MarathiTech - मराठीटेक
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
MarathiTech - मराठीटेक
No Result
View All Result
Home ॲप्स

व्हॉट्सॲप कम्युनिटी उपलब्ध : कम्युनिटी आणि ग्रुपमध्ये फरक काय ?

Sooraj Bagal by Sooraj Bagal
November 12, 2022
in ॲप्स
What Is WhatsApp Community Marathi

व्हॉट्सॲपने गेल्या काही दिवसात त्यांची नवी सोय WhatsApp Communities उपलब्ध करून देण्यात सुरुवात केली आहे. यामध्ये तुम्ही २० ग्रुप्स एकत्र करून एक कम्युनिटी बनवू शकता. या कम्युनिटीचा वापर अनेक ग्रुप एकत्र करून त्यांचं नियंत्रण करणं यासाठी होऊ शकेल. शाळा, परिसर, कामाच्या ठिकाणी ही सोय उपयोगी पडेल. ग्रुप्समध्ये आणि कम्युनिटीमध्ये घोषणा/Announcements जाहीर करण्यासाठी वापर करता येईल.

अनेकांना ही सोय ग्रुप प्रमाणेच वाटत असल्याचं सोशल मीडियावर सांगितल्याने व्हॉट्सॲपने स्वतः याबद्दल एक ट्विटकरून माहिती दिली आहे ही दोन्हीमध्ये नेमका काय फरक असणार आहे.

ADVERTISEMENT

व्हॉट्सॲप ग्रुप्स (WhatsApp Group)

  • एका ग्रुपमध्ये अनेकजण संभाषणासाठी सहभागी होऊ शकतात
  • मित्र मैत्रिणी, नातेवाईक, शाळेतील विद्यार्थी, ऑफिसमधील कर्मचारी यांचा स्वतंत्र ग्रुप असू शकतो.
  • सध्या एका ग्रुपमध्ये ५१२ जण सहभागी होऊ शकतात. लवकरच ही मर्यादा १०२४ करण्यात येईल!

व्हॉट्सॲप कम्युनिटी (WhatsApp Community)

  • एका कम्युनिटीमध्ये अनेक ग्रुप्स असतील
  • आता जर तुमचा शाळेचा ग्रुप असेल तर प्रत्येक वर्गाचा स्वतंत्र ग्रुप असतो. त्यासाठी शाळेची कम्युनिटी आणि वर्गांचे ग्रुप्स त्यामध्ये जोडता येतील.
  • सध्या एका कम्युनिटीमध्ये २० ग्रुप्स एकत्र जोडता येतात.
  • कम्युनिटी अनेक ग्रुप्सना एकत्र आणण्यासाठी तयार करू शकता.
Communities ची उदाहरणे

शाळेचं उदाहरण घ्यायचं तर शाळेतले ९अ, ९ब, ९क, १०अ, १०ब, १०क असे सहा वर्ग असतील तर त्या त्या वर्गांचे सहा ग्रुप असतील ज्यामध्ये त्या त्या वर्गांची माहिती/अपडेट्स मिळतात. पण जर तुम्हाला सर्व ग्रुप्समध्ये एकच सूचना पाठवायची असेल तर त्यासाठी तुम्ही कम्युनिटीचा वापर करू शकता. या कम्युनिटीला शाळेचं नाव देऊन त्यामध्ये वरील सहा ग्रुप जोडायचे.

असाच वापर आपल्या अपार्टमेंटमध्ये Wing असतात त्यांचा स्वतंत्र ग्रुप असेल तर त्यांची पूर्ण एक कम्युनिटी बनवून सर्वांना एकतर सूचना देता येतील.

ऑफिसेसमध्येही अशाच प्रकारे त्या त्या विभागाचे स्वतंत्र ग्रुप करून त्यांची एक कम्युनिटी करायची आणि मग सर्वाना एकत्र सांगायच्या सूचना कम्युनिटीमध्ये आणि स्वतंत्र विभागाच्या सूचना ग्रुपमध्ये सांगता येतील जेणेकरून संबंध नसलेल्या लोकांना इतर विभागाच्या ग्रुपचे मेसेज येणार नाहीत.

या सोबत व्हॉट्सॲपने अलीकडे इतरही बऱ्याच सोयी जोडल्या आहेत उदा.

  • व्हिडिओ कॉलमध्ये आता ३२ जण सहभागी होऊ शकतात
  • ग्रुपमध्ये १०२४ जण सहभागी होऊ शकतील.
  • चॅटमध्ये मत जाणून घेण्यासाठी Poll घेण्याचाही पर्याय येतोय
  • 2GB पर्यंत साईजची फाइल पाठवता येणार
  • Admin ला सदस्यांचेही मेसेज डिलिट करता येतील.

