MarathiTech - मराठीटेक
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
MarathiTech - मराठीटेक
No Result
View All Result
Home ॲप्स

टेलिग्राम प्रीमियम उपलब्ध : दुप्पट लिमिट्स, जाहिराती नाही, खास स्टीकर्स, खास सोयी!

Sooraj Bagal by Sooraj Bagal
June 20, 2022
in ॲप्स
Telegram Premium

टेलिग्राम या प्रसिद्ध मेसेजिंग ॲपने आज त्यांचा प्रीमियम प्लॅन जाहीर केला असून यामध्ये बऱ्याच वेगळ्या सोयी जोडण्यात आल्या आहेत. शिवाय यासोबतच टेलिग्रामने दरमहा ७० कोटी ॲक्टिव्ह युजर्सचा टप्पा गाठला असल्याचंही सांगितलं आहे!

तुम्ही जर सध्या फ्री टेलिग्राम वापरत असाल तर पुढेसुद्धा पूर्वीप्रमाणेच टेलिग्रामच्या मोफत आवृत्तीचा वापर सुरू ठेऊ शकता. तुमच्या कोणत्याही फीचरला हात लावण्यात आलेला नाही.
जर तुम्हाला खाली उल्लेख असलेल्या अधिक सोयी हव्या असतील तरच तुम्हाला प्रीमियम प्लॅन घ्यावा लागेल.

ADVERTISEMENT

बऱ्याच न्यूज चॅनल्सनी पुन्हा एकदा क्लिकबेट बातम्या देत टेलिग्राम वापरयला पैसे द्यावे लागणार असं शीर्षक दिलं होतं मात्र तसं काहीही नाही. प्रीमियम प्लॅन ऐच्छिक असणार आहे.

  • 4GB Uploads : फ्री युजर्ससाठी असलेली 2GB साईज असलेली फाइल अपलोड करण्याची मर्यादा प्रीमियम युजर्ससाठी चक्क 4GB च्या फाइल साईजपर्यंत वाढवण्यात आली आहे! दोन्ही प्लॅनमध्ये अनलिमिटेड फ्री क्लाऊड स्टोरेज देण्यात आलं आहे.
  • Faster Downloads : प्रीमियम प्लॅन असलेले युजर्स फाइल्स अधिक वेगाने डाउनलोड करू शकतील!
  • दुप्पट लिमिट्स : प्रीमियम आवृत्ती मध्ये तुम्ही तब्बल १००० ग्रुप्स जॉइन करू शकता. २० चॅट फोल्डर्स ज्यामध्ये प्रत्येकी २०० चॅट्, १० Pinned चॅट्स, २० पब्लिक लिंक्स, ४०० GIFs सेव्ह करता येतील! फ्री प्लॅनच्या तुलनेत या सर्व मर्यादा दुपटीने वाढवून दिलेल्या आहेत!
  • खास स्टीकर्स : नव्या प्रीमियम स्टीकर्स सेक्शन मध्ये खास फुल स्क्रीन स्टीकर्स मिळतील जे कोणत्याही चॅटमध्ये वापरू शकता!
  • Unique Reactions : प्रीमियम ग्राहकांना अधिक रिएक्शन्स सुद्धा मिळतील
  • जाहिराती नाहीत : काही देशांमध्ये टेलिग्रामवर जाहिराती दाखवल्या जातात. जर तुम्ही हा प्रीमियम प्लॅन घेतला तर कसल्याही जाहिराती दिसणार नाहीत.
  • Verification Badges : बिझनेसेस/ब्रॅंडसना त्यांच्या अधिकृत चॅनल/चॅटला व्हेरीफाईड ब्ल्यु टिक मिळेल.

इतरही बऱ्याच सोयी देण्यात येतील ज्याबद्दल अधिक माहिती https://telegram.org/blog/700-million-and-premium या लिंकवर वाचू शकता.

भारतात ही प्रीमियम प्लॅन कधीपासून उपलब्ध होईल हे सांगितलेलं नाही. मात्र येत्या काही दिवसात हा प्लॅन ₹४६९ दरमहा या दराने भारतात उपलब्ध होईल अशी चर्चा आहे. अपडेटद्वारे हळूहळू इतर ठिकाणी हा प्लॅन उपलब्ध करून देण्यात येत आहे.

