MarathiTech - मराठीटेक
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
MarathiTech - मराठीटेक
No Result
View All Result
Home टेलिकॉम

जिओ, एयरटेल आणि Vi ने त्यांच्या प्लॅन्सच्या किंमती वाढवल्या!

Sooraj Bagal by Sooraj Bagal
June 28, 2024
in टेलिकॉम
Jio Airtel New Plans

काल रिलायन्स जिओ आणि आज लगेचच एयरटेलने सुद्धा त्यांच्या प्रिपेड प्लॅन्सच्या किंमतीमध्ये जवळपास १२ ते २५% वाढ केली आहे! कदाचित Vi सुद्धा नवीन प्लॅन्स लवकरच जाहीर करेल. जरी किंमती वाढल्या असल्या तरी या प्लॅन्समध्ये मिळणारा डेटा आणि व्हॅलिडिटी यामध्ये कोणताही बदल झालेला नाही. दोन्ही कंपन्यांचे प्लॅन्स ३ जुलै २०२४ पासून लागू होतील. प्रिपेडसोबत काही पोस्टपेड प्लॅन्सच्याही किंमती वाढवल्या आहेत.

नेटवर्क टेक्नॉलजी आणि त्यासाठी लागणारी गुंतवणूक यानुसार एक यशस्वी बिझनेस मॉडेल सुरू ठेवण्यासाठी आम्हाला हे बदल करावे लागत आहेत असं एयरटेलने सांगितलं आहे. ARPU (Avarage Revenue Per User) म्हणजेच प्रत्येक ग्राहकाकडून मिळणारं सरासरी उत्पन्न ३०० च्या वर असावं असं त्यांचं म्हणणं आहे!

ADVERTISEMENT

जिओचे सर्व नवे प्लॅन्स तुम्ही खालील इमेजमध्ये पाहू शकता. २०९ चा 1GB/Day २८ दिवसांसाठीचा प्लॅन आता २४९ रुपये करण्यात आला आहे. २९९ चा 2GB/Day २८ दिवसांसाठीचा प्लॅन आता ३४९ रुपये करण्यात आला आहे. जिओचे रु. ३९५ आणि रु. १५५९ चा प्लॅन आता रीचार्ज करण्यास उपलब्ध नाहीत असंही दिसून येत आहे!

मोफत अनलिमिटेड 5G सुद्धा आता फक्त 2GB/Day किंवा त्यावरील प्लॅन्सवरच वापरता येणार आहे! प्रिपेडसोबत काही पोस्टपेड प्लॅन्सच्याही किंमती वाढवल्या आहेत.

Jio New Plans 5G

तुम्ही ३ जुलै पूर्वी जिओचा रीचार्ज करून ठेवणार असाल तर खालील गोष्टी लक्षात ठेवा.

  • जिओला तुम्ही तुमचा सध्याचा रीचार्ज कोणताही असेल तरीही जुन्या किंमतीचा कोणताही प्लॅन आधीच रीचार्ज करून ठेवण्यासाठी निवडू शकता.
  • शक्यतो हे रीचार्ज MyJio App वरच करा.
  • तुम्ही जास्तीत जास्त ५० रीचार्ज करून ठेवू शकता. (अर्थात इतके रीचार्ज करून ठेवण्याची गरज नाहीच पण किमान वर्ष भराचे रीचार्ज करून ठेवा)
  • रीचार्ज आत्ताच करून ठेवले तर तुमचे वर्षाला जवळपास ६०० रु वाचू शकतील!

एयरटेलनेसुद्धा त्यांचे नवे प्लॅन्स लगेच जाहीर केले असून त्यांचा २६५ चा 1GB/Day २८ दिवसांसाठीचा प्लॅन आता २९९ रुपये करण्यात आला आहे. इतर प्लॅन्स खालील इमेजमध्ये पाहू शकता.

Airtel New Plans 5G

तुम्ही ३ जुलै पूर्वी एयरटेलचा रीचार्ज करून ठेवणार असाल तर खालील गोष्टी लक्षात ठेवा.

  • तुम्ही सध्या सुरू असलेल्या प्लॅनच पुढे सुरू ठेवू शकता. सध्या सुरू असलेल्या प्लॅनचाच रीचार्ज केला तरच तो stack होईल म्हणजेच त्याची व्हॅलिडिटी पुढे वाढेल.
  • पुढे सुरू ठेवण्यासाठी रीचार्जची व्हॅलिडिटी जास्तीतजास्त ७३० दिवस असेल तरच ती पुढे सुरू राहील.
  • you can stack up your recharge upto 730 days with the condition of recharge should be done with same nature of the plan.
  • जर तुम्ही सध्या सुरू असलेला प्लॅन सोडून दुसऱ्या किंमतीचा रीचार्ज केला तर तो पुढे सुरू राहणार नसून तो प्लॅन लगेच अॅक्टिवेट होईल (तुमच्या जुन्या प्लॅनची व्हॅलिडिटी शिल्लक असेल तरीही तो लगेच बंद होईल.)
Vi New Plans

नवे प्लॅन्स ३ जुलैपासून लागू होणार असल्यामुळे ३ जुलैच्या आत तुम्ही जुन्या किंमतीत रीचार्ज करून ठेऊ शकता. त्यासाठी Jio Prepaid Plans ह्या लिंकवर आणि एयरटेलचे Airtel Prepaid Plans वर जाऊन तपासून पहा आणि मग रीचार्ज करा.

