MarathiTech - मराठीटेक
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
MarathiTech - मराठीटेक
No Result
View All Result
Home कॉम्प्युटर्स

ॲपलचा सर्वात स्वस्त लॅपटॉप MacBook Neo सादर!

Sooraj Bagal by Sooraj Bagal
March 4, 2026
in कॉम्प्युटर्स
Apple MacBook Neo

ॲपलने आज नवा लॅपटॉप सादर केला असून ही मॅकबुक निओ त्यांचा उपलब्ध असलेला सर्वात स्वस्त लॅपटॉप असेल. यामध्ये आयफोन १६ मधील प्रोसेसर देण्यात आला असून याची किंमत भारतात ₹६९,९०० पासून सुरू होईल.

या मॅकबुक निओमध्ये अल्युमिनीयम बॉडी, 13-inch 60Hz 10-bit IPS डिस्प्ले, 8GB रॅम, 256GB/512GB स्टोरेज, मॅजिक किबोर्ड, मल्टीटच ट्रॅकपॅड, 1080p कॅमेरा, दोन USB-C पोर्ट (पैकी एक USB 3 आणि दुसरा USB 2), हेडफोन जॅक, spatial audio व Dolby Atmos सपोर्ट असलेले स्पीकर्स अशा सोयी मिळतील.

ADVERTISEMENT

यामधील 8GB च्या रॅमचा एकमेव पर्याय असून ही वाढवता येणार नाही. शिवाय TouchID चा पर्याय फक्त 512GB स्टोरेज असलेल्या मॉडेलमध्येच मिळेल. यामधील चार्जिंगसुद्धा जुनं 20W चं स्लो चार्जर आहे. इतर मॅकबुक प्रमाणे यामधील USB मध्ये Thunderbolt ports किंवा MagSafe चा सपोर्ट नाही. 36.5Wh बॅटरी १६ तासांची बॅटरी लाईफ मिळेल असं सांगितलं आहे. यामध्ये Wi-Fi 6E & Bluetooth 6 असेल आणि याचं वजन 1.23 kg आहे. Silver, Blush, Citrus आणि Indigo या चार रंगाचा पर्याय आहे.

नवीन मॅकबुक मुख्यतः विद्यार्थ्याना समोर ठेऊन बनवण्यात आला आहे ज्याना स्वस्त मॅकचा (तुलनेने स्वस्त) पर्याय हवा आहे. स्वस्त विंडोज लॅपटॉप किंवा गूगलच्या क्रोमबुकला हा आता नवा पर्याय असेल. भारतात याची किंमत ६९,९०० (256GB) आणि ७९,९०० (512GB) अशी असेल.

ॲपलने कालच नवीन MacBook Air M5 व MacBook Pro M5/M5 Pro/M5 Max सुद्धा जाहीर केले आहेत. गेल्यावर्षीच्या तुलनेत यावेळी किंमत वाढली असून MacBook Air M5 ची किंमत ₹1,19,900 पासून तर MacBook Pro M5 ची किंमत ₹1,89,900 पासून सुरू होईल.

MacBook Air M5 : M5 प्रोसेसर, 10-core CPU, 8-core GPU, 16-core Neural Engine, 16GB RAM, Wi-Fi 7 and Bluetooth 6, 512GB Base storage, 13.6″/15.3″ डिस्प्ले, 30W चार्जिंग, उपलब्ध रंग : Sky Blue, Midnight, Starlight व Silver

MacBook Pro M5 : M5/M5 Pro/M5 Max प्रोसेसर, 24GB RAM, Wi-Fi 7 and Bluetooth 7, 512GB Base storage, 14″/16″ miniLED डिस्प्ले, 140W चार्जिंग, उपलब्ध रंग : Space Black व Silver

यासोबतच Studio Display (27″ 5K 60Hz LCD) ज्याची किंमत १८९९०० आणि Studio Display XDR (27″ 5K Retina XDR mini-LED) ज्याची किंमत ३९९९०० इतकी आहे! iPhone 17e हा नवा आयफोन सुद्धा जाहीर झाला असून याची किंमत ₹64,900 इतकी आहे.

