MarathiTech - मराठीटेक
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
MarathiTech - मराठीटेक
No Result
View All Result
Home कॅमेरा

कॅननचा 8K व्हिडिओ रेकॉर्डिंग असलेला शक्तिशाली EOS R5 कॅमेरा सादर!

Sooraj Bagal by Sooraj Bagal
July 9, 2020
in कॅमेरा
Canon EOS R5

कॅनन या प्रसिद्ध कॅमेरा निर्माता कंपनीने त्यांच्या EOS R मिररलेस कॅमेरा मालिकेत आज EOS R5 व R6 हे दोन नवे कॅमेरे जोडले असून यापैकी EOS R5 हा कॅमेरा चक्क 8K म्हणजे फुल एचडीच्या आठपट रेजोल्यूशनमध्ये व्हिडिओ रेकॉर्डिंग करू शकतो! असं करू शकणारा हा जगातला पहिलाच इंटरचेंजेबल लेन्स कॅमेरा असल्याचं कॅननचं म्हणणं आहे! हा कॅननचा आजवरचा सर्वात शक्तिशाली मिररलेस कॅमेरा आहे. याची किंमत $3899 म्हणजे जवळपास ~२,९३,००० असणार आहे ती सुद्धा लेन्सशिवाय!

R5 मध्ये 45MP सेन्सर असून याची ISO रेंज 100-51200 इतकी आहे. याचं खास वैशिष्ट्य अर्थात यामध्ये असलेलं 8K व्हिडिओ रेकॉर्डिंग! हा कॅमेरा 8K RAW व्हिडिओ 29.97fps 4:2:2 10bit color मध्ये रेकॉर्ड करेल. सलग रेकॉर्ड केल्यास रूम टेंपरेचरमध्ये हा २० मिनिटे लांबी असलेला 8K व्हिडिओ रेकॉर्ड करू शकेल! शिवाय uncropped 4K DCI व्हिडिओ तोसुद्धा 59.94fps मध्ये रेकॉर्ड करू शकेल.

ADVERTISEMENT

फोटोसाठी यामध्ये 45MP सेन्सर असून याद्वारे 12fps नी फोटो काढू शकेल. या मध्ये in-body image stabilization सुद्धा आहे. कॅननच्या म्हणण्यानुसार यामध्ये असलेली Dual Pixel ऑटोफोकस सिस्टम जवळपास १०० टक्के AF Area कव्हर करू शकेल! सोबत कुत्रा, मांजर आणि पक्षी यांच्यासाठीही eye tracking ची सोय आहे!

जर तुम्हाला 8K ची गरज वाटत नसेल तर EOS R6 हा R5 पेक्षा स्वस्त पर्याय योग्य ठरेल. R5 मध्ये 20.1MP सेन्सर असून हा कॅमेरा 4K/60fps आणि 1080p/120fps मध्ये व्हिडिओ रेकॉर्ड करू शकतो! याची किंमत $2499 (~१,८८,०००) लेन्सशिवाय असणार आहे.

दोन्ही कॅमेरा सध्याच्या मॉडेल्सपेक्षा बऱ्याच जास्त किंमतीचे असून कॅननने आता सोनीच्या समोर 4K ऐवजी थेट 8K मध्ये स्पर्धा निर्माण करणार असल्याचं दिसत आहे! सोनीचा सुद्धा नवा कॅमेरा लवकरच येत आहे मात्र त्यामध्ये 8K असण्याची शक्यता सध्यातरी वाटत नाही. त्यामुळे कॅनन तूर्तास कॅमेरा बाजारात एकमेव कंपनी असेल जिचा 8K रेकॉर्ड करणारा मिररलेस कॅमेरा उपलब्ध आहे!

Search Terms : Canon announces the EOS R5, an 8K-shooting pro mirrorless camera

Source: The Verge
Tags: 8KCamerasCanonEosEOS RMirrorless
Share10TweetSend
Previous Post

डेल कंपनीचे XPS 13 व XPS 15 प्रीमियम लॅपटॉप्स भारतात सादर !