बरेच महिने स्वस्तात इंटरनेट आणि मोफत कॉलिंग देऊन सवय लावली आणि आता एकाधिकारशाही प्रमाणे या मोजक्या दोन तीन कंपन्या किंमती वाढवत आहेत अशी प्रतिक्रिया सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे तुम्हाला जर फक्त कॉलिंगसाठी प्लॅन्स हवे असतील तर ते आता उपलब्ध नाहीतच. तुम्हाला इंटरनेट डेटा असलेलेच प्लॅन्स घ्यावे लागतात. ज्यांचा तसा काहीच वापर नाही त्यांनासुद्धा असे जास्त किंमतीचे रीचार्ज करण्याशिवाय पर्याय उरणार नाही.

Tags: AirtelJioPlansTelecom
ShareTweetSend
Previous Post

Nvidia आता मायक्रोसॉफ्ट व ॲपलला मागे टाकत जगातली सर्वात मोठी कंपनी!

Next Post

सॅमसंग Galaxy Z Fold6, Flip6 सादर : सोबत Watch Ultra, Galaxy Ring

Sooraj Bagal

Sooraj Bagal

Related Posts

Perplexity Pro Airtel Offer

एयरटेलच्या सर्व ग्राहकांना Perplexity Pro AI वर्षभर मोफत!

July 18, 2025
डिज्नी + हॉटस्टार आता जियो हॉटस्टार : JioTele OS चे टीव्ही येणार!

डिज्नी + हॉटस्टार आता जियो हॉटस्टार : JioTele OS चे टीव्ही येणार!

February 20, 2025
Jio AGM : AirFiber, Cloud PC, स्मार्ट होम, AI मॉडेल्स बद्दल माहिती जाहीर!

Jio AGM : AirFiber, Cloud PC, स्मार्ट होम, AI मॉडेल्स बद्दल माहिती जाहीर!

August 28, 2023
Jio Bharat 4G Phone

जियोचा नवा Bharat 4G फोन अवघ्या ९९९ रुपयात!

July 3, 2023
Next Post
सॅमसंग Galaxy Z Fold6, Flip6 सादर : सोबत Watch Ultra, Galaxy Ring

सॅमसंग Galaxy Z Fold6, Flip6 सादर : सोबत Watch Ultra, Galaxy Ring

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ADVERTISEMENT
microsoft 365 Office Icons 2025

मायक्रोसॉफ्ट 365 मध्ये आता नवे आयकॉन्स!

October 4, 2025
OpenAI Sora 2

OpenAI ने आणलं Sora 2 आणि AI व्हिडिओसाठी इंस्टाग्रामसारखं अ‍ॅप!

October 1, 2025
फ्लिपकार्ट व ॲमेझॉनचे सर्वात मोठे सेल २३ सप्टेंबरपासून!

फ्लिपकार्ट व ॲमेझॉनचे सर्वात मोठे सेल २३ सप्टेंबरपासून!

September 22, 2025
Apple Event iPhone 17 iPhone 17 Air

ॲपलची iPhone 17 सिरीज, 17 Air सोबत नवे Watch व Airpods सादर

September 10, 2025
MSRTC Timing Check Marathi

एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

September 25, 2012
यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

November 4, 2016
मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

September 10, 2012
ADVERTISEMENT
MarathiTech - मराठीटेक

तंत्रज्ञानाविषयी मराठी भाषेतली प्रसिद्ध वेबसाइट! नवं तंत्रज्ञान, नवनवे फोन्स, ॲप्स यांच्याबद्दल रंजक माहिती...

मराठीटेकला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा

microsoft 365 Office Icons 2025

मायक्रोसॉफ्ट 365 मध्ये आता नवे आयकॉन्स!

October 4, 2025
OpenAI Sora 2

OpenAI ने आणलं Sora 2 आणि AI व्हिडिओसाठी इंस्टाग्रामसारखं अ‍ॅप!

October 1, 2025

मायक्रोसॉफ्ट 365 मध्ये आता नवे आयकॉन्स!

OpenAI ने आणलं Sora 2 आणि AI व्हिडिओसाठी इंस्टाग्रामसारखं अ‍ॅप!

फ्लिपकार्ट व ॲमेझॉनचे सर्वात मोठे सेल २३ सप्टेंबरपासून!

ॲपलची iPhone 17 सिरीज, 17 Air सोबत नवे Watch व Airpods सादर

ChatGPT चा खास भारतीयांसाठी नवा स्वस्त प्लॅन : ChatGPT Go

  • About
  • Advertise
  • Privacy Policy
  • Contact

© MarathiTech 2024 A Product by BagalTech

error: Content is protected!
No Result
View All Result
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • खास लेख
  • गेमिंग
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • शॉपिंग ऑफर्स
  • आमच्याबद्दल About Us
  • संपर्क – प्रतिक्रिया

© MarathiTech 2024 A Product by BagalTech