MarathiTech - मराठीटेक
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
MarathiTech - मराठीटेक
No Result
View All Result
Home Auto

आता फोर्डचा F-150 इलेक्ट्रिक ट्रक : ही गाडी घराला तीन दिवस वीज पुरवू शकते!

Sooraj Bagal by Sooraj Bagal
May 20, 2021
in Auto
Ford F150

अलीकडे इंधनाच्या वाढत जाणाऱ्या किंमती लक्षात घेत इलेक्ट्रिक वाहनांची मागणी वाढत आहे. त्यामुळे आता कंपन्या त्यांच्या प्रसिद्ध गाड्यांच्या इलेक्ट्रिक आवृत्त्या बाजारात आणत आहेत. आज फोर्डने सुद्धा त्यांच्या अमेरिकेत प्रचंड लोकप्रिय असणाऱ्या F-150 पिकअप ट्रकची इलेक्ट्रिक आवृत्ती सादर केली आहे.

इलेक्ट्रिक वाहने तयार करण्यासाठी फोर्डने 22 बिलियन डॉलर्सची गुंतवणूक केली आहे. Ford F-150 Lightning त्यांच्या Dearborn, Michigan येथील Rouge Factory मध्ये तयार करण्यात येईल. यासोबत फोर्ड Mustang Mach E आणि एक इलेक्ट्रिक व्हॅनसुद्धा आणणार आहे.

ADVERTISEMENT
  • या गाडीची बॅटरी फुल चार्ज असताना ही गाडी एका घराला जनरेटर प्रमाणे तीन दिवस वीज पुरवू शकते आणि त्यासाठी पॉवर आउटलेटसुद्धा देण्यात आलं आहे!
  • ही गाडी यामधील ११ आउटलेटस द्वारे तब्बल 9.6kWh पॉवर देऊ शकते
  • हे आउटलेटस तुमचे कामासाठी वापरले जाणारे टूल्सनासुद्धा पॉवर देऊ शकतील
  • फूड ट्रक सारख्या गोष्टीसुद्धा यावर चालवता येतील.
  • यामध्ये १५.५ इंची टचस्क्रीनसुद्धा आहे जो आपल्याला गाडी नियंत्रित करण्यासाठी वापरता येईल.
  • एका फुल चार्जवर हा ट्रक ३७० किमी चालवता येईल शिवाय आणखी मोठ्या क्षमतेचा पर्यायही उपलब्ध
  • ट्रेलर जोडताना मागे असलेल्या कॅमेराद्वारे लाईव्ह दृश्य दिसेल.
  • यामध्ये वेळोवेळी सॉफ्टवेअर अपडेट्स सुद्धा मिळतील जे ह्या गाडीची कामगिरी आणखी सुधारू शकतील.
  • तुमचा फोनसुद्धा ही गाडी अनलॉक करण्यासाठी वापरता येईल.
Ford F150 Electric

या गाडीची किंमत 40000 डॉलर्स (~रु २९,२६,०००) पासून सुरू होत आहे. ही गाडी सध्यातरी भारतात येण्याची शक्यता नाही. टेस्ला कंपनीच्या इलेक्ट्रिक गाड्यांना मिळणारा प्रतिसाद पाहता इतर कंपन्यानी यासाठी पुढाकार घेतला हे नक्कीच चांगली होत आहे.

भारतातही अनेकजण सध्या SUV प्रकारच्या गाड्यांमध्ये इलेक्ट्रिक गाडीचा पर्याय स्वीकारताना दिसत आहेत. टाटा कंपनीची Nexon EV सध्या सर्वात लोकप्रिय म्हणता येईल. येत्या काही वर्षात भारतीय कंपन्यासुद्धा त्यांचे मिनी ट्रक, ट्रक इलेक्ट्रिक स्वरूपात आणतीलच… आता फक्त अडचण आहे ती चार्जिंग स्टेशन्सची…

https://youtu.be/GbmS-YGtzWo

Tags: AutoElectricFordTrucks
ShareTweetSend
Previous Post

अँड्रॉइड १२ अपडेट : अँड्रॉइडची नवी आवृत्ती चाचणीसाठी उपलब्ध!

