MarathiTech - मराठीटेक
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
MarathiTech - मराठीटेक
No Result
View All Result
Home स्मार्टफोन्स

Nothing कंपनीचा पहिला Nothing Phone (1) सादर : नवं पारदर्शक डिझाईन!

Sooraj Bagal by Sooraj Bagal
July 12, 2022
in स्मार्टफोन्स
Nothing Phone 1

वनप्लसचा संस्थापक असलेल्या Carl Pei याने वनप्लसमधून बाहेर पडून UK मध्ये आता स्वतःची कंपनी सुरू केली असून या कंपनीचं नाव नथिंग (Nothing) असं आहे. गेले अनेक दिवस सोशल मीडियावर चर्चा सुरू असलेला हा फोन आज सादर झाला आहे. या फोनची निर्मिती भारतातच केली जाणार आहे.

या कंपनीने यापूर्वी ear (1) इयरफोन्ससुद्धा आणले आहेत जे बरेच लोकप्रिय झाले होते. वनप्लसला स्टॉक अँड्रॉईड आणि मध्यम किंमत अशा फोन्समुळे प्रसिद्धी मिळाली होती. मात्र गेले काही महीने त्यांनी त्यांची मालकी असलेल्या BBK Electronics ची दुसरी कंपनी ओप्पोचेच फोन्स आणि ऑपरेटिंग सिस्टम वनप्लसमध्ये देण्यास सुरुवात केली आणि आता ग्राहकांना नव्या वनप्लसची गरज भासू लागली त्यासाठीच या नव्या कंपनीने हा फोन आणला आहे असं सांगितलं जातं.

ADVERTISEMENT

Nothing Phone (1) मध्ये 6.55″ FHD+ OLED डिस्प्ले, Snapdragon 778G+ प्रोसेसर, 50MP+50MP कॅमेरा, 16MP सेल्फी कॅमेरा, 4500mAh बॅटरी देण्यात आली आहे. याची मागची बाजू पारदर्शक असून यामध्ये खास Glyph डिझाईन असलेल्या लाइट्सचा समावेश आहे! हा Glyph Interface च या फोनला सध्याच्या इतर फोन्सपेक्षा वेगळं बनवतो. आता बाकी कॅमेरा, प्रोसेसरच कामगिरी येत्या काही दिवसात समजेलच.

डिस्प्ले : 6.55″ FHD+ OLED display 120Hz refresh rate, HDR10+
प्रोसेसर : Snapdragon 778G+
रॅम : 8GB/12GB
कॅमेरा : 50MP IMX766 + 50MP JN1 OIS+EIS
फ्रंट कॅमेरा : 16MP IMX471
बॅटरी : 4500mAh 45 watt wired, 15W wireless, 5W reverse चार्जिंग
ऑपरेटिंग सिस्टम : Android 12 Nothing OS
इतर : In-display fingerprint scanner, 5G, Bluetooth 5.2, 12 5G bands, NFC, IP53 water resistance
किंमत :
8GB+128GB ₹32,999
8GB+256GB ₹35,999
12GB+256GB ₹38,999

मर्यादित कालावधीसाठी याची किंमत ₹31,999 (8GB+128GB), ₹34,999 (8GB+256GB), ₹37,999 (12GB+256GB) अशी असणार आहे.

या फोनचा 45W चार्जर बॉक्समध्ये देण्यात आलेला नाही. याची किंमत यांनी चक्क रु २४९९ ठेवली असू प्रिऑर्डर केलेल्या ग्राहकांना हा चार्जर १४९९ रुपयात मिळेल. या फोनची कंपनी Case १४९९ आणि स्क्रीन प्रोटेक्टर ९९९ रुपयांना मिळेल. या फोनशिवाय इतर गोष्टींची किंमती मात्र बऱ्याच जास्त ठेवल्या आहेत!

Tags: NothingSmartphones
ShareTweetSend
Previous Post

Moto G42 भारतात सादर : AMOLED डिस्प्ले, 50MP कॅमेरा!

Next Post

गूगलची ChromeOS Flex जुन्या लॅपटॉप्स, पीसीसाठीही उपलब्ध!

Sooraj Bagal

Sooraj Bagal

Related Posts

सॅमसंगचे Galaxy Fold7, Flip7 आणि Flip7 FE सादर!

सॅमसंगचे Galaxy Fold7, Flip7 आणि Flip7 FE सादर!

July 10, 2025
Moto g96

मोटोचा Moto g96 भारतात सादर!

July 10, 2025
OnePlus Nord 5 Nord CE 5

वनप्लसचे Nord 5 आणि Nord CE 5 भारतात सादर!

July 8, 2025
Nothing कंपनीचा Phone (3) सादर : विचित्र डिझाईनचा फ्लॅगशिप फोन!

Nothing कंपनीचा Phone (3) सादर : विचित्र डिझाईनचा फ्लॅगशिप फोन!

July 1, 2025
Next Post
Chrome OS Flex

गूगलची ChromeOS Flex जुन्या लॅपटॉप्स, पीसीसाठीही उपलब्ध!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ADVERTISEMENT
ChatGPT India Plans Whats Included

ChatGPT चा खास भारतीयांसाठी नवा स्वस्त प्लॅन : ChatGPT Go

August 19, 2025
Perplexity Pro Airtel Offer

एयरटेलच्या सर्व ग्राहकांना Perplexity Pro AI वर्षभर मोफत!

July 18, 2025
Google Gemini AI Pro Free Offer

गूगलची विद्यार्थ्यांसाठी ऑफर : Gemini AI Pro + 2TB स्टोरेज एक वर्ष मोफत!

July 17, 2025
सॅमसंगचे Galaxy Fold7, Flip7 आणि Flip7 FE सादर!

सॅमसंगचे Galaxy Fold7, Flip7 आणि Flip7 FE सादर!

July 10, 2025
MSRTC Timing Check Marathi

एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

September 25, 2012
मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

September 10, 2012
Windows 10 Marathi Typing

विंडोज १० वर आता मराठी टायपिंगसाठी स्मार्ट फोनेटिक कीबोर्ड!

June 18, 2019
ADVERTISEMENT
MarathiTech - मराठीटेक

तंत्रज्ञानाविषयी मराठी भाषेतली प्रसिद्ध वेबसाइट! नवं तंत्रज्ञान, नवनवे फोन्स, ॲप्स यांच्याबद्दल रंजक माहिती...

मराठीटेकला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा

ChatGPT India Plans Whats Included

ChatGPT चा खास भारतीयांसाठी नवा स्वस्त प्लॅन : ChatGPT Go

August 19, 2025
Perplexity Pro Airtel Offer

एयरटेलच्या सर्व ग्राहकांना Perplexity Pro AI वर्षभर मोफत!

July 18, 2025

ChatGPT चा खास भारतीयांसाठी नवा स्वस्त प्लॅन : ChatGPT Go

एयरटेलच्या सर्व ग्राहकांना Perplexity Pro AI वर्षभर मोफत!

गूगलची विद्यार्थ्यांसाठी ऑफर : Gemini AI Pro + 2TB स्टोरेज एक वर्ष मोफत!

सॅमसंगचे Galaxy Fold7, Flip7 आणि Flip7 FE सादर!

मोटोचा Moto g96 भारतात सादर!

  • About
  • Advertise
  • Privacy Policy
  • Contact

© MarathiTech 2024 A Product by BagalTech

error: Content is protected!
No Result
View All Result
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • खास लेख
  • गेमिंग
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • शॉपिंग ऑफर्स
  • आमच्याबद्दल About Us
  • संपर्क – प्रतिक्रिया

© MarathiTech 2024 A Product by BagalTech