MarathiTech - मराठीटेक
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
MarathiTech - मराठीटेक
No Result
View All Result
Home News

भारतीय पोस्टाची इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक सुरू!

Swapnil Bhoite by Swapnil Bhoite
September 1, 2018
in News

भारतीय पोस्ट विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेचे (IPPB) चे अनावरण आज पंतप्रधानांच्या हस्ते करण्यात आले आहे. पोस्ट ऑफिस नेटवर्कच्या मध्यातून ही सेवा घरोघरी पोहचणार आहे, खासकरून ग्रामीण भागात असणाऱ्या नेटवर्कमुळे तसेच पोस्टमन आणि ग्रामीण डाक सेवकांमुळे जास्त लोकांपर्यंत पोहचण्यास IPPBला मदत होईल. आजपासून ६५० शाखा आणि ३२५० ऍक्सेस पॉईंट्सद्वारे IPPB उपलब्ध होईल तर ३१ डिसेंबर २०१८ पर्यंत भारतातील १.५५ लाख पोस्ट ऑफिसच्या माध्यमातून IPPB ग्राहकांपर्यंत पोहचेल. 

इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक ही सामान्य बँकेसारखीच असून यामध्ये बचत/चालू  खाते ओपन करता येईल. पेमेंट्स बँक मध्ये १ लाखांपर्यंतच डिपॉझिट स्वीकारले जातील. १ लाखांपेक्षा जास्त रक्कम असणारे खाते पोस्ट ऑफिस बचत खात्यामध्ये परावर्तित केले जाईल. अन्य बँकाकडून मिळणाऱ्या जवळपास सर्वच सोयी पोस्ट बँकेद्वारे मिळवता येतील जसे की मोबाइल पेमेंट्स, मनी ट्रान्सफर त्याचबरोबर मायक्रो ATM ची सुविधा, नेट बँकिंग, बिल पेमेंट्स, रिचार्ज यांचा सुद्धा समावेश असेल.

ADVERTISEMENT

आधारचा वापर करून खाते उघडता येईल तर QR कोड आणि बायोमेट्रिकचा व्यवहार, पडताळणीसाठी वापर केला जाईल. पोस्ट पेमेंट्स बँकद्वारे ४% व्याजदर बचत खात्यासाठी दिले जाईल. स्वतःहून कर्ज, इन्शुरन्स देण्याची अनुमती बँकेला नसली तरी PNB, Bajaj Allienz लाइफ इन्शुरन्स च्या माध्यमातून कर्ज आणि इन्शुरन्स देण्यासाठी बॅंकेकडून भागीदारी करण्यात आली आहे.

डिपार्टमेंट ऑफ पोस्ट, मिनिस्ट्री ऑफ कम्युनिकेशन अंतर्गत इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेची स्थापना करण्यात आली असून यामध्ये भारत सरकारचा १०० टक्के हिस्सा आहे. ३० जानेवारी २०१७ रोजी रायपूर आणि रांची येथे प्रायोगिक तत्वावर IPPB सेवा चालू करण्यात आली होती.

Tags: BankingIndian PostPayments
ShareTweetSend
Previous Post

फेसबुक वॉच आता जगभरात उपलब्ध : फेसबुकचा नवा व्हिडिओ प्लॅटफॉर्म!

Next Post

पेटीएम मनी सादर : म्युच्युयल फंडामध्ये गुंतवणुकीसाठी पेटीएमचं नवं अॅप

Swapnil Bhoite

Swapnil Bhoite

Related Posts

आता गूगल पे SoundPod उपलब्ध : UPI पेमेंट अलर्ट्ससाठी नवा पर्याय!

आता गूगल पे SoundPod उपलब्ध : UPI पेमेंट अलर्ट्ससाठी नवा पर्याय!

February 23, 2024
आता UPI पेमेंट केल्यावर अतिरिक्त चार्जेस द्यावे लागणार का?

आता UPI पेमेंट केल्यावर अतिरिक्त चार्जेस द्यावे लागणार का?

March 29, 2023
UPI 123Pay Offline

UPI आता फीचर फोन्सवरही उपलब्ध : इंटरनेटशिवाय पैसे पाठवा : UPI123Pay

March 8, 2022
eRUPI

e-RUPI सादर : कॅशलेस पेमेंटसाठी नवा एसएमएस व्हाऊचर पर्याय!

August 2, 2021
Next Post
पेटीएम मनी सादर : म्युच्युयल फंडामध्ये गुंतवणुकीसाठी पेटीएमचं नवं अॅप

पेटीएम मनी सादर : म्युच्युयल फंडामध्ये गुंतवणुकीसाठी पेटीएमचं नवं अॅप

Comments 1

  1. Chinmay vijay vayeda says:
    3 years ago

    Hindi

    Reply

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ADVERTISEMENT
Perplexity Pro Airtel Offer

एयरटेलच्या सर्व ग्राहकांना Perplexity Pro AI वर्षभर मोफत!

July 18, 2025
Google Gemini AI Pro Free Offer

गूगलची विद्यार्थ्यांसाठी ऑफर : Gemini AI Pro + 2TB स्टोरेज एक वर्ष मोफत!

July 17, 2025
सॅमसंगचे Galaxy Fold7, Flip7 आणि Flip7 FE सादर!

सॅमसंगचे Galaxy Fold7, Flip7 आणि Flip7 FE सादर!

July 10, 2025
Moto g96

मोटोचा Moto g96 भारतात सादर!

July 10, 2025
MSRTC Timing Check Marathi

एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

September 25, 2012
Windows 10 Marathi Typing

विंडोज १० वर आता मराठी टायपिंगसाठी स्मार्ट फोनेटिक कीबोर्ड!

June 18, 2019
मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

September 10, 2012
ADVERTISEMENT
MarathiTech - मराठीटेक

तंत्रज्ञानाविषयी मराठी भाषेतली प्रसिद्ध वेबसाइट! नवं तंत्रज्ञान, नवनवे फोन्स, ॲप्स यांच्याबद्दल रंजक माहिती...

मराठीटेकला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा

Perplexity Pro Airtel Offer

एयरटेलच्या सर्व ग्राहकांना Perplexity Pro AI वर्षभर मोफत!

July 18, 2025
Google Gemini AI Pro Free Offer

गूगलची विद्यार्थ्यांसाठी ऑफर : Gemini AI Pro + 2TB स्टोरेज एक वर्ष मोफत!

July 17, 2025

एयरटेलच्या सर्व ग्राहकांना Perplexity Pro AI वर्षभर मोफत!

गूगलची विद्यार्थ्यांसाठी ऑफर : Gemini AI Pro + 2TB स्टोरेज एक वर्ष मोफत!

सॅमसंगचे Galaxy Fold7, Flip7 आणि Flip7 FE सादर!

मोटोचा Moto g96 भारतात सादर!

वनप्लसचे Nord 5 आणि Nord CE 5 भारतात सादर!

  • About
  • Advertise
  • Privacy Policy
  • Contact

© MarathiTech 2024 A Product by BagalTech

error: Content is protected!
No Result
View All Result
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • खास लेख
  • गेमिंग
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • शॉपिंग ऑफर्स
  • आमच्याबद्दल About Us
  • संपर्क – प्रतिक्रिया

© MarathiTech 2024 A Product by BagalTech