ॲपलच्या काल WWDC या त्यांच्या डेव्हलपर्ससाठी असलेल्या कार्यक्रमात अनेक नव्या गोष्टी जाहीर केल्या असून iOS 17, macOS Sonoma, watchOS 10, iPadOS 17 अशा ओएस अपडेट्स जाहीर झाल्या आहेत. यासोबत नवीन १५.३” डिस्प्ले असलेला मॅकबुक एयर, नवा M2 Ultra प्रोसेसर, नवे मॅक स्टुडिओ आणि मॅक प्रो आणि सर्वाधिक चर्चा सुरू असलेला VR हेडसेट Apple Vision Pro सुद्धा सादर करण्यात आला आहे.
iOS 17
ADVERTISEMENT
- Contact Posters : प्रत्येक कॉनटॅक्टसाठी आता खास नव्या डिझाईनमध्ये पोस्टर्स लावता येतील त्यासाठी फॉन्ट, कलर्स सर्वकाही निवड करता येईल.
- Journal App : ॲपलने नवं जर्नल नावाचं ॲप जाहीर केलं असून हे रोजनिशी प्रमाणे काम करेल. यामध्ये तुम्हाला मशीन लर्निंगचा वापर करून नोंदी ठेवण्यासाठी सजेशन्स दिलेले दिसतील. त्यासाठी तुमच्या फोटो, पीपल, प्लेसेस, वर्कआउट्सचा संदर्भ घेतलेला दिसेल. यामध्ये आपल्या दैनंदिन आयुष्यात सकारात्मक बदल करण्यास मदत होईल असा त्यांचा उद्देश आहे!
- StandBy : या मोडमध्ये गेल्यावर तुम्हाला मोठं घडयाळ दिसत राहील आणि सोबत तुम्ही कॅलेंडर, फोटो, गाणी, हवामान असं तुमच्या आवडीनुसार काहीही तिथे लावून ठेऊ शकाल!
- AirDrop and NameDrop : AirDrop या फाइल शेयरिंगच्या पद्धतीतसुद्धा आता अनेक बदल करण्यात आले असून तुमची कॉनटॅक्ट माहिती शेयर करण्यासाठी फक्त तुम्हाला तुमचा आयफोन समोरच्या आयफोन जवळ न्यायचा आहे आणि तुम्हाला स्क्रीनवर NameDrop द्वारे शेयर करण्याचा पर्याय मिळेल!
- Live Voicemail : याद्वारे एखादा वॉइसमेल आला तर तू वाचून दाखवला जाईल.
- FaceTime : फेसटाइममध्ये आता ऑडिओ आणि व्हिडिओ मेसेजेस सुद्धा पाठण्याची सोय मिळेल. कॉलवर समोरची व्यक्ती उपलब्ध नसेल तर त्यांना हे मेसेज पाठवता येतील.
- मेसेजस : मेसेजेसमध्ये आता लाईव्ह स्टीकर्स तयार करता येतील. सोबतच सर्च, रीप्लायमध्येही अनेक नवे पर्याय मिळतील.
iPadOS 17
- Lock Screen : आयफोनवरील लॉकस्क्रीन वॉलपेपरची सोय आता आयपॅडवर मिळणार.
- Widgets : आता विजेट्स सोबत अॅक्शन करण्यासाठी ते ॲप उघडावं लागणार नाही. विजेटवरच तुम्ही बऱ्याच गोष्टी करू शकाल. उदा. चेकलिस्ट मध्ये टिक करणे, गाणी नियंत्रित करणे, इ.
- PDFs : पीडीएफ फाइल्समधील फील्ड पाहण्यासाठी आता मशीन लर्निंगचा वापर करून सूचना देण्यात येतील
- Health : हेल्थ ॲप आता आयपॅडवरसुद्धा मिळणार आहे.
macOS Sonoma
- Interactive Widgets : आता macOS मध्येही फोनप्रमाणे विजेट्स मिळणार आहत. घडयाळ, हवामान, कंट्रोल शॉर्टकट्स सर्वकाही
- Video Conferencing : व्हिडिओ कॉल्ससाठी आता खास नव्या सोयी जोडण्यात आल्या आहेत. नवे फिल्टर्स, स्क्रीन शेयरिंग फीचर्स, कंटेंट शेयरिंग
- Safari : सफारी या ब्राऊजरमध्येही आता सुरक्षा आणि गोपनियतेसाठी नवे पर्याय दिले आहेत.
- नवे स्क्रीन सेव्हर्स
- गेमिंगसाठी खास नवे पर्याय Game Mode