Next Post

फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर उद्या खरंच बंद होणार आहेत का ?

Sooraj Bagal

Sooraj Bagal

Related Posts

Sony Vision S Electric Car

सोनीची इलेक्ट्रिक कार येणार : नव्या कार कंपनीची घोषणा!

January 5, 2022
ओला कंपनीच्या इलेक्ट्रिक स्कूटर्स सादर : भन्नाट सोयींसह किंमतही जाहीर!

ओला कंपनीच्या इलेक्ट्रिक स्कूटर्स सादर : भन्नाट सोयींसह किंमतही जाहीर!

August 16, 2021
Ola Electric

ओला कंपनी दुचाकी निर्मिती करणार : जगातली सर्वात मोठी फॅक्टरी!

March 8, 2021
FASTag ची मुदत १५ डिसेंबरपर्यंत वाढवली : काय आहे फास्टॅग?

FASTag ची मुदत १५ डिसेंबरपर्यंत वाढवली : काय आहे फास्टॅग?

December 1, 2019
Next Post
फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर उद्या खरंच बंद होणार आहेत का ?

फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर उद्या खरंच बंद होणार आहेत का ?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ADVERTISEMENT
Anthropic AI Plugins IT Selloff

Anthropic च्या नव्या AI प्लगइन्समुळे जगभरात आयटी शेयर्स घसरले!

February 4, 2026
Adobe Express Premium FREE Airtel Offer

एयरटेलच्या सर्व ग्राहकांना ‘अडोबी एक्सप्रेस प्रीमियम’ मोफत!

January 29, 2026
अडोबी फोटोशॉप आता ChatGPT मध्ये उपलब्ध!

अडोबी फोटोशॉप आता ChatGPT मध्ये उपलब्ध!

December 11, 2025
Google Year In Search 2025

गूगल इयर इन सर्च : भारतीयांनी २०२५ मध्ये गूगलवर ‘काय’ शोधलं?

December 6, 2025
MSRTC Timing Check Marathi

एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

September 25, 2012
Adobe Express Premium FREE Airtel Offer

एयरटेलच्या सर्व ग्राहकांना ‘अडोबी एक्सप्रेस प्रीमियम’ मोफत!

January 29, 2026
Anthropic AI Plugins IT Selloff

Anthropic च्या नव्या AI प्लगइन्समुळे जगभरात आयटी शेयर्स घसरले!

February 4, 2026
ADVERTISEMENT
MarathiTech - मराठीटेक

तंत्रज्ञानाविषयी मराठी भाषेतली प्रसिद्ध वेबसाइट! नवं तंत्रज्ञान, नवनवे फोन्स, ॲप्स यांच्याबद्दल रंजक माहिती...

मराठीटेकला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा

Anthropic AI Plugins IT Selloff

Anthropic च्या नव्या AI प्लगइन्समुळे जगभरात आयटी शेयर्स घसरले!

February 4, 2026
Adobe Express Premium FREE Airtel Offer

एयरटेलच्या सर्व ग्राहकांना ‘अडोबी एक्सप्रेस प्रीमियम’ मोफत!

January 29, 2026

Anthropic च्या नव्या AI प्लगइन्समुळे जगभरात आयटी शेयर्स घसरले!

एयरटेलच्या सर्व ग्राहकांना ‘अडोबी एक्सप्रेस प्रीमियम’ मोफत!

अडोबी फोटोशॉप आता ChatGPT मध्ये उपलब्ध!

गूगल इयर इन सर्च : भारतीयांनी २०२५ मध्ये गूगलवर ‘काय’ शोधलं?

सॅमसंगचा Galaxy Z Trifold फोन सादर : १० इंची डिस्प्ले!

  • About
  • Advertise
  • Privacy Policy
  • Contact

© MarathiTech 2024 A Product by BagalTech

error: Content is protected!
No Result
View All Result
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • खास लेख
  • गेमिंग
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • शॉपिंग ऑफर्स
  • आमच्याबद्दल About Us
  • संपर्क – प्रतिक्रिया

© MarathiTech 2024 A Product by BagalTech