नागरी विमान मंत्रालयाने आज नवी ड्रोन नियमावली २०२१ सादर केली असून ही यापूर्वीच्या Unmanned Aircraft Systems नियमावलीची जागा घेईल असं सांगण्यात आलं आहे. १५ जुलैला भारत सरकारने एक ड्रोन नियमावली जाहीर केली होती आणि संबंधित क्षेत्रातील व्यक्तीकडून ५ ऑगस्टपर्यंत प्रतिक्रिया/सूचना मागवल्या होत्या. ड्रोन्सच्या वापरामधील अडथळे कमी केल्याबद्दल या नियमावलीचं स्वागत सुद्धा करण्यात आलं होतं.
नव्या नियमावलीमधील काही बदल
ADVERTISEMENT
- नव्या नियमानुसार Unique Identification Number शिवाय ड्रोन उडवण्याची परवानगी नाही.
- हा नंबर मिळवण्यासाठी डिजिटल स्काय प्लॅटफॉर्मचा वापर करावा लागेल हा एक ऑनलाइन प्लॅटफॉर्म असेल जिथे यासंबंधीत सर्व गोष्टी एकाच जागी करता येतील.
- मायक्रो ड्रोन्स, नॅनो ड्रोन्स आणि संशोधनासाठी करण्यात येणाऱ्या वापरावेळी पायलट परवानगीची गरज नाही.
- ड्रोन वापरण्यासाठी लागणाऱ्या २५ फॉर्म्स/परवानगीची संख्या आता ५ वर आणण्यात आली आहे
- ग्रीन झोनमध्ये ४०० फुटांपर्यंत आणि विमानतळाच्या परिघापासून ८ ते १२ किमी अंतरावर २०० फुटांपर्यंत उड्डाणासाठी परवानगी लागणार नाही.
- certificate of conformance, certificate of maintenance, import clearance, acceptance of existing drones, operator permits, authorization of R&D organization and student remote pilot licence सारख्या गोष्टींची बरीच बंधने कमी करण्यात आली आहेत.
- (अधिक माहितीसाठी कृपया अधिकृत प्रेस नोटचा संदर्भ घ्या)