MarathiTech - मराठीटेक
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
MarathiTech - मराठीटेक
No Result
View All Result
Home eCommerce

लॅपटॉप, टॅब्लेट, कॉम्प्युटर्सच्या आयातीवर भारत सरकारचे निर्बंध!

Sooraj Bagal by Sooraj Bagal
August 3, 2023
in eCommerce, कॉम्प्युटर्स

आज भारतात सरकारने HSN8741 प्रकारची उत्पादनांच्या (लॅपटॉप्स, टॅब्लेट्स आणि कॉम्प्युटर्स) आयातीवर (Import) निर्बंध लागू करणार असल्याचं सांगितलं असून हे निर्बंध आजपासूनच अंमलात येणार आहेत. मर्यादित संख्येत ठराविक आयातीना अधिकृत परवाना घेऊन परवानगी देता येऊ शकते असंही सांगितलं आहे.

सरकारच्या विदेश व्यापार महानिर्देशनालय अर्थात DGFT (Directorate General of Foreign Trade) ने जाहीर केलेल्या पत्रकामध्ये याबाबत माहिती दिलेली आहे.

ADVERTISEMENT
  • रिसर्च आणि डेव्हलपमेंट, टेस्टिंग, चाचण्या करण्यासाठी जर लॅपटॉप्स आयात केले जात असतील तर त्यांना एकावेळी २० वस्तू मागवण्याची सूट आहे. मात्र या वस्तूंचा वापर त्याच गोष्टींसाठी करावा आणि त्या वस्तू नंतर विकू नयेत. वापर झाल्यावर त्यांना वापरता येणार नाही अशा प्रकारे नष्ट करावं लागेल.
  • १ ऑल इन वन कॉम्प्युटर किंवा अल्ट्रा स्मॉल फॉर्म फॅक्टर कॉम्प्युटर इ कॉमर्ससाईट्सवरून पोस्ट किंवा कुरियर मार्फत मागवण्याची मुभा देण्यात आली आहे. यासाठीचं आयात शुल्क मात्र भरावं लागेल.
  • हे नवे निर्बंध Baggage Rules अंतर्गत आयातीवर लागू होणार नाहीत.

भारतातील लॅपटॉप्स, कॉम्प्युटर निर्मिती वाढावी या उद्देशानं हे पाऊल उचललं असल्याचं मीडियामार्फत सांगितलं जात आहे. खरंतर गेल्यावर्षीच्या तुलनेत या तीन प्रकारच्या वस्तूंच्या आयतीमध्ये ६.२५ टक्के वाढ झाली होती. एप्रिल ते जून महिन्यातील वस्तू 19.7 बिलियन डॉलर्सच्या किंमतीची आयात झाली आहे.

आता एचपी, लेनेवो, एसर, डेल, एसुस अशा ब्रॅंड्सना भारतातच त्यांच्या लॅपटॉप्स/कॉम्प्युटर्सची निर्मिती करावी लागेल. सध्या या कंपन्या चीनमधून आयात करण्यावर भर देतात. त्या ऐवजी भारतातच निर्मिती केंद्रे उभारावी लागतील. मात्र हे सर्व लगेचच उभं करणं शक्य नाही आणि त्यात हे निर्बंधसुद्धा लगेच लागू झाले आहेत. यामुळे अशा वस्तूंच्या किंमती कदाचित काही काळाने वाढत जाऊ शकतात.

अपडेट ०४-०८-२०२३ : सरकारतर्फे आता नव्याने स्पष्टीकरण देण्यात आलं असून हे निर्बंध लगेचच लागू करण्याऐवजी आता नवे निर्बंध टप्प्याटप्प्याने लागू होणार आहेत जेणेकरून हा बदल करून व्यवस्था तयार करण्यास लॅपटॉप/पीसी कंपन्याना वेळ मिळेल.

Tags: ComputersDGFTGovernmentImportLaptops
ShareTweetSend
Previous Post

सॅमसंग Galaxy Z Fold5, Z Flip5 सादर : सोबत Watch6, Tab S9 सुद्धा!

Next Post

मेटाचं टेक्स्टवरून संगीत तयार करणारं AudioCraft AI उपलब्ध!