तसं पाहायला गेलं तर या नव्या सोयी पैसे देऊन वापरण्याइतकं वेगळेपण नक्कीच देत नाहीत त्यामुळे हे प्लॅन वापरण्याचं प्रमाण फार कमी असेल असं सध्यातरी दिसत आहे.

Search Terms : What is Telegram Premium Plans Features Price in India

Tags: AppsSocial MediaTelegram
ShareTweetSend
Previous Post

इंटरनेट एक्सप्लोरर ब्राऊजर आजपासून बंद होणार!

Next Post

Poco F4 5G भारतात सादर : SD870, AMOLED डिस्प्ले आणि किंमतही कमी!

Sooraj Bagal

Sooraj Bagal

Related Posts

Google Play Best Apps & Games of 2025

गूगल प्ले स्टोअरवरील २०२५ चे सर्वोत्तम ॲप्स, गेम्स जाहीर!

November 23, 2025
OpenAI Sora 2

OpenAI ने आणलं Sora 2 आणि AI व्हिडिओसाठी इंस्टाग्रामसारखं अ‍ॅप!

October 1, 2025
WhatsApp for iPad

व्हॉट्सॲप आता ॲपल आयपॅडवरसुद्धा उपलब्ध!

May 28, 2025
Instagran Edits App

इंस्टाग्रामचं नवं Edits ॲप : फोनवरच व्हिडिओ एडिट करा!

April 23, 2025
Next Post
Poco F4 5G

Poco F4 5G भारतात सादर : SD870, AMOLED डिस्प्ले आणि किंमतही कमी!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ADVERTISEMENT
Apple MacBook Neo

ॲपलचा सर्वात स्वस्त लॅपटॉप MacBook Neo सादर!

March 4, 2026
सॅमसंगचे Galaxy S26, S26+ आणि S26 Ultra सादर!

सॅमसंगचे Galaxy S26, S26+ आणि S26 Ultra सादर!

February 26, 2026
Anthropic AI Plugins IT Selloff

Anthropic च्या नव्या AI प्लगइन्समुळे जगभरात आयटी शेयर्स घसरले!

February 4, 2026
Adobe Express Premium FREE Airtel Offer

एयरटेलच्या सर्व ग्राहकांना ‘अडोबी एक्सप्रेस प्रीमियम’ मोफत!

January 29, 2026
MSRTC Timing Check Marathi

एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

September 25, 2012
Anthropic AI Plugins IT Selloff

Anthropic च्या नव्या AI प्लगइन्समुळे जगभरात आयटी शेयर्स घसरले!

February 4, 2026
सॅमसंगचे Galaxy S26, S26+ आणि S26 Ultra सादर!

सॅमसंगचे Galaxy S26, S26+ आणि S26 Ultra सादर!

February 26, 2026
ADVERTISEMENT
MarathiTech - मराठीटेक

तंत्रज्ञानाविषयी मराठी भाषेतली प्रसिद्ध वेबसाइट! नवं तंत्रज्ञान, नवनवे फोन्स, ॲप्स यांच्याबद्दल रंजक माहिती...

मराठीटेकला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा

Apple MacBook Neo

ॲपलचा सर्वात स्वस्त लॅपटॉप MacBook Neo सादर!

March 4, 2026
सॅमसंगचे Galaxy S26, S26+ आणि S26 Ultra सादर!

सॅमसंगचे Galaxy S26, S26+ आणि S26 Ultra सादर!

February 26, 2026

ॲपलचा सर्वात स्वस्त लॅपटॉप MacBook Neo सादर!

सॅमसंगचे Galaxy S26, S26+ आणि S26 Ultra सादर!

Anthropic च्या नव्या AI प्लगइन्समुळे जगभरात आयटी शेयर्स घसरले!

एयरटेलच्या सर्व ग्राहकांना ‘अडोबी एक्सप्रेस प्रीमियम’ मोफत!

अडोबी फोटोशॉप आता ChatGPT मध्ये उपलब्ध!

  • About
  • Advertise
  • Privacy Policy
  • Contact

© MarathiTech 2024 A Product by BagalTech

error: Content is protected!
No Result
View All Result
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • खास लेख
  • गेमिंग
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • शॉपिंग ऑफर्स
  • आमच्याबद्दल About Us
  • संपर्क – प्रतिक्रिया

© MarathiTech 2024 A Product by BagalTech