हे सर्व मॉडेल्स ११ मार्च पासून खरेदीसाठी उपलब्ध होतील.

Tags: AppleMacBookMacBook AirMacBook Neo
ShareTweetSend
Previous Post

सॅमसंगचे Galaxy S26, S26+ आणि S26 Ultra सादर!

Next Post

ॲपलचे नवे सीईओ जॉन टर्नस : टिम कुक यांच्यानंतर घेणार जबाबदारी!

Sooraj Bagal

Sooraj Bagal

Related Posts

Apple New CEO John Ternus

ॲपलचे नवे सीईओ जॉन टर्नस : टिम कुक यांच्यानंतर घेणार जबाबदारी!

April 25, 2026
Apple Event iPhone 17 iPhone 17 Air

ॲपलची iPhone 17 सिरीज, 17 Air सोबत नवे Watch व Airpods सादर

September 10, 2025
WWDC 2025 Marathi

ॲपल WWDC25 : iOS 26, macOS 26 व Liquid Glass डिझाईन जाहीर!

June 10, 2025
Apple iPhone 16e

ॲपलचा iPhone 16e सादर : नवा स्वस्त (!) फोन

February 20, 2025
Next Post
Apple New CEO John Ternus

ॲपलचे नवे सीईओ जॉन टर्नस : टिम कुक यांच्यानंतर घेणार जबाबदारी!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ADVERTISEMENT
Freepik Is Now Magnific

Freepik कंपनीचं नवं नाव आता Magnific : स्टॉक फोटोज् व AI टूल्ससाठी प्रसिद्ध

April 29, 2026
Apple New CEO John Ternus

ॲपलचे नवे सीईओ जॉन टर्नस : टिम कुक यांच्यानंतर घेणार जबाबदारी!

April 25, 2026
Apple MacBook Neo

ॲपलचा सर्वात स्वस्त लॅपटॉप MacBook Neo सादर!

March 4, 2026
सॅमसंगचे Galaxy S26, S26+ आणि S26 Ultra सादर!

सॅमसंगचे Galaxy S26, S26+ आणि S26 Ultra सादर!

February 26, 2026
MSRTC Timing Check Marathi

एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

September 25, 2012
यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

November 4, 2016
मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

September 10, 2012
ADVERTISEMENT
MarathiTech - मराठीटेक

तंत्रज्ञानाविषयी मराठी भाषेतली प्रसिद्ध वेबसाइट! नवं तंत्रज्ञान, नवनवे फोन्स, ॲप्स यांच्याबद्दल रंजक माहिती...

मराठीटेकला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा

Freepik Is Now Magnific

Freepik कंपनीचं नवं नाव आता Magnific : स्टॉक फोटोज् व AI टूल्ससाठी प्रसिद्ध

April 29, 2026
Apple New CEO John Ternus

ॲपलचे नवे सीईओ जॉन टर्नस : टिम कुक यांच्यानंतर घेणार जबाबदारी!

April 25, 2026

Freepik कंपनीचं नवं नाव आता Magnific : स्टॉक फोटोज् व AI टूल्ससाठी प्रसिद्ध

ॲपलचे नवे सीईओ जॉन टर्नस : टिम कुक यांच्यानंतर घेणार जबाबदारी!

ॲपलचा सर्वात स्वस्त लॅपटॉप MacBook Neo सादर!

सॅमसंगचे Galaxy S26, S26+ आणि S26 Ultra सादर!

Anthropic च्या नव्या AI प्लगइन्समुळे जगभरात आयटी शेयर्स घसरले!

  • About
  • Advertise
  • Privacy Policy
  • Contact

© MarathiTech 2024 A Product by BagalTech

error: Content is protected!
No Result
View All Result
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • खास लेख
  • गेमिंग
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • शॉपिंग ऑफर्स
  • आमच्याबद्दल About Us
  • संपर्क – प्रतिक्रिया

© MarathiTech 2024 A Product by BagalTech