गूगलने त्यांच्या लोकप्रिय मेलिंग सेवेचं नवं रूप कालपासून सर्वांसाठी उपलब्ध करून देण्यात सुरुवात केली आहे. मुख्य जीमेल (Gmail) साठी देण्यात आलेल्या नव्या डिझाईनसोबत गूगल वर्कस्पेसमधील मेलसोबत चॅट, स्पेसेस, मीट अशा सेवा आता एका क्लिकवर सहज वापरता येतील अशा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
गेल्या १८ वर्षात गूगलच्या जीमेलचं डिझाईन बरंच बदललं असून हे दर्शवणारा व्हिडिओसुद्धा त्यांनी अपलोड केला आहे. ज्याना नवं डिझाईन हवं आहे त्यांना ते दिसेल जर तुम्हाला जुनंच डिझाईन हवं असेल तर तसाही पर्याय देण्यात आला आहे.
या नव्या बदलांबद्दल आणखी माहिती हवी असल्यास गूगलचा https://blog.google/products/gmail/gmail-design-update लेख पहा.