटस्टार त्यांच्या ट्विटरवर हेच सांगत आहे मात्र प्रत्यक्षात त्यांच्या अॅपवर डिज्नी + कंटेट पाहावयास मिळतोय!
Disney+ चा कंटेट पाहण्यासाठी तुम्हाला Hotstar Premium सेवा घ्यावी लागेल. ही सेवा वर्षाला ९९९ रुपये किंवा २९९ रुपये/दरमहा या किंमतीत उपलब्ध आहे.

नेटफ्लिक्स, अॅमेझॉन प्राइम व्हिडिओ, Zee5, Voot, Hungama, ErosNow, हॉटस्टार असे बरेच पर्याय उपलब्ध असताना आता आणखी एक नवा पर्याय प्रेक्षकांना उपलब्ध झालाय. कारण प्रत्येक सेवेसाठी पैसे मोजण ग्राहकांना शक्य होणार नाहीच. आता प्रत्येकजण स्वतःची सेवा समोर आणण्याच्याच प्रयत्नात दिसत आहे. या गर्दीत कोण यशस्वी होत जाईल ते दिसेलच.

अपडेट 02/04/2020 : डिज्नी प्लसच्या भारतीय किंमती आता अधिकृतरित्या जाहीर करण्यात आल्या असून ही सेवा उद्या म्हणजे ३ एप्रिलपासून भारतात सुरू होत आहे.
सध्याच्या हॉटस्टार ग्राहकांना नव्या प्लॅन्समध्ये समाविष्ट केलं जाईल. त्यांचा सध्याचा प्लॅन संपेपर्यंत कोणतेही अतिरिक्त पैसे द्यावे लागणार नाहीत. प्लॅन्स संपल्यावर renew करताना नव्या किंमतीनुसार पैसे द्यावे लागतील

डिज्नी+ हॉटस्टारच्या नव्या ग्राहकांना खालील प्रमाणे पैसे द्यावे लागतील.
Basic Tier : मोफत मात्र जाहिरातीसह
VIP प्लॅन : वार्षिक ३९९ : लाईव्ह स्पोर्ट्स, भारतीय टीव्ही मालिका, भारतीय चित्रपट, हॉटस्टारचे स्वतःचे शो
Premium प्लॅन : वार्षिक १४९९ : लाईव्ह स्पोर्ट्स, भारतीय टीव्ही मालिका, भारतीय चित्रपट, हॉटस्टारचे स्वतःचे शो + अमेरिकन टीव्ही मालिका, डिज्नी+ चित्रपट व मालिका, हॉलीवुड चित्रपट

डिज्नी + वर सुरू असलेले / उपलब्ध कार्यक्रम

Diary of a Future President: Season 1, ongoing
Disney Family Sundays: Season 1, ongoing
Disney’s Fairy Tale Weddings: Season 2, ongoing
Encore!: Season 1
Forky Asks a Question: Season 1
High School Musical: The Musical: The Series: Season 1
The Imagineering Story: Limited Series
Lady and the Tramp (2019)
Lamp Life
The Mandalorian: Season 1
Marvel’s Hero Project: Season 1, ongoing
Noelle
One Day at Disney
One Day at Disney: Season 1, ongoing
Pick of the Litter: Season 1
Pixar in Real Life: Season 1, ongoing
Shop Class: Season 1, ongoing
Short Circuit: Season 1
SparkShorts: Season 1
Timmy Failure: Mistakes Were Made
Togo
The World According to Jeff Goldblum: Season 1

यादी संदर्भ : Disney + Hotstar App

सर्व स्ट्रीमिंग सेवांवरील उपलब्ध चित्रपट/मालिकांची अद्ययावत माहिती मिळवण्यासाठी जस्टवॉच उत्तम वेबसाइट आहे : justwatch.com/in/provider/hotstar-disney

Tags: DisneyDisney PlusHotstarStreaming
Share16TweetSend
Previous Post

कॉल ऑफ ड्युटी वॉरझोन आजपासून PC, Xbox, PS4 वर मोफत उपलब्ध!

Next Post

रेडमी Note 9 Pro व Note 9 Pro Max सादर

Sooraj Bagal

Sooraj Bagal

Related Posts

डिज्नी + हॉटस्टार आता जियो हॉटस्टार : JioTele OS चे टीव्ही येणार!

डिज्नी + हॉटस्टार आता जियो हॉटस्टार : JioTele OS चे टीव्ही येणार!

February 20, 2025
Netflix India New Plans

नेटफ्लिक्सचे भारतात नवे स्वस्त प्लॅन्स जाहीर!

December 14, 2021
Amazon Fire TV Live TV

ॲमेझॉन फायर टीव्हीवर आता लाईव्ह टीव्ही चॅनल्स पाहता येणार!

October 9, 2020
Made By Google Pixel

गूगल Pixel 4a 5G, Pixel 5, नवं गूगल टीव्ही असलेलं क्रोमकास्ट सादर

October 1, 2020
Next Post
रेडमी Note 9 Pro व Note 9 Pro Max सादर

रेडमी Note 9 Pro व Note 9 Pro Max सादर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ADVERTISEMENT
Perplexity Pro Airtel Offer

एयरटेलच्या सर्व ग्राहकांना Perplexity Pro AI वर्षभर मोफत!

July 18, 2025
Google Gemini AI Pro Free Offer

गूगलची विद्यार्थ्यांसाठी ऑफर : Gemini AI Pro + 2TB स्टोरेज एक वर्ष मोफत!

July 17, 2025
सॅमसंगचे Galaxy Fold7, Flip7 आणि Flip7 FE सादर!

सॅमसंगचे Galaxy Fold7, Flip7 आणि Flip7 FE सादर!

July 10, 2025
Moto g96

मोटोचा Moto g96 भारतात सादर!

July 10, 2025
MSRTC Timing Check Marathi

एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

September 25, 2012
यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

November 4, 2016
मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

September 10, 2012
ADVERTISEMENT
MarathiTech - मराठीटेक

तंत्रज्ञानाविषयी मराठी भाषेतली प्रसिद्ध वेबसाइट! नवं तंत्रज्ञान, नवनवे फोन्स, ॲप्स यांच्याबद्दल रंजक माहिती...

मराठीटेकला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा

Perplexity Pro Airtel Offer

एयरटेलच्या सर्व ग्राहकांना Perplexity Pro AI वर्षभर मोफत!

July 18, 2025
Google Gemini AI Pro Free Offer

गूगलची विद्यार्थ्यांसाठी ऑफर : Gemini AI Pro + 2TB स्टोरेज एक वर्ष मोफत!

July 17, 2025

एयरटेलच्या सर्व ग्राहकांना Perplexity Pro AI वर्षभर मोफत!

गूगलची विद्यार्थ्यांसाठी ऑफर : Gemini AI Pro + 2TB स्टोरेज एक वर्ष मोफत!

सॅमसंगचे Galaxy Fold7, Flip7 आणि Flip7 FE सादर!

मोटोचा Moto g96 भारतात सादर!

वनप्लसचे Nord 5 आणि Nord CE 5 भारतात सादर!

  • About
  • Advertise
  • Privacy Policy
  • Contact

© MarathiTech 2024 A Product by BagalTech

error: Content is protected!
No Result
View All Result
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • खास लेख
  • गेमिंग
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • शॉपिंग ऑफर्स
  • आमच्याबद्दल About Us
  • संपर्क – प्रतिक्रिया

© MarathiTech 2024 A Product by BagalTech