The difference between Communities and groups, explained 👇 pic.twitter.com/86MbKtY9Nv

— WhatsApp (@WhatsApp) November 10, 2022

Via: WhatsApp Communities
Tags: AppsCommunityWhatsApp
ShareTweetSend
Previous Post

आयफोनवर मराठी टायपिंग करणं आता सोपं झालंय!

Next Post

MrBeast आता सर्वाधिक सबस्क्रायबर्स असलेला यूट्यूबर : PewDiePie ला मागे टाकलं!

Sooraj Bagal

Sooraj Bagal

Related Posts

WhatsApp for iPad

व्हॉट्सॲप आता ॲपल आयपॅडवरसुद्धा उपलब्ध!

May 28, 2025
Instagran Edits App

इंस्टाग्रामचं नवं Edits ॲप : फोनवरच व्हिडिओ एडिट करा!

April 23, 2025
गूगल प्लेवर २०२४ मधील सर्वोत्तम ॲप्स, गेम्स जाहीर!

ॲपल ॲप स्टोअरवरील २०२४ चे सर्वोत्तम ॲप्स व गेम्स अवार्ड्स जाहीर!

December 12, 2024
Best of 2024 Play Store

गूगल प्लेवर २०२४ मधील सर्वोत्तम ॲप्स, गेम्स जाहीर!

December 12, 2024
Next Post
MrBeast Most Subscribed

MrBeast आता सर्वाधिक सबस्क्रायबर्स असलेला यूट्यूबर : PewDiePie ला मागे टाकलं!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ADVERTISEMENT
WWDC 2025 Marathi

ॲपल WWDC25 : iOS 26, macOS 26 व Liquid Glass डिझाईन जाहीर!

June 10, 2025
गूगल I/O 2025: एआय आणि गूगलच्या सेवांमधील स्मार्ट तंत्रज्ञान

गूगल I/O 2025: एआय आणि गूगलच्या सेवांमधील स्मार्ट तंत्रज्ञान

May 29, 2025
WhatsApp for iPad

व्हॉट्सॲप आता ॲपल आयपॅडवरसुद्धा उपलब्ध!

May 28, 2025
Instagran Edits App

इंस्टाग्रामचं नवं Edits ॲप : फोनवरच व्हिडिओ एडिट करा!

April 23, 2025
MSRTC Timing Check Marathi

एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

September 25, 2012
यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

November 4, 2016
WWDC 2025 Marathi

ॲपल WWDC25 : iOS 26, macOS 26 व Liquid Glass डिझाईन जाहीर!

June 10, 2025
ADVERTISEMENT
MarathiTech - मराठीटेक

तंत्रज्ञानाविषयी मराठी भाषेतली प्रसिद्ध वेबसाइट! नवं तंत्रज्ञान, नवनवे फोन्स, ॲप्स यांच्याबद्दल रंजक माहिती...

मराठीटेकला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा

WWDC 2025 Marathi

ॲपल WWDC25 : iOS 26, macOS 26 व Liquid Glass डिझाईन जाहीर!

June 10, 2025
गूगल I/O 2025: एआय आणि गूगलच्या सेवांमधील स्मार्ट तंत्रज्ञान

गूगल I/O 2025: एआय आणि गूगलच्या सेवांमधील स्मार्ट तंत्रज्ञान

May 29, 2025

ॲपल WWDC25 : iOS 26, macOS 26 व Liquid Glass डिझाईन जाहीर!

गूगल I/O 2025: एआय आणि गूगलच्या सेवांमधील स्मार्ट तंत्रज्ञान

व्हॉट्सॲप आता ॲपल आयपॅडवरसुद्धा उपलब्ध!

इंस्टाग्रामचं नवं Edits ॲप : फोनवरच व्हिडिओ एडिट करा!

OpenAI चं 4o इमेज जनरेशन : सोशल मीडियावर Ghibli आर्टची लोकप्रियता

  • About
  • Advertise
  • Privacy Policy
  • Contact

© MarathiTech 2024 A Product by BagalTech

error: Content is protected!
No Result
View All Result
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • खास लेख
  • गेमिंग
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • शॉपिंग ऑफर्स
  • आमच्याबद्दल About Us
  • संपर्क – प्रतिक्रिया

© MarathiTech 2024 A Product by BagalTech