Sooraj Bagal

Sooraj Bagal

Related Posts

ॲपलचे M3 प्रोसेसर आधारित MacBook Pro आणि iMac सादर!

ॲपलचे M3 प्रोसेसर आधारित MacBook Pro आणि iMac सादर!

October 31, 2023
Data Protection Bill

डिजिटल वैयक्तिक माहिती संरक्षण विधेयक संसदेत मंजूर

August 10, 2023
Apple MacBook Air Mac Studio Mac Pro

ॲपलचे नवे मॅकबुक एयर, मॅक स्टुडिओ, मॅक प्रो व M2 Ultra जाहीर!

June 6, 2023
Global UA Day : आयटी मंत्रालयातर्फे कार्यक्रम : मराठीटेकचाही सहभाग!

Global UA Day : आयटी मंत्रालयातर्फे कार्यक्रम : मराठीटेकचाही सहभाग!

March 29, 2023
Next Post
मेटाचं टेक्स्टवरून संगीत तयार करणारं AudioCraft AI उपलब्ध!

मेटाचं टेक्स्टवरून संगीत तयार करणारं AudioCraft AI उपलब्ध!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ADVERTISEMENT
सॅमसंगचे Galaxy S26, S26+ आणि S26 Ultra सादर!

सॅमसंगचे Galaxy S26, S26+ आणि S26 Ultra सादर!

February 26, 2026
Anthropic AI Plugins IT Selloff

Anthropic च्या नव्या AI प्लगइन्समुळे जगभरात आयटी शेयर्स घसरले!

February 4, 2026
Adobe Express Premium FREE Airtel Offer

एयरटेलच्या सर्व ग्राहकांना ‘अडोबी एक्सप्रेस प्रीमियम’ मोफत!

January 29, 2026
अडोबी फोटोशॉप आता ChatGPT मध्ये उपलब्ध!

अडोबी फोटोशॉप आता ChatGPT मध्ये उपलब्ध!

December 11, 2025
MSRTC Timing Check Marathi

एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

September 25, 2012
Adobe Express Premium FREE Airtel Offer

एयरटेलच्या सर्व ग्राहकांना ‘अडोबी एक्सप्रेस प्रीमियम’ मोफत!

January 29, 2026
Anthropic AI Plugins IT Selloff

Anthropic च्या नव्या AI प्लगइन्समुळे जगभरात आयटी शेयर्स घसरले!

February 4, 2026
ADVERTISEMENT
MarathiTech - मराठीटेक

तंत्रज्ञानाविषयी मराठी भाषेतली प्रसिद्ध वेबसाइट! नवं तंत्रज्ञान, नवनवे फोन्स, ॲप्स यांच्याबद्दल रंजक माहिती...

मराठीटेकला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा

सॅमसंगचे Galaxy S26, S26+ आणि S26 Ultra सादर!

सॅमसंगचे Galaxy S26, S26+ आणि S26 Ultra सादर!

February 26, 2026
Anthropic AI Plugins IT Selloff

Anthropic च्या नव्या AI प्लगइन्समुळे जगभरात आयटी शेयर्स घसरले!

February 4, 2026

सॅमसंगचे Galaxy S26, S26+ आणि S26 Ultra सादर!

Anthropic च्या नव्या AI प्लगइन्समुळे जगभरात आयटी शेयर्स घसरले!

एयरटेलच्या सर्व ग्राहकांना ‘अडोबी एक्सप्रेस प्रीमियम’ मोफत!

अडोबी फोटोशॉप आता ChatGPT मध्ये उपलब्ध!

गूगल इयर इन सर्च : भारतीयांनी २०२५ मध्ये गूगलवर ‘काय’ शोधलं?

  • About
  • Advertise
  • Privacy Policy
  • Contact

© MarathiTech 2024 A Product by BagalTech

error: Content is protected!
No Result
View All Result
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • खास लेख
  • गेमिंग
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • शॉपिंग ऑफर्स
  • आमच्याबद्दल About Us
  • संपर्क – प्रतिक्रिया

© MarathiTech 2024 A Product by BagalTech