Next Post

गूगल करणार ७५००० कोटींची गुंतवणूक! : गूगल फॉर इंडिया २०२०

Sooraj Bagal

Sooraj Bagal

Related Posts

DJI चा नवा Inspire 3 ड्रोन : 8K फुलफ्रेम सेन्सरसह!

DJI चा नवा Inspire 3 ड्रोन : 8K फुलफ्रेम सेन्सरसह!

April 15, 2023
DJI Air 2S

DJI चा नवा ड्रोन Air 2S : आता 1″ सेन्सर आणि 5.6K व्हिडिओसह!

April 16, 2021
DJI चा FPV ड्रोन सादर : आता मोशन कंट्रोलर, नव्या गॉगल्ससह!

DJI चा FPV ड्रोन सादर : आता मोशन कंट्रोलर, नव्या गॉगल्ससह!

March 6, 2021
Ring Always Home Cam

ॲमेझॉनच्या रिंगचा उडणारा होम सिक्युरिटी ड्रोन कॅमेरा!

September 26, 2020
Next Post
Google For India 2020

गूगल करणार ७५००० कोटींची गुंतवणूक! : गूगल फॉर इंडिया २०२०

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ADVERTISEMENT
Google's 25th Birthday

आज गूगलचा २५ वा वाढदिवस : इंटरनेट सर्चचा राजा!

September 27, 2023
WhatsApp Channels

व्हॉट्सॲप चॅनल्स आता सर्वांना उपलब्ध : बिझनेस ॲपसाठीही नवे फीचर्स!

September 21, 2023
ॲपलची आयफोन १५ मालिका सादर : आता चक्क USB C पोर्टसह!

ॲपलची आयफोन १५ मालिका सादर : आता चक्क USB C पोर्टसह!

September 13, 2023
Jio AGM : AirFiber, Cloud PC, स्मार्ट होम, AI मॉडेल्स बद्दल माहिती जाहीर!

Jio AGM : AirFiber, Cloud PC, स्मार्ट होम, AI मॉडेल्स बद्दल माहिती जाहीर!

August 28, 2023
एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

September 25, 2012
यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

November 4, 2016
मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

September 10, 2012
ADVERTISEMENT
MarathiTech - मराठीटेक

तंत्रज्ञानाविषयी मराठी भाषेतली प्रसिद्ध वेबसाइट! नवं तंत्रज्ञान, नवनवे फोन्स, ॲप्स यांच्याबद्दल रंजक माहिती...

मराठीटेकला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा

Google's 25th Birthday

आज गूगलचा २५ वा वाढदिवस : इंटरनेट सर्चचा राजा!

September 27, 2023
WhatsApp Channels

व्हॉट्सॲप चॅनल्स आता सर्वांना उपलब्ध : बिझनेस ॲपसाठीही नवे फीचर्स!

September 21, 2023

आज गूगलचा २५ वा वाढदिवस : इंटरनेट सर्चचा राजा!

व्हॉट्सॲप चॅनल्स आता सर्वांना उपलब्ध : बिझनेस ॲपसाठीही नवे फीचर्स!

ॲपलची आयफोन १५ मालिका सादर : आता चक्क USB C पोर्टसह!

Jio AGM : AirFiber, Cloud PC, स्मार्ट होम, AI मॉडेल्स बद्दल माहिती जाहीर!

चंद्रयान ३ यशस्वीरित्या चंद्रावर उतरलं : दक्षिण ध्रुवावर उतरणारा पहिलाच देश!

  • About
  • Advertise
  • Privacy Policy
  • Contact

© MarathiTech 2022 A Product by BagalTech

No Result
View All Result
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • खास लेख
  • गेमिंग
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • शॉपिंग ऑफर्स
  • आमच्याबद्दल About Us
  • संपर्क – प्रतिक्रिया

© MarathiTech 2022 A Product by BagalTech

error: Content is protected!