रिलायन्स जियोने आज त्यांचा नवा फीचर फोन सादर केला असून यामध्ये 4G नेटवर्क, जियो पे द्वारे UPI, कॅमेरा, जियो सिनेमा, जियो सावन असे ॲप्स, FM Radio अशा सोयी दिलेल्या आहेत. या फोनसाठी त्यांनी Karbonn या एकेकाळी लोकप्रिय असलेल्या भारतीय फोन कंपनीसोबत भागीदारी केली आहे. हा फोन निळ्या आणि लाल रंगात मिळेल. लाल रंगाच्या फोनमागे कार्बनचं ब्रँडिंग आहे.
या फोनची किंमत ९९९ असून यासाठी खास कॉलिंग व डेटा प्लॅन्ससुद्धा आले आहेत. दोन्ही प्लॅन्समध्ये अमर्यादीत मोफत कॉल्स करता येतील! हा फोन ७ जुलै २०२३ पासून खरेदीसाठी दुकानांमध्ये उपलब्ध होईल.
- दरमहा ₹१२३ : दररोज 0.5GB = 14GB डेटा (२८ दिवसांसाठी)
- वार्षिक ₹१२३४ : दररोज 0.5GB = 168GB डेटा (३३६ दिवसांसाठी)
या वेळी त्यांनी त्यांचा Jio Bharat Platform आणत असल्याचंही जाहीर केलं असून यामध्ये आणखी स्मार्टफोन निर्माण करणाऱ्या कंपन्या सहभागी होऊ शकतात आणि त्यांचे Jio Bharat फोन्स सादर करू शकतात! सध्या कार्बन कंपनीचाच फोन या अंतर्गत मिळत आहे.